तूच माझी सावित्री....4
तूच माझी सावित्री....4
काय येतील आनंद चे रिपोर्ट???...
भावाच्या लग्नाला जायला मिळेल का तिला??
तिने सांगितलं सर्वाना काय करायला हवे तें??
आणि सर्वानी तिला मदत केली...
इथे येऊन आपण थांबलो होतो...बघूया आता पुढे....
आनंदचे रिपोर्ट यायच्या आधीच तीने सोसायटीमध्ये असलेल्या युवा ग्रुपला मदतीला घेतले,आणि सोसायटीच्या ऑफिसच्या बाजूला असलेली खोली साफ़ करून घेतली. आनंदची सर्व तयारी केली आणि सोबत स्वतःची पण...
तीने सर्वांना सांगितलं की आनंद हा एकटेपणा सहन करू शकणार नाहीत, त्यामुळे मी पण त्यांच्यासोबत तिथेच राहते...तुम्ही सर्वानी आमचे घर,आणि आमची मुले यांना सांभाळा...आनंद फक्त बघत होता,खरच आरतीचे किती प्रेम आहे आपल्यावर आणि आपण तिला सारखे ओरडून बोलतो...
इकडे लगेच सगळे तयारीला लागले,कारण सगळेच तिच्या शब्दाला खूप मानत होते...आनंद फ़क्त सगळे बघत होता...तीने आईला फोन करून सर्व सांगितलं...मी लग्नाला येणार नाही, बाहेर कोठें काही बोलू नका...येणार आहेत असेच बोलत रहा....
रिपोर्ट यायला वेळ होता पण आनंद बैचेन होता,डोक खूप जड झाले होते...आरती शांतपणे त्याला आधार देत होती आणि जोडीला स्वतःची पण काळजी घेत होती...तीने स्वतःहून घरातल्या सगळ्यांचे रिपोर्ट टेस्ट ला पाठवले होते...
रिपोर्ट आले, घरातील सर्वांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले होते, डॉक्टर ना शंका होती म्हणून त्यांनी आनंदचा रिपोर्ट परत एकदा चेकिंगला पाठवला पण आनंदसुद्धा नेगेटिव्ह होता...तिला खुप छान वाट्त होते, ती धावत जाऊन आनंदला सांगायला गेली बघते तर काय???
आनंदला टेन्शनने घाम येऊन तो आडवा पडला होता...तीने जोरात सगळ्यांना आवाज दिला...जवळच असलेल्या डॉक्टर ना बोलवलं...माईल्ड हार्ट अटॅक होता. सगळे युवा ग्रुप आणि तिने मायेने जमावलेली माणसे, वाटेल ती मदत करत होते..
ambulance आली हॉस्पिटल मध्ये नेले...कोरोना ची साथ त्यामुळे तिने सासू सासरे याना सांगितले की तुम्ही अजिबात यायचं नाही तिकडे...
उद्यां माहेरी लग्न आणि आज हे...पण ती खंबीर होती...लगेच action घेतल्यामुळे तो आऊट ऑफ डेंजर होता...ती स्वतः त्याची खूप काळजी घेत होती...
माहेर जवळ असल्यामुळे तिच्या शब्दाखातर सोसायटी मध्ये रहात असलेल्या निलेशने घरातल्या सर्वांना तिच्या माहेरी स्वतःच्या गाडीतुन लग्नाला नेले...तोपर्यंत तिकडे कोणाला काहीच माहिती नव्हते...आणि ते येईपर्यंत हॉस्पिटल मध्ये लागणारी सर्व मदत साने काकूंनी आणि त्यांच्या कुटुंबानी केली...
आता १५ दिवस हॉस्पिटल मध्ये राहिल्यामुळे आनंद तिच्या नव्याने प्रेमात पडत होता...आनंदला त्रास व्हायला लागला की त्याच्या साठी ती रात्र रात्र जागत होती...त्याची काळजी घेत होती...डॉक्टर म्हणत होते की कोरोना आहे सो नाही कॊणी थाम्बले तरी चालेलं..
पण खरंच ही सावीत्री ऐकेल तेव्हा ना....घरची काळजी तिला नव्हती कारण सोसायटी सारख मोठे कुटुंब तिच्या मदतीला होते...सर्वांची ती लाडकी होती...आज आनंदला सोडणार होते, आता तो पूर्ण बरा होता...पण डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली होती...आज अख्खी सोसायटी स्वागताला उभी होती...
अखेर ही लढाई तिने जिंकली होती,आनंद एकदम भारावून गेला होता...तेवढ्यात साने काकू म्हणाल्या, चला पुढच्या आठवड्यात वटपौर्णिमा आहे, सोसायटी वरच संकट होते आनंदचे आजारपण म्हणजे...ते आता टळलय...ह्या सावीत्रीने आपल्या सत्यवानाला मृत्यूच्या दारातून परत आणले आहे...आणि सर्व जण तिचे कौतुक करतात... सगळेच आनंदची काळजी घेत होते...पण तो मात्र हरवला होता विचारात त्याला आठवण आली ती मागच्या वर्षी च्या वटपौर्णीमेची...
आपण किती बोललो होतो, आरतीला की तू उगाच दिखावा करतेस???काय तर म्हणे मी सावीत्री...तेवढ्यात कोणीतरी आनंदला आवाज दिला...आणि तो भानावर आला....
त्याला आरती सोबत बोलायचे होते, पण सतत सगळ्यांचे फोन आणि एवढ्या दिवसांनी आई आली म्हणून मुले देखील सोडत नव्हते....घरात सर्व जण त्याची काळजी घेत होते...
आणि आज अखेर तो दिवस आला, त्याची सावित्री अगदी नखशिखांत नटली होती....हिरवी साडी, हिरवा चुडा,कपाळावर मोठी चंद्रकोर नाकात नथ....तो बघतच बसला तिच्याकडे...ती जवळ आली आणि हसली..आनंदला म्हणाली असे काय बघताय??मी पूजा करून येते..तुम्ही आराम करा...मुले बाबांजवळ आहेत आणि तुमचे औषध, ज्यूस सर्व इथे ठेवलंय ते घ्या...मी आलेच...
आनंदने तिचा हात धरला, ती लाजत म्हणाली अहो असे काय करताय?? सोडा सगळे वाट बघत असतील...आनंद अगदी हसत म्हणाला बघू दे वाट...पण तू इथे बसं...त्याशिवाय मी तूला जाऊ देणार नाही...आरती त्याचे ऐकते...
मग् आनंद तिला म्हणतो, आरती मला माफ कर, मी खूप चुकीचं वागलो, तूला खूप बोललो...मी तुझ्या लायकीचा नाही ग...परत मी असे कधीच वागणार नाही...आज मी जो आहे तो तुझ्यामुळे...तू किती केलेस माझ्यासाठी??आणि मी मात्र...
आरती म्हणते, आनंद अहो असे नका बोलू,मी फार काही नाही केले, आणि जे केले तें माझ्यासाठी केले...तुम्ही माझे जग आहात, माझ्या प्रत्येक श्वासात तुम्ही आहात, तुमच्या शिवाय माझ्या आयुष्याची मी कल्पना करू शकत नाही...तुम्ही असे नका बोलू मी जे काही केले ते आपल्या प्रेमासाठी, आपल्या संसारासाठी...
आनंद म्हणतो, आज पासून मी सुद्धा हा वटपौर्णिमेचा उपवास करणार आहे...कारण तूच माझी सावित्री आहेस...मी कधीच तूला कमी लेखणार नाही...
आरतीचे डोळे आनंदाने भरून येतात.....
अजून अशाच छान छान कथा वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका...
लाइक आणि कंमेंट करत रहा...
साहीत्य चोरी हा गुन्हा आहे. लेख शेअर करायचा असेल तर नावासहीत करण्यास माझी हरकत नाही...
