तमाशा जीवंत कला-लेख.
तमाशा जीवंत कला-लेख.
तमाशा ही कला महाराष्ट्राच्या रसिकांची आवड़ती कला आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात तिचे स्थान टिकून आहे. ग्रामीण
भागातील मनोरंजनाचे प्रभावी साधन म्हणून तमाशाकडे पाहिले जाते. ग्रामीण रसिकांची दाद हा तमाशाचा आधार स्तंभ आहे. तमाशा ही जीवंत कला आहे. पूर्वीच्या राजांच्या काळा पासून चालत आलेली परंपरा आहे. तिला जीवंत राहण्यासाठी महाराष्ट्रात अग्रस्थान मिळाले पाहिजे. त्यातील
प्रत्येक कलावंताच्या कुटुंबासाठी आर्थिक सवलत मिळाली पाहिजे.त्यांना आरोग्य, शिक्षण, अन्न, निवारा, धंदा यांत सवलत मिळायला हवी. त्यांच्या कार्यक्रमासाठी रात्रीची वेळ वाढवली पाहिजे. त्यामुळे ते रसिकाना भरभरून आनंद देवू शकतील. म्हातारपणात त्यांना पेन्शनचा लाभ मिळावा.
त्यांच्या तमाशाला शासनकडून ग्रामीण भागात संरक्षण मिळावे.शहरात त्याना जागा मिळावी.