सासर माझे भाग्याचे
सासर माझे भाग्याचे


सुशांत आणि सारिका अगदी हॅप्पी कपल.. त्यात आलेली गोड बातमी त्यामुळे सासूबाई अगदी कौतुक करत होत्या..
सुशांतला बाबा नव्हते, त्यामुळे आई, आजोबा, त्याचा भाऊ एवढंच त्याच आयुष्य होते.. सारीका आणि सीमा दोघीच बहिणी अन् त्यांचे आई- बाबा..
सीमाचे लग्न आले होते अवघ्या १५ दिवसांवर, तयारी सुरू होती. सुशांतचे आजोबा वॄद्धापकाळाने गेले.. आता काय कस होणार? अनेक प्रश्न उपस्थित झाले.. आजोबा गेले अन् सीमाचे लग्न, बरं सर्व काही सुशांतच बघत होता.. सारीकाचे बाबा विचारात असताना, सुशांत म्हणाला बाबा काही काळजी करू नका.. कार्य नंतर आहेत त्यामुळे मी येईन, मी सर्व व्यवस्था करेन.
अहो, पण जावई बापू तुम्ही कसे याल? बाबा म्हणाले.
सुशांतची आई म्हणाली, अहो झालं हे विधिलिखित.. पण आता होणार आहे तें तर व्यवस्थित व्हायला हव ना.. तुम्ही काही काळजी करू नका तें दोघेही येतिल, तुम्हाला मदत म्हणून थांबतील, फक्त सूतक आहे त्यामुळे कोणते विधी करणार नाहीत.
ठरल्या प्रमाणे दोघे गेले, सारीकाने बहिणीचे लग्न असून सुद्धा मेहंदी काढली नाही, साधी साडी, साधे कपडे घालून तें सर्वांच्या मागे बसायचे, काही मदत लागली की, किंवा जेवण व्यवस्था बाकी सर्व सुशांतने अगदी जबाबदारीने पार पाडली. बाबांनी त्यांचे आभार मानले, बाबा म्हणाले मी नक्कीच काहीतरी पुण्य केलंय म्हणून तुमच्या सारखे जावई मिळाले..
अहो बाबा, असे नका म्हणू.. सुशांत
इकडे सुशांतच्या आत्याने घर डोक्यावर घेतले, काही कळंत की नाही तुम्हाला? बाप लवकर गेला म्हणून आजोबांनी तुमच्या साठी काय काय केलं सारं विसरलात? काय गरज होती वहिनी तुम्ही पण पाठींबा दिलात...
अहो ताई, हेच लग्न जर आपल्या समीरच असते आणि तीच्याकडच कॊणी गेल असते तर? तिला सांगितलं असत का तीच्या माहेरच्यांनी लग्नाला जाऊ नको?
अस कस सासर आहे तीच? आत्या बाई
अहो ताई तेच तर, नाते तेच आहे मग् नियम आपण का वेगळे करायचे?
तिकडे जाऊन त्यांनी दोन्ही बाजू अगदी छान सांभाळल्यात, ती दोघेही तिथे जबाबदारी म्हणून गेलेत हौस करायला नाही. अन् हि गोष्ट त्यांना कॊणी सांगितली नाही त्यांना स्वतःहून तें कळालं की आपण कस वागायला हव.. मला खरच कौतुक आहे माझ्या सून बाईच आणि मुलाच..
आत्या बाई तोंड वाकडे करत बोलल्या चढव अजून डोक्यावर बसव. लग्न पार पडले, लोकं दोन्ही बाजूने बोलत होते. दुसऱ्या दिवशी आजोबांचे दहावे अन् मग् कार्य सगळी जबाबदारी सारीका अगदी लक्ष देऊन पार पाडत होती.. आत्याबाई मात्र आल्या पासून टोमणे मारत होत्या. सासूबाईंनी सांगितल्यामुळे ती दुर्लक्ष करत होती..
सर्व आवरले, पाहुणे घरी गेल्यावर सारीका सासूबाईंजवळ येऊन खूप रडली, आई तुमचे आभार कसे मानू मला कळतच नाही, आत्या बाईंचा रोष स्विकारलात, तुम्ही घेतलेला निर्णय पार पडेपर्यंत तुम्ही सर्वांशी आमच्यासाठी लढलात, मी... तिला हुंदका आवरेनासा झाला, सासूबाई म्हणाल्या अग नाते दोन्हीकडचे जपायला हवे, अन् तुझे काय अन् सुशांतचे काय नाते एकच.. मग् नियम कशाला वेगळा करायचा??
दोघीही सासू सून यांनीं एकमेकांना मिठी मारली.
समाप्त...