kanchan chabukswar

Children Stories Comedy

4.5  

kanchan chabukswar

Children Stories Comedy

सगुणा आणि बावळट टॉमी ................................ सौ कांचन चाबुकस्वार

सगुणा आणि बावळट टॉमी ................................ सौ कांचन चाबुकस्वार

3 mins
276


गीरच्या जंगलामध्ये नदीच्या किनारी काही म्हशी शांतपणे रवंथ करत बसल्या होत्या. त्यांच्या नेहमी घोटाळणारे छोटी-छोटी कुत्री ये-जा करत होती. कधीकधी वाघ सिंह येईल , भीतीमुळे म्हशीच्या खाली पण लपत. वाघI च्या तोंडी सापडू नये म्हणून भटकी कुत्री कळपाबरोबर चालत.

म्हशींच्या बरोबर मोती नावाचा पण राखणदार म्हणून कायम वावरत असे.

नेहमीप्रमाणे नदीकाठचं हिरव कुरण खाऊन झाल्यानंतर म्हशींचा कळप घराकडे वळला गेला.

तेवढ्यात एका अजबच घडलं. सगुणा म्हैस कशी रवंथ करून उभी राहिली, तीच्या उजवीकडच्या शिंग मध्ये टॉमी अडकलेला दिसला.

जाफराबादी म्हशींची शिंग म्हणजे गोल वळवलेली इंग्रजी सि ची. च्या आकाराची. आता टॉमी नेमका शिंग मध्ये नेमका कसा काय जाऊन बसला?


    त्याचं झालं असं की म्हशी जेव्हा रवंथ करत होत्या तेव्हा टॉमी आणि त्याचे मित्र उगीचच सगुणा आणि बाकीच्या म्हशींच्या भोवताली, म्हशींच्या च्या अंगावरती खेळत होता. सगुणा शिकारी कुत्रा  एकदम शांत, आपलं रवंथ करणं चालूच होतं. टॉमी आणि त्याच्या मित्र मंडळाची म्हशींच्या अंगावरुन उड्या मारून इकडे तिकडे जा असा खेळ चालू होता. खेळता खेळता म्हशींच्या डोक्यावरून उडी मारली तेव्हा त्याची उडी चुकली आणि नेमका तोच सिंगा मध्ये जाऊन अडकला. त्याचं तोंड सगुणाच्या तोंडापाशी होतं, तिला घाबरून तो अजून अजूनच बाहेर पडायचा प्रयत्न करू लागला. टॉमीच तोंड एवढ्या जवळ आलेला बघून, बघून सगुणा घाबरली, तिने जोराजोराने डोके हलवले. जसे डोके हलवले तसा टॉमी आता शिंगावरती तरंगायला लागला.

आणि जेव्हा सगुणा उठली तेव्हा तर मजाच झाली, टॉमीला कळेना काय करावे तसेच कसा तो पूर्ण पुढच्या दोन पायावरती उभा राहिला, त्याची शेपूट आणि मागचा भाग तसेच त्याचे मागचे दोन पाय शिंगाच्या त्या बाजूला राहिले.

     रघु गवळ्याच्या लक्षात हा प्रकार आल्यावरती पहिले तर त्याला हसूच आवरेना. त्यांनी आपल्या खांद्यावर चे कांबळे काढले. कुत्र्याच्या तोंडावरती धरले आणि त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. पण कसले काय ! शिंग एवढे लहान होतं की काही केल्या टॉमी बाहेर निघेना. टॉमी कळवळून रडायला लागला.

 टॉमी रडला, ओरडला की सगुणा पण जोरात डोके हलवे.

    तशीच वरात रघुने गावाकडे वळवली. गावातले पोरंसोरं गम्मत बघायला आले शिंगा मध्ये अडकलेला टॉमी.

रघु चे मित्र म्हणाले की शेपूट धरून मागच्या बाजूने ओढा. पण तसे केले तर टॉमी दात विचकून चावायला येत होता. परत टॉमी म्हशीला ला देखील चावायचा म्हणून दर वेळेला टॉमी च्या तोंडावर कांबळे टाकून त्याला बाहेर काढायचा प्रयत्न चालू केला.

      अंगणात बसलेले म्हातारे आजोबा म्हणाले, "काही करू नका, वैरण घाला आणि टॉमीला भाकर तुकडा घाला."" दोघांना पण पाणी पाजा" ओरडून ओरडून टॉमी चा घसा सुकला असेल " टॉमी जसा आत शिरला तसाच तो बाहेर येईल त्यामुळे तुम्ही ढकलाढकली करू नका "

   रघु च्या आईने टॉमी साठी भाकरतुकडा आणि पाणी आणले, सगुणI ला देखील पाणी पाजले.

अर्धा-पाऊण तास शांतते मध्ये गेला.

    रघु चे आजोबा शांतपणे हुक्का पीत खाटेवरती बसले होते. ते उठले, त्यांनी सगळ्यांना दूर जायला सांगितले. टॉमीच्या डोक्यावरून हात फिरवला, सगुणी ला देखील मायेने थोपटले. नाही म्हटलं तरी टॉमीचे दहा किलोचे वजन सगुणी च्या शिंगावरती होते.  

     सगुणा धडपडत उठली. भाकरतुकडा खाल्ल्यामुळे आणि पाणी प्यायला मुळे टॉमी आता हुशार झाला होता. त्याला तरतरी आली होती.

आजोबांनी घरातून रबरी साप बाहेर आणला, सगुणी च्या डोक्यावरती कांबळे टाकले, म्हणजे ती घाबरू नये, आणि झटकन साप टॉमी समोर धरला.

लोंबकळणारा टॉमी आता अंग आक्रसून मागे मागे जाऊ लागला, आजोबांनी हळूहळू साप पुढे आणला तसा टॉमी अंग चोरून  शिंगI तून मागे मागे जाऊ लागला. सरतेशेवटी टॉमी स्वतः , सापाच्या भीतीमुळे शिंगIतून बाहेर पडला आणि शेपूट पायात घालून पळत सुटला.

  सगुणाच्या डोक्यावरचे कांबळे आजोबांनी काढले, आणि परत खाटेवर बसून हुक्का प्यायला सुरुवात केली.

जमलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि आनंद व्यक्त केला.


Rate this content
Log in