स्काऊट गाइड-संस्काराचे माध्यम
स्काऊट गाइड-संस्काराचे माध्यम
स्कॉऊट गाईड म्हणजे काय?तर जीवन जगण्यासाठी उत्तम संस्काराचा नियोजनबद्ध आराखडा. मग संस्कार म्हणजे काय?तर विद्यार्थ्यांमध्ये स्कॉऊटमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आचारणात, वर्तनात झालेला प्रभावी बदल होय. तो बदल कुटुंबासाठी, समाजासाठी व देशासाठी हितकारक ठरतो. लार्ड बेडन पॉवेल सारख्या एका व्यक्तीने चळवळ सुरु करून तिची व्याप्ती संपूर्ण जगात पसरवली.आजही कोणत्याही देशात गेलात तर तिथे त्यांना स्काऊट/गाईडचे नियम, वचन, प्रार्थना, स्कॉऊट/गाईडगीत, बी.पी. सिक्स व्यायाम प्रकार, खेळ हे सर्वत्र सारखेच आढळतात. त्यात अधिक भर म्हणून
स्कॉऊट/गाइडच्या तज्ज्ञानी नवीन खेळांची भर घातली आहे. हा एक संशोधनाचा भाग आहे. बी.पी. ने एका गटासाठी,जातीसाठी, धर्मासाठी, किंवा एका देशासाठी स्कॉऊट गाईड सुरू केले नसून ते सर्व जगासाठी, जगातील विश्व बंधू भगिनिंसाठी सुरु केले.
अशा ह्या स्कॉऊट/गाईडचे जीवन म्हणजे छंदवेडे जीवन, खेळकर वृती, सयंम, नम्रता, विश्व बंधुता, स्वयं शिस्तीचे अनमोल धन म्हणावे लागेल. आपल्या भारत देशात स्कॉऊट/गाईडची चळवळ जोराने राबत आहे. स्कॉऊट/गाईड विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम बसवू लागले आहेत. त्यात एकांकिका, नाटक, गाणी, देशभक्तीपर गीते घेतली जातात. खेळामध्येही व्याप्ती वाढली आहे. क्रिकेट, हॉलीबॉल,टेनिस, कबड्डी, खो, खो, बुद्धिबळ रायफल शूटिंग, धावने, इत्यादी खेळ घेतले जाते. परेड घेतले जातात. लष्करातील पहिली पायरी म्हणजे स्कॉऊट/गाईड होय.
बौद्धिक ताणतणाव कमी व्हावे म्हणून शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. त्यातून बौद्धिक क्षमता विकसित होऊन मन सबल होते. सर्व जाती धर्माचे मुले एकत्र येतात.ते जंगलात राहूटी बांधून राहतात. त्यातून त्यांचे देशप्रेम, नेतृत्वगुण, स्वालंबन वाढीस लागते. मित्रत्वाची, सहकाराची भावना वाढीस लागते. विश्व प्रेम वाढीस लागते. गरीब, श्रीमंत भेदभाव राहत नाही. मुले निर्व्यसनी बनतात. स्काउटगाईड मध्ये आळस निघून जातो. नियोजनपूर्वक काम केले जाते. स्काऊटगाईड चळवळ भावी युवकवर्गानसाठी प्रेरणा स्थान आहे. स्कॉऊट गाईड नैसर्गीक आपत्ती आल्यावर धावून येतो. सामजिक कामे पार पाड़तो. निसर्गाचे रक्षण व संवर्धन करतो. अंधश्रद्धा, प्रदूषण यावर आधारीत कृतियुक्त कार्यक्रम घेतो. माणसांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणतो.