kanchan chabukswar

Others

4.5  

kanchan chabukswar

Others

तो एक संन्यासी

तो एक संन्यासी

6 mins
206


रात्रीच्या निरव शांतते मध्ये कुठून तरी सतारीचे करूण बोल ऐकू येऊन माईला एकदम जाग आली. दूरवरच्या देवळांमधून, पहाटेची आरती सुरु झाली होती," जय राधा माधव, कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरधारी"

आज संकष्टी, बरोबर तीन वर्ष झाले गौरंगला घर सोडून.

कुठे असेल? काय करत असेल? त्याच्या बरोबरचे लोक त्याची काळजी घेत असतील का? या विचाराने माईच् मन सैरभैर झालं.


एकामागोमाग एक घरात घडलेल्या दुर्घटना तिच्या डोळ्यापुढून लख्खपणे चमकून गेल्या.


हसरे कुटुंब, गौरंग च्या मुंजीच्या वेळेला सासर माहेर दोन्हीकडचा गोतावळा जमला होता. गप्पा गाणी खेळ सगळी मजाच आली होती. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी जवळच असलेल्या अजिंठा लेण्या कडे जायचे ठरवले होते. दोन बस भरून पाहणे सकाळीच लेणी बघण्यासाठी निघाले. सगळा दिवस व्यवस्थित गेला, नुकतीच सोड मुंज झालेला गौरंग पण आपल्या नातलगांच्या बरोबर खेळण्यांमध्ये मग्न होता. त्यांनी केलेल्या चमन ग***** वरून सगळे त्याला मस्त चिडवत होते. सोड मुंजीच्या वेळेला मामाने कबूल पण केले होते की त्यांची छकुली गौरंगला बायको म्हणून देईल म्हणून. छकुली -- छकुली होती पाच वर्षाची चिमुरडी पोर, तिला थोडी काही अक्कल होती. चुलत मामे मावस भावंड सगळ्यांची नुसती धमाल चालली होती.


सगळं काही आलबेल होतं कोणाला काहीच कल्पना नव्हती. परतीच्या प्रवासामध्ये अचानक बस चा टायर पंचर झाला, त्याच्यामुळे गौरंग च्या बाबांनी अजून भाड्याच्या गाड्या बोलावल्या आणि पाहुण्यांना परत घरी पाठवलं. गौरंग चे बाबा त्याचा मोठा मामा आणि धाकटा काका बस बरोबर तिथेच थांबले.


पाहुणे मंडळी परत आली, दुसऱ्या दिवशी बहुतेक जणांचा परतीचा प्रवास होता त्याच्यामुळे सामानाची बांधाबांध करण्यामध्ये हसत-खेळत सुरुवात झाली.

मध्यरात्र उलटून गेली तरीपण त्या तिघांचा काहीच पत्ता नव्हता. लागला असेल वेळ अशी मनाची समजूत करून धाकटी काकू, मोठी मामी, आणि गौरंग चे आई , आजी झोपी गेले. पहाटेच पोलीस दरवाजावर आले.

बाबा, आणि मामा जबरदस्त जखमी अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होते तर धाकट्या काकांनी झालेल्या रक्तस्त्रावामुळे दम सोडला होता.

सगळ्या घरावरती मरणकळा पसरली. दुरवर जाणारे पाहुणे निघून गेले, जवळचे मात्र घरीच थांबले.

आठवडाभर हॉस्पिटलमध्ये राहून बाबा आणि मामा घरी परतले, घरी आल्यानंतर धाकट्या काका वरती अंत्यसंस्कार करण्यात आले. काकू काही बोलेन अशी झाली, कशासाठी आलो होतो आणि काय गमावून बसलो ती जणू काय शुद्ध आणि बुद्धी हरवून बसली.

सगळ्या गोष्टीचा गौरंग च्या मनावर ती अतिशय खोलवर परिणाम झाला. शाळकरू गौरांग, अभ्यासावर ती लक्ष केंद्रित करू लागला, धाकट्या काकाच्या जाण्यामुळे, काकू त्यांच्या जवळच राहू लागली, अचानक आजी आणि आजोबा देवळा- पुराणांमध्ये जास्त वेळ घालवू लागले. सगळ्यांची वृत्ती साधेपणा कडे आली. आजी आणि आजोबा तासन्तास भगवद्गीतेची पारायणे करू लागली. काकू दिवसातले सात-आठ तास देवळामध्ये जाऊन सेवा करू लागली. काकू बरोबर तिला सोडायला आणि आणायला गौरंग जाऊ लागला, भजन चालू असेल तर काकू ला सोबत म्हणून देवळातच बसू लागला, हळूहळू त्याला गोडी लागू लागली.


लुटमारीच्या दृष्टिकोनातून पाहुण्यांची बस पंचर करण्यात आली होती, बाबा मामा आणि काका यांच्या गळ्यामध्ये सोनसाखळी हातामध्ये पोहोच्या आणि अंगठ्या अस्सल सोन्याचे जिन्नस होतच, ते तिघे जण तिथे एकटे थांबल्यामुळे चोरट्यांना भावले , जबरदस्त मारहाण करून त्यांनी अंगावरची जिन्नस काढून घेतले, पैसे पण काढून घेतले, वर्मी घातलेल्या घावा मुळे काकाचा जागीच मृत्यू झाला होता, रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या बाबा आणि मामाला येणाऱ्या वाटसरू न हॉस्पिटलमध्ये पोहोचवले होते.


दररोज मंदिराची चक्कर, गीतेची पारायणे, गौरंग च्या मनावर विरक्ती वाढायला लागली. देवळातल्या भजनांमध्ये गौरांग तबल्याची साथ देऊ लागला, मंदिरातले प्रभुजी त्याला मृदुंग वाजवायला देखील बोलवायला

 लागले. कधी कधी प्रभुजी बरोबर गौरांग कीर्तनाच्या कार्यक्रमाला जायला लागला, हळूहळू दुसऱ्या गावाला, आणि त्यानंतर प्रभुजी बरोबर अमेरिकेची देखील वारी करून आला. विरक्ती कडे वळणारी त्याची पावले आई आणि आजीच्या काळजीचे कारण झाली.


देवळात उत्सव आहे असं सांगून गेलेला गौरंग परत मात्र आला नाही. त्याच्याबरोबरच्या साथीदारांनी तो आता घरी येणार नाही असे घरी येऊन सांगितले. आई आजी बाबा आजोबा, यांच्या वरती जणू आभाळच कोसळले. गौरांगला परत आणण्यासाठी आजोबा आणि बाबांनी प्रभुजी चे पाय धरले, पण गौरांग पूर्ण विरक्त झाला होता.

प्रसन्न हसून प्रभुजी म्हणाले," तुमच्या मुलाने आत्महत्या केलेली नाही, ना त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे, त्यांनी स्वतःच आयुष्य ईश्वरचरणी वाहिले आहे, यामध्ये तुम्ही दोघे आनंद मानायचा सोडून दुःख का म्हणता? असे भाग्य फार कमी लोकांना लाभतं. संसार ,लग्न, मुलं हे सगळेच सामान्य लोकांची काम आहेत, भौतिक जगतामध्ये दुःख दारिद्र्य, अवहेलना, अपमान, अपघात या सगळ्यापासून तुमचा मुलगा आता मुक्त झाला आहे. त्याला आयुष्याची खरी दिशा सापडली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याप्रमाणे अगदी कोवळ्या वयामध्ये संजीवन समाधी घेतली कारण त्यांनी आधीच्या आयुष्यामध्ये आपले सगळे भोग भोगले होते, दुःख असूनही त्यांनी आपली आध्यात्मिक ऊंची कायमच वाढवत नेली आणि म्हणून त्यांना मोक्षप्राप्ती झाली. नुसते ज्ञानदेव तुकाराम म्हणून टाळ वाजवण्यापेक्षा त्यांचे आयुष्य कसे होते याचा जर विचार केला तर तुमच्या देखील बुद्धीला आहे पटेल. देवाच्या सेवेत येणाऱ्या माणसाला परत मागे ओढू नका."


 कृष्णा ची भजने म्हणण्यात देवळांमध्ये सेवा करण्यात त्याला आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट सापडलं होतं. भौतिक विश्वामध्ये परत येण्याची त्याची तयारी नव्हती.

गौरंग च्या धाकट्या भावाकडे बघून आई-वडिलांनी आपल्या काळजावरती दगड ठेवला.

आज तीन वर्षे उलटली काहीच थांगपत्ता नव्हता. आजोबांनी आणि बाबांनी बहुतेक सगळी मंदिरे गुंडाळली, ठिकाणी गौरंग चा फोटो ठेवला पण कुठूनच काही माहिती मिळाली नाही. प्रभुजी म्हणत," गौरांग ईश्वर सेवेच्या मार्गावर निघालेला आहे त्याला परत भौतिक जगामध्ये ओढू नका. खूप कमी माणसांना अशी संधी मिळते परत परत प्रपंचात येऊन दुःख बघण्यासाठी आता तो तयार नाही. त्याला आमच्या पाशी राहू द्या, देव तुमचे कल्याण करेल "


मध्यंतरी बराच काळ लोटला, आजी आणि आजोबा एकापाठोपाठ एक कृष्णाच्या चरणी विलीन झाले. गौरंग अंत्यदर्शनाला देखील येऊ शकलं नाही. त्याच्यानंतर बाबांनी मनाशी पक्के ठरवले, देशातल्या सर्व मंदिरांमध्ये जाऊन त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. शेवटी कर्नाटका मधल्या एका छोट्या देवळामध्ये गौरंग त्यांना सापडला. त्या देवळाचा आता गौरांग प्रमुख प्रभू झाला होता. आपली आध्यात्मिक उंची त्याने वाढवली होती, त्याने स्वखुषीने पुर्ण संन्यास घेऊन कृष्णाच्या चरणी आपली सेवा रुजू केली होती. भौतिक मोह मायेचा त्याच्या वरती काहीही परिणाम होत नव्हता. एक वेळेस, तेदेखील अगदी कमी जेवण जेवून गौरांग पूर्णपणे देवाच्या सेवेत रुजू झाला होता. ब्रँडेड कपडे, बूट याचा शोकीन असणारा गौरांग पूर्णपणे पालटला होता. ज्ञान ग्रंथ वाचून त्यांनी त्याच्या परीक्षा दिल्या होत्या, अनेक कठोर तपस्या करून त्याने बरेच ज्ञान अर्जन केले होते, मोठे प्रभुजी त्याच्यावर ती अतिशय प्रसन्न असून एका देवळाची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे गौरंग वरती सोपवली होती आणि ती तो निष्ठेने पुरी करत होता.

बाबांच्या लक्षात आले की हा तर आता कृष्णभक्ती च्या मार्गावर निघालेला आहे जशी मीरा निघाली होती जशी राधा निघाली होती जसा सुदामा होता तसाच त्यांचा गौरांग कृष्णा मध्ये आपले आई-वडील पहात आहे आणि तो पूर्ण विरक्ती च्या मार्गावरती निघालेला आहे. त्याला परत बोलवण्यामध्ये घोर पातक घडले असते.


घरी आल्यानंतर माई आणि बाबांनी चर्चा केली, आणि स्वतःला देखील देवळाच्या सेवेमध्ये वाहून घेतले. मनामध्ये फक्त एक भाबडी आशा ठेवून की आपला मुलगा आपल्याला समोर दिसेल, तो बोलेल किंवा बोलणार नाही. जवळ येऊन बसेल किंवा बसणार नाही तरीपण माईच्या मातृ हृदयाला तो समोर असलेल्या बघून तेवढेच समाधान मिळत राहिले.


देवाच्या सेवेमध्ये वाहून घेण्यासाठी काहीतरी नेहमी अघटित घडावे लागते का? देवाचं विसर पडतोच का? लाखो-करोडो वर्षा भगवद्गीते मधले ज्ञान माणसाला समजत का नाही? परत परत 80 लाख योनी मधला प्रवास संपवून टाकावं असा त्याला वाटत का नाही? मग एखादा जर पुण्य प्राप्तीसाठी विरक्ती घेऊन देवाच्या वाटेवर निघाला असेल तर त्याला थांबवण्याचा बाकीच्यांना काय अधिकार? असे म्हंटले आहे की देवाच्या वाटेवर चालणाऱ्या ची पुढील सात पिढ्या आणि मागील सात पिढ्यांचा उद्धार होतो त्याच्या आई-वडिलांना देखील मोक्ष प्राप्ति होते मग गौरांग सारख्या विरक्त झालेल्या माणसाला थांबवून जबरदस्तीने परत या भौतिक विश्वामध्ये आणण्याचे कारणच काय? रामदास स्वामींची कथा सगळ्यांनाच माहिती आहे काहीतरी मोठ प्राप्त करण्यासाठी रामाची सेवा करण्यासाठी त्यांनी तर लग्नमंडपातून अस धूम ठोकली होती कारण त्या वेळेला बालविवाह होत असत. ज्याला सांसारिक मोह बंधनामध्ये काही रुची नाही त्याला सामान्य का करून टाकायचे?

माईने आणि बाबांनी स्वतःच्या मनाची समजूत घातली, गौरंग चे नाव पण बदलले होते, कशालाच काहीच आक्षेप न घेता माईने आणि बाबांनी स्वतःला कृष्णाच्या सेवेत अर्पण करून टाकले.


Rate this content
Log in