दिपमाला अहिरे

Children Stories

3  

दिपमाला अहिरे

Children Stories

रम्य ते बालपण..

रम्य ते बालपण..

2 mins
234


बालपणीच्या आठवणीत मन गेले की,आठवतात ते सुट्टीचे दिवस.शाळेला लागलेल्या सुटृट्या मग त्या कोणत्याही असो.दिवाळीच्या असो की, उन्हाळी सुट्टी.

आनंद तो वेगळाच असायचा.


 उन्हाळ्याची चाहूल म्हणजे सुट्टी चे आगमन.लहानपणी उन्हाळा आला की एक वेगळाच हुरूप आणि उत्साह असायचा.सर्वात आधी नजरेसमोर यायचा तो मामाचा गाव.गावी जाऊन पुन्हा ती वर्षभराची मौजमस्ती, धिंगाणा या सर्वांचे चित्र डोळ्यासमोर उभे रहायचे.


उन्हाळ्याची सुट्टी गावच्या ठिकाणी सहकुटुंब, सहपरिवार यांच्या सोबत आनंद साजरा करण्याचे दिवस असायचे.मामाचे, मावशीचे मुलं मुली गल्लीतील इतर नव्याने झालेले मित्र, मैत्रिणी

सारे जमल्यावर छान धम्माल करायचो.


"लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा." लहानपण हे निरागस असते.लहानपणी केलेली मज्जा काही औरच असते.लहानपण हे खेळण्या बागडण्याचे असते, नाही कसला ताण फक्त बालपण स्वच्छंदी विहार करते.


माझ्या लहानपणी मामाच्या गावी गेल्यावर रोज शेतात जायचे.आणि खरी मजा असायची ती बैलगाडीवर बसण्याची.सर्व भाचे मंडळी बैलगाडीत बसली की मामा जोरात गाडी पळवायचा.आणि आंम्ही सर्वे जोरजोरात ओरडायचो "अजुन जोरात पळव मामा गाडी." झाडावरच्या कैऱ्या, करवंद, जांभूळ काढुन खायची मजा असायची.नदीवर जाणे, पाण्यात पोहणे, डुबकी मारणे, लगोरी खेळणे.पुर्ण दिवस त्या थंडावा देणाऱ्या वाळुत आंम्ही शंख,शिंपले वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगांचे दगडं शोधत बसायचो.

वेळ कधी निघून जायचा कळायचे नाही.कधी कधी तर सकाळची संध्याकाळ ही होऊन जायची.


उन्हाळ्याची सुट्टी ही खुप साऱ्या गोष्टींनी भरलेली असायची. यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे आंबा आणि आईस्क्रीम या दोन गोष्टी.आंब्याचा रंग,स्वाद,चव आणि खाऊन झाल्यावर मिळालेले समाधान. जेवणात रोज मिळणारा थंडगार आमरस

याशिवाय आईस्क्रीम चा थंडावा आणि गारवा कोण विसरेल. घरोघरी जाऊन आईस्क्रीम विकणाऱ्या आईस्क्रीम वाल्यांची वाट बघण्यात तर पुर्ण उन्हाळ्याची सुट्टी जायची.त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम असायचे.

एकंदरीत आमच्या लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी ही अशाप्रकारे मौजमजेने आणि आठवणींने भरलेली असायची.जो या सुट्टीचा योग्य नियोजनबद्ध उपयोग करतो. त्याला मजे बरोबरच वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी ही शिकायला मिळतात.स्वत: च्या व्यक्तीमत्त्वाचा विकास करण्यासाठी, स्वतः तील कला आणि कौशल्याचा विकास करण्यासाठी. व्यवहारीक आणि व्यावसायिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी उन्हाळ्याची सुट्टी ही योग्य काळ असतो.परंतु हे सर्व करतांना सुट्टयांची मजा मात्र अनुभवायला विसरू नये.

कारण यातुनच अनेक आठवणी आपल्याकडे जमत असतात.आणि एकदा हातातुन गेलेले बालपण पुन्हा कधीही मिळणार नसतं.आणि या बालपणीच्या आठवणीच आयुष्याची खरी कमाई असतात...


Rate this content
Log in