kanchan chabukswar

Others

4.0  

kanchan chabukswar

Others

उन्हाळा

उन्हाळा

3 mins
239


दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की मी म्हणजे शमा ऋतूला फोन करून लहानपणीच्या आठवणी उगाळत बसतो.


सरकारी, आमचं घर, अण्णांचा जुना आईस्क्रीमचा पोट. घरी केलेलं रवाळ सुरेख आईस्क्रीम. सायकल वरून आणलेली 20 किलो बर्फाची लादी. मागच्या अंगणात बसून अण्णा ती बारीक तोडत असत. खडे मीठ आणि बर्फ असे मिश्रण आईस्क्रीमच्या लाकडी बादलीत घालून आईस्क्रीमची सुरुवात होत.


आता मुलांना सांगण्यासाठी फक्त आठवणीत उरले आहेत. हल्लीच्या पिढीला घरी केलेलं आईस्क्रीम माहितीच नाही. दुकानातून आयतीच आईस्क्रीमची ढेप आणायची, घरी आल्यावर कापून आपण घ्यायची, त्याच्यात नाही काही श्रम आणि नाही कसला आनंद. मला वाटतं वाट बघण्यामध्ये तो आनंद असतो आणि मेहनतीने केलेल्या गोष्टींमध्ये जो काही आनंद आणि निर्माण झालेली चव असते, तो आनंद दुकानातून आणलेल्या वस्तूमध्ये नाही.


फेब्रुवारीपासूनच उन्हाळ्याचे वेध चालू व्हायचं, केव्हापासून ऋतू आणि शमा आईच्या पाठी मागे लागायचा,”आईस्क्रीम कर...”


आई हसून म्हणायची, “जरा उन्हाळा तर वाढू दे.”


ऋतू नेहमी अण्णांबरोबर तोडायला मदत करायची, तिची मदत म्हणजे छोटे तुकडे घ्यायचे आणि माझ्या किंवा आईच्या पाठीमध्ये हळूच सोडून द्यायचे. 


अण्णांची लगबग चालू व्हायची, मोठ्या पलंगाखाली कोपऱ्यात ठेवलेल आईस्क्रीमचे भांडे बाहेर निघायचे, बाहेरच्या भांड्याच्या लाकडाच्या पट्ट्या सुताराकडून परत एकदा जोडल्या जायच्या. बाहेर एक लाकडी बादली असायची ज्याला मध्ये मध्ये भोक असायचे, त्याच्यामध्ये बर्फ आणि मीठ घालून ठेवायचे. मध्यभागी बिडाचे एक लिटरच्या आकाराचे उभे भांडे करू वरती गरागरा फिरत असे, वरून आडवी पट्टी अडकवून हँडल फिरवले की बिडाचे भांडे गरागरा फिरत असे. बिडाच्या  भांड्यामध्ये एक छोटा पंखा बरोबर उलट दिशेने फिरत असे. बर्फामुळे दूध गार व्हायला मदत होई आणि दोन्ही गोष्टी फिरत असल्यामुळे रवाळ आईस्क्रीम तयार होई. फिरवताना जेव्हा हँडल जड व्हायचे, तेव्हा आईला समजायचे की आईस्क्रीम तयार झाली. ते बघितल्यावर ऋतू आणि शमा खुश होऊन उड्या मारायच्या.

आमचा आनंद, धाकटा भाऊ खूपच छोटा होता त्याला काहीच कळायचे नाही पण आम्ही दोघी बहिणी मात्र त्याला आइस्क्रीम खाऊ घालण्यामध्ये चढाओढ करत असू.


बर्फाच्या कारखान्याकडे अण्णा दोन-तीन वेळा जाऊन यायचे, महिन्याच्या सामानामध्ये खडे मीठ, चॉकलेट, काजू किस्मिस असले आईस्क्रीमसाठी लागणारे सामान जरूर आणले जायचे.


आधी तुमच्या परीक्षा होऊन जाऊ द्या मग आपण आइस्क्रीम खाऊ असं म्हणत आई आणि अण्णा ऋतू आणि शमाची समजूत घालत. शेवटी कशीतरी मार्चमधली परीक्षा उरकली की आईस्क्रीमचे भांडे मध्यभागी यायचे.

 

काम जास्त करून आईच करायची. आईस्क्रीमच्या दिवशी सकाळपासूनच घरामध्ये फारच लगबग चालू होते. आधी दोन लिटर दूध आटवले  जायचे मग कधीकधी त्याच्यामध्ये आंब्याचे तुकडे, चॉकलेट, ब्रेड, असं घालून वेगवेगळ्या पद्धतीचे आईस्क्रीम तयार करण्यात यायचे.


ऋतू नेहमी अण्णांबरोबर बर्फ तोडायला मदत करायची, तिची मदत म्हणजे छोटे तुकडे घ्यायचे आणि माझ्या किंवा आईच्या पाठी मध्ये हळूच सोडून द्यायचे. त्यादिवशी आई सगळ्यांसाठी चांदीच्या वाट्या आणि चमचे बाहेर काढून ठेवत असे. माहित नाही पण चांदीच्या चमच्याने काढलेली आईस्क्रीम काहीतरी वेगळीच लागल्याचे ऋतू आणि शमा म्हणायच्या.


नंतर फ्रिजमधले आईस्क्रीम सुरू झाली. पण त्याला काही आईस्क्रीमच्या सारखा रवाळपणा येतच नसे.


कधीकधी आई आणि अण्णा गुलमंडीवरील शामलाल आईस्क्रीममध्ये आम्हा दोघींनाही घेऊन जायचे. आईस्क्रीम कुठपर्यंत खायचे याचा पण एक नियम असे. जोपर्यंत  तोंड आणि जीभ पूर्ण जड पडत नाही तोपर्यंत आईस्क्रीम खायची.


शेवटी आम्ही 5 जण हो --खू णा करत - करत एकमेकांशी बोलत असू. पण श्यामलालच्या आइस्क्रीमलादेखील आईने केलेल्या आईस्क्रीमसारखी चवच नसे. कोणी म्हणे, बाहेरच्या आईस्क्रीममध्ये टिपकागद घातले जातात, कोणी म्हणत त्याच्यामध्ये अंडे पण असते, काहीजण म्हणतात अरे नुसती हवा असते. कोणी काय आणि कोणी काय.

 

ऋतू आणि  शमा मोठ्या झाल्या, आईबरोबर आईस्क्रीम करू लागल्या, घरचे आईस्क्रीम शेजारीपाजारी फिरत असे. सगळ्यांच्याकडे आईस्क्रीम झाले की शेजारी वाटीभर देणे हा जणू काही नियम असे.

 

ऋतूने आई अण्णांना आपल्या अमेरिकेच्या घरी पण बोलावले, आईस्क्रीम लहान प्लास्टिकची बादलीच मिळे. वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन ऋतूने आई आणि अण्णांना आईस्क्रीम खाऊ घातले.

 

लहानपणी आपण पहिल्यांदा खातो त्याची चव आपल्या डोक्यामध्ये कायम बसलेली असते, तो चांदीचा चमचा चांदीची वाटी त्याच्यामधलं आईस्क्रीम आई आणि अण्णांनी केलेला प्रेमळ आग्रह ऋतू आणि शमा जन्मभर विसरू शकणार नाहीत.


आता अण्णाही नाहीत आणि आईही नाही पण घरच्या आइस्क्रीमची चव मात्र जिभेवर अजूनही रेंगाळत आहे.


Rate this content
Log in