Sanjay Raghunath Sonawane

Others

3.8  

Sanjay Raghunath Sonawane

Others

शहरी कामगार -समस्या व उपाय

शहरी कामगार -समस्या व उपाय

2 mins
13K


शहरी कामगार म्हणजे खेड्यातून आलेला गरीब, वंचित घटक होय. पोटाची खळगी भरण्यासाठी तो ग्रामीण भागातून आलेला असतो. अशा कामगाराना कंंपनीत काम मिळत. पण अनिश्चित कालावधीसाठी. त्यात त्यांचे भविष्य नसते. त्यांना मालक कधीही कामावरुन कायमचे काढून टाकतो. त्यामुळे अशा कामगारावर उपासमारीची वेळ येते. कर्ज काढून जगावे लागते. त्यात त्याला दूसरे काम मिळाले तर ठिक नाहीतर संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. घरभाडे, मुलांचे शिक्षण, आई वडिलांचे पालनपोषण ह्या समस्या निर्माण होतात. खरंच ह्या असंघटीत कामगारांचे जीवन म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यांना नोकरीची हमी नाही. एखादी नोकरी मिळाली तर त्यांना गुलामासारखे वागवले जाते. जास्त पगार दाखवून कमी पगारात राबविले जाते. जास्तीत जास्त तास काम करून पगार कमी असतो.

आता जिवंत माणसांची ठेकेदारी सुरु झालेली आहे. कामगारांचे जीवन व आयुष्य ठेकेदार ठरवतो. आता सर्व कामगार कंत्राटी म्हणून राबणार व देशातील ठराविक वर्ग त्यांच्या कष्टाची मलई खाणार. कामगाराना पेंशन योजना नाही. मात्र त्यांच्या कष्टावर जगणाऱ्या ठराविक वर्ग पेंशन घेणार. पाच, दहा वर्षे कामगाराला त्याचा मालक क्षुल्लक कारणावरुन घरचा रस्ता दाखवतो. त्यांनी इमादारीने, विश्वासाने केलेल्या कामाचे मूल्य राहत नाही. त्याला न्याय मिळणे कठीण जाते. अशा कामगाराला सहजासहजी काढले जाते. म्हणजे कामगाराच्या आयुष्याशी खेळणे होय. कामगारांची शुद्ध फसवणूक करणे होय. त्यांना कायदा आहे; पण त्यांच्या जगण्याचा करार केलेला असतो. ते कुठेही भांडू शकत नाही, न्याय माघू शकत नाही.

खरोखर अशा कामगाराना पेंशन,भविष्यनिधी हा त्या मालकानी त्यांच्या सेवेतील वर्षांनुसार दिलाच पाहिजे. हे सर्व कामगार कायद्याखाली आणून शासनाने नियंत्रण ठेवणे काळाची गरज आहे. वृद्धापकाळातील त्याला त्याचा जगण्याचा अधिकार खाजगी क्षेत्रालाही लागू करावा. कामाचे तास निश्चित करावे. त्यानुसार पगार देण्यात यावा. वेळोवेळी वाढणारी महागाईनुसार वेतनवाढ करण्यात यावी. कामगारांना कायम नोकरीत घेतल्याने कामगार जबाबदारीने वागेल. शासन यंत्रणा सतर्क असली पाहिजे. व्यवस्थापन आधुनिक असायला हवे. कामात शिस्त, कर्तव्य कामगाराने बजावली पाहिजे.

संप करून मालकाचे आर्थिक नुकसान करू नये. मालमत्तेचे नुकसान करू नये. आपसातील वाद सामंजस्य पद्धतीने मिटवावे. तरच कंपनी मालक, कामगार जगू शकेल. कामगार वर्गासाठी लोकप्रतिनिधीनी प्रामाणिक सामंजस्य करार घडवून आणले पाहिजे. शहरात रहदारीची समस्या फार कठीण आहे. जीवघेण्या प्रवासामुळे ताणतणाव वाढतात. कामापेक्षा प्रवासाचा त्रास कामगाराना सहन करावा लागतो. ती समस्या जातीने लक्ष घालून सोडवली पाहीजे. रोजगार निर्मिती झाली पाहिजे. त्यामुळे सर्व वर्गाचा विकास होऊन भारताचा विकास होईल. कंपनीची आर्थिक स्थिती ओळखून वेतन वाढ करावी. कामगाराना कंपनीच्या नफ्यावर आधारीत लाभ करून द्यावा.


Rate this content
Log in