Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sanjay Raghunath Sonawane

Others


2.3  

Sanjay Raghunath Sonawane

Others


स्त्री - शाप की वरदान

स्त्री - शाप की वरदान

2 mins 8.9K 2 mins 8.9K

आपल्या भारतात स्त्रीला नारी, रणरागिणी म्हणून संबोधले जाते. स्त्री पुरुष समानता कायद्याने आली ; पण विचाराने प्रगल्भ झाली नाही. मुलगी जन्माला आली की काही घरात चूल पेटत नाही. दुःख पाळले जाते. मुलगी जन्माला आली म्हणून काहीजण त्या मातेचा अतोनात मानसिक छळ करतात. विशेष म्हणजे हे उच्च विद्याविभूषित घराण्यात जास्त असते. त्या जन्म देणाऱ्या मातेला क्रूरपणे मारहाण करतात. त्यात घरातील मंडळी सामिल असतात. आपण पुस्तकात फक्त उत्तीर्ण होण्याकरीता अभ्यास करतो. वास्तव वेगळेच असते.

आपण मुलीला वंशज मानायला तयार नसतो. एवढे आपण मानसिक गुलाम झालेलो आहोत. मुलांसाठी त्या मातेला शरीर क्षमतेपेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा लागतो. त्यात तिचे स्वास्थ्य बिघडते. भ्रूण हत्या जास्तीत जास्त होतात. कसायासारखे डॉक्टरदेखील भ्रूण हत्या करतात. कायदा होऊनही हे असे का घडते ? कारण त्यांना वाजवीपेक्षा जास्त रक्कम मिळते. आई वडीलसुद्धा दगडाचे काळीज करतात व निरपराध जीवाची राजरोस हत्या करतात. ह्यात आई वडीलदेखील गुन्हेगार आहे.

पण मेलेल्या जीवाला न्याय कोण देणार ? एवढी राक्षसी वृती का यावी आपल्यात ? त्यासाठी आपल्याला हा मानवदेह दिला आहे का ? उमलणाऱ्या कळीला फूल होण्याच्या आत सुकवले जाते.

खरंच ह्या गुन्ह्याला कोणीही माफ करणार नाही. डॉक्टरांनी हे भयंकर कृत्य करण्यास साफ नकार दिला पाहिजे. धन, दौलत मिळताना हे वाईट कृत्य करू नये.

आपल्या भारतात आई, बहीण, मुलगी, पत्नी ही रक्ताची नाती टिकली पाहिजेेत. स्त्रीया आता अंतराळात जाऊन आलेल्या आहेत. आपल्या आईवडिलांचे जन्माचे सार्थक केले आहेत. त्या आता आई वडीलांच्या खऱ्या वारसदार आहेत. स्त्रीशिवाय घराला घरपण नाही. स्त्रीला जन्म देणे म्हणजे श्रीमंती कमावण्यासारखे आहे. अशी चूक आपण करू नका व इतरांना करू देऊ नका. तिलाही ह्या जगात जन्मदात्या आई वडिलांचे नाव कमवायाचे आहे.

मुलगी वाचवा, देश वाचवा. देशाचे भाग्य उजळेल. भारत महासत्ता होण्यास मदत होईल. बेटी बचाव, बेटी बढाव. save girl, save India.


Rate this content
Log in