Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sanjay Raghunath Sonawane

Others


2.5  

Sanjay Raghunath Sonawane

Others


सूडाने पेटली मने

सूडाने पेटली मने

3 mins 3.1K 3 mins 3.1K

श्रीपतराव:गेणाजीराव,काय ठरवले चालू वर्षी?

गेणाजीराव:काय करणार, चालू वर्षी दुष्काळ पडलाय.

दहा एकर जमीन पडीक पडली. आता करायचे काय?

श्रीपतराव:काय घाबरू नको. मी तुला मदत करतो. वीस लाखाची.

गेणाजीराव:श्रीपतराव, हे मी ऐकतो का स्वप्न पाहतोय?

श्रीपतराव:हे खरे आहे. दिलेले पैसे पण मला परत देऊ नको. पण तुला फार मोठी जबाबदारी पार पाडायची आहे.

गेणाजीराव:कोणती साहेब?

श्रीपतराव:अहो गेणाजीराव,येत्या पंचवार्षिकला आपले माजी आमदार निवडणुकीला उभे राहणार आहे. त्यांच्याकडे करोडोने पैसा शिल्लक आहे. त्यांनी आपल्या भरवशावर उमेदवारी अर्ज भरला आहे. तेव्हा त्यांना निवडूण देण्याचे आपण वचन दिले आहे. तुला एकच काम देणार आहे.

गेणाजीराव:कोणते?

श्रीपतराव:हे बघ,आपण त्यांच्या विश्वासातील माणसे असल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक घरातील माणसे मोजून

मतदार यादीत नावे शोधून प्रत्येकी पाच हजार अशा हिशोबाने पैसे वाटायचे.त्याचे नाव, मोबाइल नं. लिहून ठेवायचे. हे काम गुप्त पद्धतीने झाले पाहिजे. नाहीतर विरोधी पक्षवाले दबा धरून बसलेले असतात. उगाच जेलमधी जावे लागेल.

गेणाजीराव:शंभर टक्के.काम होणारच. साहेब निवडून येणार.

श्रीपतराव:गेणाजीराव,साहेब जिंकून आल्यावर लइ मोठी पार्टी देणार आहे. त्यात बाई आणि बाटलीपण!

गेणाजीराव:मग तर काम पक्क्च.

(निडणुकीचा प्रचार जोरात चालू असतो. अनेक लोकांना आश्वासन दिले जाते.ठिक ठिकाणी प्रचारसभा चालू होतात. नोकर भर्ती, पाणी प्रश्न, वीज, रस्ते, शेतकरी वर्गाला मदत.आमदार गणपतराव पोटले,आपल्या उमेदवारीचे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहतात. त्यांचे चिन्ह असते नांगर.

गणपतराव:(गावागावात जोरदार प्रचार सभा घेतात.)माझ्या मतदार बंधू आणि भगिनीनो मला एकदा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून एकदा संधी द्या. मला भरगोस मतानी निवडूण द्या मी आपले सर्व प्रश्न मार्गी लावेल. मला माहिती आहे मागील पंच वार्षिक निवडणुकीत आपल्याच उमेद्वाराकडून फसवणूक झाली. आपले प्रश्न सुटले नाही. ते मी सोडविण्याचा वचन नामा देत आहे.

(प्रत्येक गावात हेच भाषण असायचे)

गावकरी:अहो साहेब दर पाच वर्षानी आमदार निवडूण येतात. आम्हाला खोटे आश्वासन देतात. त्यामुळे लोकांचा विश्वासच उडाला आहे.

गणपतराव:हे बघा,मी निवडूण आल्यावर तुमच्या प्रत्येक पोराला मी कामाला लावणार आहे. तुम्हाला वीज, पाणी रस्ते, आर्थिक मदत सर्व ठीक होणार आहे. त्यासाठी मी श्रीपतराव,गेणाजीराव ह्या माझ्या विश्वासू मित्रांना तुमच्या सेवेसाठी व तक्रार निवारणासाठी पाठवणार आहेत.मी आता आपल्या सेवेस कायम तत्पर राहील. पुढील भाषण श्रीपतराव करतील. मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.

श्रीपतराव:गावकरी मित्रहो, आपले जीवलग मित्र गेणाजी राव यांना आज रात्री त्यांच्या घरी महत्त्वाची मिटिंग असल्याने जरूर भेटा. (लोक समजले होते काही तरी चिरीमिरी मिळणार म्हणून. श्रीपतरावांच्या सांगण्या नुसार काही गावातील प्रतिनिधी गेणाजीरावांच्या घरी पोहचले. चिरीमिरी घेतली. मतदान गणपतराव यांना देण्याचे मान्य झाले.)

गेणाजीराव:आपले आवडते उमेदवार गणपतराव पोटले याना प्रचंड मतांनी विजयी करा.

गावकरी:होय, होय. त्याची चिंताच करू नका.

(निवडणूक पार पडली. मध्यस्थी प्रतिनिधीनी त्या गावकऱ्याना चिरीमिरी दिलीच नाही. त्यामुळे विरोधी पार्टी ने पैसे थेट गावकरी लोकांना दिले होते. त्यामुळे विरोधी पक्षातील उमेदवार निवडून आला. गणपतराव प्रचंड फरकाने हारले.गणपतराव हरल्याने चिडले होते. शिव्या देत होते. शिरप्याने, गेन्याने फसविले म्हणत होते. केसाने गळा कापला म्हणत होते.लोक टिका करू लागले गणपतरावांच्या पैश्याने खाल्ले मटण आणि अण्णांचे निशाणीचे दाबले बटण. विरोधी लोकांनी गणपतराव पोटलेना आर्थिक दृष्टया उद्ध्वस्त केले. त्यांचे डिपोझिट जप्त झाले.)

श्रीपतराव:(मोबाइलवरुन,गेणाजीरावाला फोन करतात.)

गेणाजीराव,गणपतराव पोटले पराजीत झाले तेव्हा महीने दोन महिने गाव सोडा. आता तुम्हाला मिळणारे वीस लाख पण बुडाले. आता मार खायची वेळ आली.

गेणाजीराव:अरे आता आपण लपायचे तरी कुठे?

दोघेपण शहरात राहू. तिथून घरच्याना पैसे पाठवू. आता कष्ट करुन जगू .

(त्याचवेळी गणपतराव पोटलेचा मोबाइल वरुन श्रीपत रावाना फोन येतो)

गणपतराव:शिरप्या मला फसविले. मी दिलेले पैसे परत दे नाहीतर तुझी आणि त्या गेन्याचे हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही.

श्रीपतराव:होय, होय साहेब.

(सर्व गावच्या लोकप्रतिनिधीकडे जातात. हातपाया पडतात. पैसे परत मागतात.पैसे परत मिळत नाही उलट गावकरी श्रीपतला लाथा, बुक्यानी मारतात.


Rate this content
Log in