त्रिकोण प्रेमाचा
त्रिकोण प्रेमाचा
अनिकेत दोन महिन्यांपासून अंथरुणावर होता त्याची बायको रीना हिला त्याचे सगळं च करावे लागत . गोळ्या औषध देणे स्पंजिग करणे सर्व तीच करत होती .
दोन महिन्या पासून सोबत असल्याने त्यांच्यातील दुरावा कमी झाला व जवळीक वाढली असे रिणाला वाटू लागले .
अनिकेत सोनल ला विसरला असेल आपला संसार आता सुरळीत होईल . कारण दोन महिन्यांपासून सोनल ने अनिकेतची चौकशी केली नाही की त्याला भेटायला आली नाही त्यामुळे रीना मागचे विसरून आनंदात रहात होती .
अनिकेत पूर्ण बरा झाला तो ऑफिस ला जाऊ लागला
रीना त्याची अजूनही काळजी घेत असे .
रीना प्रेग्नंट होती पण हे अनिकेतला माहीत नव्हते .अनिकेत सोनल च्या प्रेमात अडकला होता त्याचे सर्व लक्ष सोनल कडे असायचे .
रीना ला आपल्या प्रेग्नेंसी बद्द्ल अनिकेत ला सांगायचे होते ती त्या क्षणाची वाट बघत होती . पण अनिकेत रिणाला फारसा वेळ देत नव्हता . रिनाने ठरविले उद्या रविवार आहे ऑफिस ला सुट्टी असते आपण अनिकेतला गोड बातमी द्यायची . पण तिच्या या आनंदात विर्जन पडले अनिकेतचा अँक्सीडन्ट झाला व अनिकेत दोन महिने अंथरुणावर पडला .
एक दिवस रीना मार्केट मध्ये गेली सामान खरेदी केल्यानंतर ती कॉफी घ्यायला हॉटेलमध्ये गेली तिला समोर अनिकेत बसला दिसला त्याच्या सोबत हातात हात घालून बोलताना ऐक मुलगी होती तिने अंदाज केला ती सोनलच असेल .
रीना ने ठरविले " आज काय तो सोक्षमोक्ष लावायचा खुप दिवस आपण समजून घेतले तिला वाटले अनिकेत बदलला असेल पण तिचा तो भ्रम होता .
रीना अनिकेत समोर जाऊन उभी राहिली तो थोडा दचकला . पण स्वतःला सावरत म्हणाला " रीना तू इकडे कुठे?"
रीना डायरेक्ट मुद्द्यावर बोलली . ही सोनल ना .
अनिकेत …." हो ही सोनल . सोनल ही माझी बायको रीना.
तिने अनिकेत ला सांगितले मला सोनल सोबत बोलायचे आहे तुम्ही जरा बाहेर जा .
रीना न चिडता समजुतीच्या स्वरात सोनल शी बोलली .
" सोनल . मी तुला काही बोलणार नाही पण चार गोष्टी समजावून सांगणार बघ तुला पटत का. "
तू कधी विचार केला का ? या प्रेमाचा शेवट काय होईल .तुझे सर्व आयुष्य पडले आहे .
जर तू अनिकेतशी लग्न करायचे ठरविले तर ते आता शक्य नाही . अनिकेत मला सोडणार नाही कारण मी त्याच्या बाळाची आई होणार आहे . त्याला हे माहीत नाही पण लवकरच सांगणार . मग तुझं काय ?
तू कशासाठी तुझं आयुष्य खराब करते तू मागचे विसरून तुझ्या नवीन आयुष्याला सुरवात कर . बघ पटत का तुला ?
तिने दुसऱ्या दिवशी अनिकेतला बाळाची गोड बातमी दिली तेव्हा पासून तो तिची काळजी घेऊ लागला .
एक दिवस तिने सोनल बद्दल अनिकेतला विचारले तेव्हा अनिकेत म्हणाला ती बदली करून दुसऱ्या गावाला गेली एव्हडचं माहीत आहे .
रीना ला आनंद झाला तिच्या समजूतदार स्वभावामुळे तिने स्वतःचे व सोनलचे आयुष्य वाचविले .
तिच्या आयुष्यातील हा त्रिकोण संपला होता . आता तिला हवा असलेला घट्ट नवीन प्रेमाचा त्रिकोण तयार झाला .तो म्हणजे अनिकेत . ती व तिचे बाळ .
