साहित्य आणि पुरस्कार
साहित्य आणि पुरस्कार


आजकाल साहित्य हे लोकशाहीचे महत्त्वाचे अंग आहे. म्हणून दर्जेदार साहित्य निर्माण होणेे काळाची गरज आहे. दर्जेदार लेखन करणाऱ्या साहित्यिकाला आर्थिक मदत शासनाकडून व्हावी. भावी पिढीचे आधारस्तंभ म्हणून उत्तम साहित्याला प्रामाणिक न्याय मिळाला पाहिजे. साहित्यिक व त्याचे साहित्य देश घडवत असतो. अशा योग्य साहित्याची निवड व पुरस्कार मिळाला पाहिजे. त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले जावे. त्यात कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधीचा शिरकाव नसावा.
नवोदित कवी, लेखक व त्यांचे साहित्य याला योग्य सन्मान मिळाला पाहिजे. साहित्य प्रकाशित करताना
जात, धर्म, पंथ, भाषा, प्रदेश असा भेदभाव करू नये.
वृत्तपत्रानी चांगल्या साहित्याला वृत्तपत्रातून प्रकाशित करावे. पुरस्कार नवोदित कवी, लेखकांना देण्यात यावा. राज्य पुरस्काराची निवड ऑनलाइन पद्धतीने व्हावी.
भारतीय संस्कृती टिकविणे आवश्यक आहे. ती टिकवायची असेल तर समाजपरिवर्तन करणाऱ्या साहित्याला न्याय मिळालाच पाहिजे. आदर्श पिढ्यांसाठी आदर्श लेखन झाले पाहिजे. लेखन काळानुरूप असावे. ते वास्तववादी, प्रेरणादायी असावे. इतिहासाची जाणीव करून देणारे असावे. साहित्यिकांचा मान सन्मान राखावा . शासकीय सेवा सवलती मिळाव्या. त्यांना वृद्धापकाळात पेन्शन मिळावी. साहित्यिकांचे ऑनलाइन सर्व्हे करून पुरस्कार देण्यात यावा. साहित्यात जात, धर्म, पंथ अशा ,गोष्टीला स्थान देऊ नये. विचारांचा सन्मान केला पाहिजे. साहित्यात सहिष्णुता असली पाहिजे.