kanchan chabukswar

Others

2  

kanchan chabukswar

Others

तारेवरचा गोच्या

तारेवरचा गोच्या

7 mins
175


17 मार्च पासून 17 ऑगस्ट पर्यंत, जवळ दीडशे दिवस आपण सगळे घरातच आहोत. 17 मार्चला बोर्डाची परीक्षा चालू होती अनेक मुले कसून अभ्यास करत होती, अचानक, यामाहामारीच्या वेढ्यातून सुटण्यासाठी सरकारने सगळ्यांना नागरिकांना घरात राहण्यास सांगितले. बापरे केवढी ती भीती, त्यादिवशी घरी येताना मी बाजारात गेले, म्हटलं काही जरुरीच्या वस्तू घेऊन जाऊ. बाजारात भरपूर पोलीस फाटा होता, सगळ्यांना घरी हाकलत होता. काही हात गाडी वाले, भेळ पुरी वाले, पावभाजी वाले, अगदी रडकुंडीला आले होते. त्यांचा तर हातावर पोट होता ना. रोजीरोटी त्यांनी विकलेल्या माझ्यावरती अवलंबून होती. मी घाईघाईने माझ्या टेलर कडे गेले, त्याला म्हटलं जसे असतील तसे कपडे दे, माहित नाही बाजार केव्हा सुरू होईल. सगळीकडे खूप धास्ती होती, कोणाला हात लावायची चोरी, जवळून गेले तरी भीती, कोणाला सर्दी किंवा खोकला झालेला असला तर काय नेम काहीपण असू शकेल. मुंबईमध्ये सगळ्यांची टीबी चाचणी तर पॉझिटिव्ह येते कारण एवढा प्रदूषण आहे, मग मुंबईच्या लोकांची प्रतिकारशक्ती पण खूप असली पाहिजे. ते काही नाही, घरी बसा हेच खरं.


दुसऱ्या दिवशी मी झुम मेंबरशिप घेतली आणि आपले क्लासेस चालू केले, शाळेच्या मुलांचे कशाला नुकसान तसेच माझ्या सह शिक्षकांना देखील झूम कसं वापरायचं प्रात्यक्षिक दाखवून सांगितलं सांगितलं. जेव्हा माझ्या मुलांना कळलं किमी शंभर-शंभर मुलांना झूम वर शिकवते आहे तेव्हा त्यांना पण फार आदर वाटला.


आमची शाळा तर योग्य प्रमाणे चालू झाली, ऑनलाईन क्लासेस मुळे बरेच फायदे झाले. सगळ्या नोट्स तयार असायच्या, मुलांना प्रात्यक्षिक दाखवत यायची, कंटाळा आला तर काल्पनिक सहलीवर पण जाता येत होतं. पण काही मुलांकडे आधुनिक उपकरणं असल्यामुळे त्यांना त्यांचा फायदा होत होता, काहींच्या कडे फक्त मोबाईल असल्यामुळे त्यांना मात्र थोडा त्रास होत होता. काही मुलांना वाटले हजेरी काही महत्त्वाची नाही नंतर परत आपली शिक्षक शिकवतील. असं करता करता एप्रिल उजाडला.

नावच नाही लोकडाऊन उठायचे. परीक्षा पण लांबणीवर, सगळे विद्यार्थी त्रस्त झाले. मे महिन्याच्या सुट्टी मध्ये आनंद घेता आला नाही, बाजारात जाऊन आंबे विकत आणता आले नाही. कैऱ्या, भेळपुरी, आईस्क्रीम याची गंमत लुटता आली नाही. मे महिन्यामध्ये आमच्या गच्ची वरती वाळवणाची धमाल असायची कोणाचा चुंदा, कोणाचे पापड कुरडया नाहीतर सांडगे, लाल मिरच्या पण वाळत असायच्या. यावर्षी काहीच झालं नाही, साध गच्चीवर ती फिरायचे पण चोरी .


त्यातून घरातला AC बंद पडला, भरीस भर, रेफ्रिजरेटरपण बंद पडू लागला, नवीन घ्यायचा कसा? सगळे दुकाने बंद. ऑनलाइन मागवा असं मुलं म्हणाली. पण त्याचा काही नेम, कुठलं मॉडेल येणार खरं खोटं, खुपच डोक्याला ताप झाला रेफ्रिजरेटर मधल्या वस्तू शेजारी नेऊन ठेवल्या. शेवटी एकदाचा टाटाचा क्रोमा आणि कोहिनूर ही दुकाने उघडली अक्षरशहा चोरासारखा आत मध्ये घुसून आम्ही मॉडेल सिलेक्ट केलं पूर्ण कॅश पेमेंट दिली तर दोन दिवसात घरी येईल असं सांगितलं म्हणून बँकेत जाऊन पूर्ण कॅश पेमेंट केली. आणि आठवड्याभरात नवीन रेफ्रिजरेटर घरी आला.


मे महिन्यामध्ये मी बरेच सिनेमे बघितले, कुठल्या कंपनीची एक फ्री-सर्वीस घेतली, नंतर माझ्या लक्षात आलं, फ्री सिनेमे म्हणजे थर्ड क्लास सिनेमे. मग विचार केला, आपल्या घरात एवढी घाण कशाला? आणि ती सर्विस बंद केली. एकीकडे तारेवरचे ट्रेनिंग चालू होतं. माझ्या मुलाने वाढदिवसाला मला नवीन लॅपटॉप दिला होता, त्याचा मी पुरेपूर फायदा केला. असं करता करता घेऊन उजाडला जून, पण शाळा उघडायचं काही चिन्ह दिसेना. जुलै याला, ऑनलाइन टिचिंग भरती जोर दिला गेला. जि सूट खूप फायदे देणार होतं.

.........................


सगळे शिक्षक झूम सेटल होत नाही तोच असं ठरलं की आपण जी सूट घ्यायचा. मे महिनाभर फक्त ट्रेनिंग आणि ट्रेनिंग. असं ठरलं आता ऑनलाईन शिकवायचं. ट्रेनिंग आठवडाभर चाललं, बाहेरचे ट्रेनिंगपण चाललं, संपूर्ण मे महिना फक्त शिकण्यामध्ये व्यस्त राहिला. काही जुने जाणते शिक्षक चक्क शाळा सोडून गेले ते म्हणाले त्यांना काही आता नवीन शिकता येणार नाही. झूम आणि जी सूटमध्ये बराच फरक होता. झूम त्यातल्या त्यात खूप सोपं होतं, जास्त बटन नाहीत पण मुलांना खोड्या मात्र फार काढता येत होत्या. तसं नाही जी सूट.


एकदम मला गणपतीचे वर्णन आठवलं, "बिंदू रूकतम रुपम" एका बिंदूला क्लिक केलं की त्याच्यातून नवीनच कार्यप्रणाली बाहेर पडत होती, खूप सावध राहावं लागायचं. जर का यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ सिलेक्ट केला तर तोच लागेल असं नाही चुकून जर भलतीकडेच क्लिक झालं तर भलताच व्हिडीओ चालू व्हायचा. सुरुवातीला तर माझे बरेच घोटाळे झाले. आम्हाला सांगितलं की नवीन जी अकाउंट काढा, त्यानुसार प्रत्येक क्लासची एक खिडकी तयार केली. त्यामध्ये मुलांना इन्व्हाईट केलं गेलं निमंत्रण दिलं गेलं. कॅलेंडर असतं. कॅलेंडरवर एकदा आपण क्लासचा टाईम घातला की तू वर्षभर तसाच राहतो, त्यांच्याकडे आपोआपच लिंक जाते.


एके दिवशी मजाच झाली, मला उठायला उशीर झाला, घाईघाईने आवरून मी क्लासचा खिडकीवर क्लिक केले, अरेच्या एकही मुलगा नाही, असं कसं झालं,? घाईघाईने आमच्या टेक्निकल टीमला फोन केला, ही मुलं कुठे गायब झाली? टेक्निकल टीम, नवीनच होती, ती पण घाबरली, मला म्हणाली परत सगळ्या मुलांना आमंत्रण द्या, वेळ तर निघून चालला होता, शेवटी तसं केलं आणि आपल्या क्लास घेतला. दुपारी मला सीनियर टेक्निशियनचा फोन आला. ती म्हणाली की मॅडम तुम्ही कुठल्या जीमेलवर गेलात? तुम्ही नक्कीच स्वतःच्या पर्सनल जीमेलवर गेला असाल, माझ्या लक्षात सगळा घोटाळा आला आणि तेव्हापासून मी भिंतीवर लिहून ठेवले शाळेचा क्लास घेताना शाळेचा जीमेल वरूनच घ्यायचा.


शिक्षकांबद्दल असे बरेच किस्से आहेत, पण आमची मुले पण हुशार, त्यांनी पूर्ण सहकार्य दिलं. कधीकधी पालकांचे मला फार नवल वाटायचं. काही पालक मुद्दामच कॅमेऱ्यासमोर येऊन शर्ट काढणे, भांग पाडणे किंवा उगीचच मुलाच्या मागे येऊन बसणे असले उपद्व्याप करायचे. एका आईने तर एक इअरफोन स्वतःच्या कानात आणि एक मुलाच्या कानात असे घालूनच बसायची सवय केली. आणि प्रत्येक वेळेला मध्येमध्ये करत शिक्षकांना सांगायची की,’आहो हर्षवर्धननी बघा चित्र काढले त्याचं कौतुक करा.”

पन्नास पोरं वर्गात, कोणाकोणाची चित्र बघायची? आमच्या आणि त्यांनी की नाही आज पोळी लाटली बघा ना कौतुक करा. आम्ही आमचे होम सायन्स क्लासपण प्रॅक्टिकल्ससकट घेतो. मुलांनी आपल्या स्वयंपाकघरात काम करायचं, आणि शिक्षकांनी ते ऑनलाइन बघायचं. आई-वडिलांनी सांगायचं, चव घेऊन, आणि त्यांनीच मार्क द्यायचे. खूप मजा येते.


आजी आणि आजोबा तर नातवाच्या मागेच बसायचे हिंदी आणि मराठीचे धडे शिकत आणि मधेमधे म्हणायचे आमच्या वेळेला असं नव्हतं आजी आणि आजोबादेखील नातवासकट कविता म्हणून बघायचे.


एका पालकांनी तर आपल्या मुलाची बसायची जागा इतकी सुंदर सजवली होती आणि त्याचा फोटो काढून शाळेकडे पाठवला. एक मुलगा मात्र लोळतलोळत शिकायचा, त्याला त्याला रागवायची पण पंचाईत! आई-वडिलांचा आई-वडिलांचं तो अजिबातच ऐकायचा नाही. एका मुलाने चक्क वडिलांना लोन काढायला लावले आणि स्वतःसाठी नवाकोरा लॅपटॉप विकत घेतला.

हल्ली आमची सगळे संमेलनेदेखील तारेवरच होतात. त्या दिवशी मी ठरवलं की आपण एक विज्ञान प्रदर्शन तारेवरच बनवू या. नुसतं परिपत्रक काढायचा अवकाश की तीनशे मुलांनी आपली नावं नोंदवली. सांगितलं की तुम्ही दोन मिनिटांचा व्हिडिओ आमच्याकडे पाठवा. कोणीही उगीच काहीही प्रयोग करायचे नाहीत. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं इतका सुंदर रिस्पॉन्स परिपत्रकाला आला.


इतके सुंदर प्रयोग छोटे, लहान, पण प्रत्येक प्रयोग काहीतरी शिकण्यासारखा होता. काही सांगण्यासारखे प्रयोग म्हणजे एका मुलांनी सोलार ब्लू टूथ बनवला, दुसऱ्यांने असा एक आयपॅड बनवला की जो कलर ब्लाइंड लोकांनापण रंग दाखवू शकेल. लहान मुलांनी त्यांच्या पद्धतीने प्रयोग केले. एका छोट्या मुलीने सॅनिटायझर बशीमध्ये टाकला आणि त्याच्यावर ती मेणबत्ती धरली, मेणबत्ती आपोआप पेटली. एका मुलाने तर चक्क टोमॅटोच्या रसातून डीएनए काढला. एका मुलीने तर डोळ्यांची रचना आणि चष्मा का लागतो, याचे विवरण केले.


आमच्या विज्ञान प्रदर्शनाला पाहुणेपण सिंगापूरचे होते, त्यांनी त्यांच्या घरात बसून प्रदर्शन बघितलं. आमच्या मुलांचे प्रयोग बघून त्यांना फार कौतुक वाटलं. खरोखरच, एका मुलीने आपण घरामध्ये ज्या वस्तू आणतो त्याचा पीएच काढला होता. बाथरूम क्लीनर, कोल्ड्रिंग, दही, दूध, टूथपेस्ट. खरंच आहे, बऱ्याच गोष्टी आपण नुसतीच जाहिरात बघून घेतो, त्याचे फायदे तोटे कधी कळत नाहीत. खरं म्हणजे एवढे स्ट्रॉंग केमिकल वापरून आपण निसर्गाच्या साखळीला आव्हान देत असतो. काही विद्यार्थ्यांनी फिजिक्सचे नियम पण खूप सुंदर रीतीने समजावून सांगितले होते, साधा टेनिस बॉल घेऊन, किंवा 2,3 काचा एकावर एक ठेवून. एवढे 300 प्रयोग बघून एक लक्षात आलं ज्याला इंटरेस्ट असतो त्याच्यासाठी प्रख्यात कार्यशाळेची काहीच गरज नसते.


ऑनलाइन शिकवताना काही काळजी घ्यायची असते. आपली पाठ भिंतीकडेच पाहिजे, मागच्या बाजूला कोणीही नको. खोलीचे दार बंद करावं, शक्यतोवर. तशीच काळजी घ्यायची असते पालकांनीसुद्धा. एकदा शिकवताना मला धाडकन आवाज आला, बघते तर काय, मुलाच्या आईने मागे उभे राहून चादर झटकली होती. विद्यार्थ्यांना जर गॅलरीत बसवायचं असेल तर शक्यतोवर तिथे अंतर्वस्त्रे टाकू नयेत. मी एक सेमिनार अटेंड केला, त्यामध्ये त्या माणसाचा छोटा मुलगा सारखा ये-जा करत कपाट उघडत, धाव धावत होता, मध्येच त्याने सगळे कपडे काढून टाकले, आणि उड्या मारायला सुरुवात केली, त्या माणसाचं काही लक्ष नव्हतं, आम्हाला फारच हसू आले.


शिक्षकांनी पण खूप काळजी घ्यायची असते, आपले प्रेझेंटेशन अगदी परफेक्टली तयार ठेवायचं, दात वगैरे घासून बसायचे, असे म्हणतात की नाकावरचे ब्लॅकपोअर्सपण दिसतात. पालक घरीच असतात त्यामुळे ओरडून बोलू नये, एकदा माझे मिस्टर मला म्हणाले अगं तू एवढी काय रागवत होतीस? मला माझी चूक कळली, रागावून ओरडून चिडून काहीही उपयोग होत नाही.


सध्या मी माझा जुना छंद परत जोपासते आहे, गोष्टी लिहिणे आणि चित्र काढणे. गणपतीचे मागचं मयूर सिंहासनपण मीच बनवलं आहे. जी सूट माध्यमांमुळे मुलांची हजेरीपण व्यवस्थित लागत होती. आम्ही परीक्षा घेण्याचे भरपूर प्रयोग केले. वेळेचे महत्त्व मुलांनापण कळलं. मोबाईल तर आता त्यांचा परममित्र झाला. लॅपटॉप मोबाईल इंटरनेट याचा चांगला कसा उपयोग करायचा सगळ्यांच्याच लक्षात आलं. फावल्या वेळामध्ये नवीन-नवीन सेमिनार अटेंड करून स्वतःच्या ज्ञानामध्येपण भर पडली. सुरुवातीला कॉम्प्युटरची भीती वाटायची, चुकीची क्लिक आणि काही अॅक्सीडेंट. आता तसं काही वाटत नाही दीडशे दिवसांमध्ये पुष्कळ प्रॅक्टीस झाली. खरं म्हणजे अशीच शाळा असावी, हो फक्त लॉकडाऊन नसावे.


बाहेर जाता येत नाही, आपल्या नातेवाईकांना भेटता येत नाही, फार वाईट वाटतं, पण जिवंत आहोत हे काय कमी आहे. परदेशातली मुले पण म्हणाली, आम्ही भेटायला जरी आलो तरी पंधरा दिवस कुठेतरी राहावे लागेल आणि तोपर्यंत परत जायची वेळ येईल त्यापेक्षा तुम्ही नीट राहा आणि आम्हीपण नीट राहू. खरंच आहे. म्हणूनच शिक्षकी पेशा चांगला, रोज लहान मुलांना बघता येते, त्यांच्याशी गप्पा मारता येतात, आणि आपण कायम तरूणच राहतो.


Rate this content
Log in