" प्रवास "
" प्रवास "
आज नेहमीप्रमाणे सकाळी उठलो व ड्युटी वर गेलो . साधारण एक तासाने मला ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं व साहेबांनी माझ्या हातात एक पाकीट दिलं तुमची ट्रान्सपर झाली आहे . अभिनंदन ! मात्र मला एकदम अचानक धक्का बसला .कारण नसताना का ? ट्रान्स्फर झाली . असेल झाली हे पत्र फोडल्याशिवाय कळणार नव्हतं . म्हणून मी मटकन खाली बसलो आणि फोडून वाचू लागलो . दुसऱ्या तालुक्यात शंभर किलोमीटर अंतरावर माझी बदली झाली होती . व दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचायचं होत . दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो . जेवणाचा डबा घेतला व बसणे स्टेशनवर पोचलो . प्रथमत रेल्वे स्टेशन ,रेल्वेचा लांबचा प्रवास . करण्याची वेळ होती . रेल्वेचा पास कसा असतो . व तो काढावा लागतो . याचीपूसटची कल्पनासुद्धा मला नव्हती . बुकिंग ऑफिसवर खिडकीजवळ पोचलो तिकिट घेतले .आणि रेल्वेची वाट पाहत बसलो . रेल्वे स्टेशन वर भरपूर गर्दी होती कुणी ओळखीचे आहे का ? म्हणून मी शोधू लागलो कारण रिझर्वेशन च्या बोगी व जनरल च्या बोगी ( डब्वा ) हे स्वतंत्र असतात . आपल्याकडे जनरल तिकीट असल्याने जनरलची बोगी समोर बघितली . भरगच्च भरलेली होती . दरवाजा मध्ये सुद्धा चढता येत नव्हते अशी अवसस्ता .त्याच रेल्वे येताना जागा शोधली .स्टेशनला थांबली तेव्हाच एक ओळखीचे शिक्षक मला दिसले मी पण त्यांचे जवळ बसलो . त्यांना म्हणालो सर तुम्ही कुठे आहात त्यांनी गावाचं नाव सांगितलं मी पण त्याच शाळेत त्यांनी अभिनंदन केलं व एका रिकाम्या सीटवर वर बसायला सांगितलं . आम्ही दोघ बसलो दहा-पंधरा मिनिटात काळे कोट घातलेला रेल्वे टिकीट चेकर (टीसी ) म्हणतात पहिल्यांदा त्यांना जवळून बघितले ते तिकीट चेक करत करत जवळ येई तो पर्यंत मी म्हणालो सर माझ्याकडे जनरलचे तिकीट आहे .उतरूण जावू का ?नको फक्त हाताची खून केली . विचारलं कि चार बोट दाखवायचे . व सीजन पास म्हटले .माझ्या आत त्या सरानींच चार बोटाचे चिन्ह केलं . चे कर पुढे गेला . पुढे एक दोन स्टेशन सोडत प्रवास चालु होता दोन तासा नंतर इच्छित गावी आम्ही स्टेशनवर उतरलो . कोणत्या दिशेला ? आणि उड्डाणपुलावरून कि खालून जायचे त्याची कल्पना नव्हती . मात्र सरांच्या मागे मी निघालो त्यांनी सरळ रेल्वे रूळावर बोलत बोलत रस्ता काढला आणि पाच मिनिटाच्या अंतरावर आम्ही शाळेत जाऊन पोहोचलो .तो माझा आयुष्यातील पहिल्या प्रवासाची सुरुवात होती . तेथे रुजू झालो . काम स्वीकारले व कामाला सुरुवात केली .पुन्हा बॅग घेऊन घंटा होण्याच्या आत पळायचं असतं याची मला कल्पना नव्हती . कारण दहा मिनिटांनी स्टेशन वर गाडी येत असत .त्यामुळे बॅग घेऊन अगदी मुलांच्या पुढे पळावे लागत . दहा मिटांत स्टेशनवर नाही पोहोचला तर ती गाडी गेल्यानंतर दीड तासाने दुसरी गाडी होती .त्यामुळे येताना रात्री चे दहा ते अकरा वाजत . व ती गाडी न चुकल्यास आठ साडे आठ वाजेपर्यंत आम्ही पोहोचत असू . त्यामुळे तो धावपळीचा प्रवास ! झाला . येताना मात्र गाडीमध्ये फ़ुलाची तोडलेला कळी सुकानी तसा आमचा चेहरा सुकत असे व गाडीत येंत ना उभे रहाणे इतकी सुद्धा जागा मिळत नव्हती . त्या तालुक्याच्या गावापासून नाशिक पर्यंत उभ्याने प्रवास ! नाशिकला कुठे तरी सिट रिकाम झालं तिथे बसायचं आणि पुढे जंक्शन च्या ठिकाणी मनमाड येथे उतरायचे . कोणती गाडी या स्टेशन पर्यंत असायची व राहिलेल्या प्रवास त्या पुढील दुसऱ्या रेल्वेने करायचा असतो .अर्ध्या तासाने ती रेल्वे येत परत या रेल्वेकडे धावायचं कोपर्याला उभ राहायचं व प्रवास केल्यानंतर गावी येऊन पोहोचायचं . असा हा माझा जीवनाचा प्रवास झाला . मात्र इतरांसाठी रेल्वे प्रवास म्हणजे ,ट्रीप एन्जॉय 'सहल आणि प्रवास म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचा आनंद लुटणे .मात्र आमच्या रोजच्या प्रवासामध्ये तोच रस्ता आणि तोच आजूबाजूचा परिसर . रोज बघत असल्यामुळे हळूहळू तो प्रवास कंटाळवाणा वाटू लागला रोज तेच चेहरे दिसत असल्याने ओळखी वाढत गेल्या अनेक मित्र वाढत गेले . अनेक मित्र भेटले . त्या मैत्रीमध्ये फक्त प्रवासी एवढे एकच "नातं "आणि एकमेकांची चौकशी करणे व आफिस च्या वेळा आणि एखाद्या दिवशी एखादा प्रसंग व प्रवास येईल ते सांगता येत नाही .एकमेंकाची आपुलकीने व प्रेमाने चौकशी करत . हळूहळू या प्रवासी मित्रांची एवढी मैत्री झाली . कि ते अगदी फार जवळचे मित्र वाटू लागले . फक्त प्रवासी ;सरकारी प्रवासी ,एवढे एकच नातं आमच्यामध्ये असायचं .कोण? कोणत्या जातीचा ? कुठल्या समाजाचा व कोणत्या स्तरा तून आलेला आहे स ?. याची ओळख फार दिवसानंतर होत .असाच माझा एक सहप्रवाशी साधारणतः ओळखी की अंती कळाले कि तो मुस्लिम समाजाचा व मी हिंदू समाजाचा मात्र आमची मैत्री एवढी घट्ट झाली की जणू भावडांन प्रमाणे एकमेकांसाठी जागा राखून ठेवणे . आमची रेल्वेचे ती सुद्धा ठरलेले असायचे तेंव्हा मोबाईल खिशात बाळगणे इतका प्रसार नव्हता . त्यामुळे फक्त इंजिन पासून दुसरी बोगी किंवा तिसरी बोगी (डब्बा ) ठरलेला असायचा . असा हा माझा मित्र सुट्टीच्या दिवशी सुद्धा आम्ही भेटत मग शेवटी मी त्यासाठी मनमाड या जंक्शन च्या ठिकाणी रहाण्यासाठी गेलो . त्यामुळे तेथून पुढील प्रवास सोयीचा होऊ लागला . कारण ? सकाळी सुटणारी रेल्वे तेथून सूटत असल्याने व येतानां त्याच स्टेशन पर्यंत येत असल्याने जागा मिळत . कारण पुढील रिझर्वेशन त्या रेल्वेमध्ये नसल्याने निवांत पणे जागा मिळत .दिवसभर कष्ट केल्यामुळे आणि बडबड केल्यामुळे येतानां चा प्रवास जणू कोमेजलेल्या फुलांप्रमाणे चेहरे होत . त्यामुळे उतरल्यानंतर येताना व जाताना चहा घेणे . तात्पुरते फ्रेश होणे असा आमचा दिनक्रम सुरू होता . एक दिवस काही कारणाने सर्व रेल्वे लेट असल्याने तीन चार तास बसावं लागे .भूक लागली की बिस्किट व पाव वडे खाणे वा टाईमपास करणे . शिवाय दुसरा पर्याय नव्हता . कारण दुसरा पर्याय अवलंबिला तर थोड्या प्रवासासाठी चार ते पाच तासाचा वेळ आवश्यक होता . मात्र दोन तासाने जरी रेल्वे आली तरी आम्ही लवकर पोहोचत ! असल्याने रेल्वे म्हणजे आमचा प्रवास !धावत्या रुळावर ज्याप्रमाणे रेल्वे अपडाउन करते . त्याप्रमाणे जीवनाचा प्रवास चालू होता. एकदा स्टेशनवर सर्व मित्र बसलेले होते . आणि कुठेतरी एक ट्रिप सहल आयोजित करूया . असं सगळ्यांचे ठरलं आणि मग साधारण तासाभराने एका ठिकाणावर शिक्कामोर्तब झाले . "गोवा "या ठिकाणी सहलीला जाऊ या ? गोवा या ठिकाणी निसर्गरम्य ! ठिकाण व कोकण रेल्वे कोकनात ना जवळजवळ पन्नास ते साठ किलोमीटरचा प्रवास डोंगरातून ! बोगद्यातून केलेला प्रवास ! व कोकणचा निसर्ग , सौंदर्य जणू काही स्वर्गात आल्यासारखा भास होतो. हे जेंव्हा मी तिच्या सौंदर्याच्या ठिकाणी सूटिच्या कालावधीमध्ये जाण्याचे सर्वांचे ठरलं आणि मग प्रवासासाठी आधीपासून बॅगा भरण्याची तयारी सुरू केली . बॅग हि आपल्या जवळची प्रवासी बॅग ही जास्त जड होता कामा नये मात्र आवश्यक त्या सर्व गोष्टी या घ्यावाच लागणार होत्या .ड्रेस ,स्वेटर . कांबळ हे घेणं आवश्यक होतं . आणि एक दिवस आम्ही मनमाड येथून रेल्वेचे रिझर्वेशन मुंबईपर्यंत केल . कारण मुंबईहून कोकण रेल्वेचा प्रवास सुरु होता आणि ती रेल्वे रात्री एक-दीड ला असल्याकारणाने आम्हाला आदल्या दिवशीच बॉम्बेला जाणं आवश्यक होतं . म्हणून एक दिवस आधी गेलो . तेथे एका गेस्ट हाउस मध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली होती
. त्यामुळे आम्ही निवांत होतो .मात्र जेंव्हा तेथे सायंकाळी पोहोचलो . तेंव्हा तिथे कोणातरी मंत्र्याचा दौरा असल्याकारणाने आम्हाला ते गेस्ट हाउस मध्ये रहाता येणार नाही . व साधारणत पंधरा वीस लोक असल्याकारणाने हॉटेल परवडणारे नव्हते . मग शेवटी एका मित्राने एका सोसायटीच्या ऑफिसमध्ये राहण्याची व्यवस्था केली .तिथे फक्त एक बाथरूम ' संडास , टॉयलेट होतं आणि तेथे असणारे टेबल खुर्च्या बाजूला करून आम्ही तेथे सगळ्यांनी बिछाना टाकला व बाहेर हॉटेलवर जेवण करून आल्यानंतर ती रात्र काढली . दुसऱ्या दिवशी आमचा कोकण रेल्वे प्रवास सुरू झाला .कशासाठी ? पोटासाठी ? कशासाठी ? पोटासाठी ?रेल्वे कशी चालते ?त्या निसर्गाचा .सौंदर्य न्याहाळत आम्ही रेल्वे मध्ये बसलो . रिझर्वेशन असल्याकारणाने सर्यांना स्वतंत्र स्वीट होती . त्यामुळे आम्हाला निवांत बसता येत होते . झोपता येत होते . साधारणता एक दिवसभराचा प्रवास असल्याकारणाने आम्ही सहप्रवाशी रेल्वेमध्ये मनमुराद आनंद घेत होतो . रेल्वेची बोगी म्हणजे त्यांना स्वतःचा बेडरूम . वाटत त्यामूळे नाईट कपडे घालून सगळे निवांत फिरत होती . एन्जाय करत होती. एकमेकांनी आणलेले खाऊ खाऊन ! मित्र पत्ते खेळत बसले व आमचा प्रवास सुरू झाला .त्यांना वाटले की प्रवासाचा आनंद हा काय असतो . हे खरा प्रवास केल्यानंतर कळते .सहल म्हणजे काय असते . आणि निसर्ग सौंदर्य म्हणजे काय ? स्वर्ग म्हणजे काय ? या पृथ्वीतलावर निसर्गाने खरोखरच स्वर्ग निर्माण केल्याचा भास तेथे गेल्यानंतर होतो . डोंगरावरून पडणारे धबधबे . तुषार सिंचन ना सारखे पडणारे पाणी आणि या धरणी मातेने अंगावर हिरवळीची झालर पांघरून त्यावर विविध रंगांची फुलं हे धरणी मातेने विविध रंगाचा शालू पांघरलेल्या चा भास होत होता . स्वर्ग म्हणजे काय त्याची जाणीव आम्हाला प्रवासामध्ये होत . साधारणता रात्रीच्या वेळेस आम्ही गोवा येथे पोहोचलो तिथून स्टेशन वरून जवळच्या बीचवर गेलो पोटात कावळे काव काव करत होती .व आम्ही बीच वर पोहचलो . हॉटेलवर जाण्यासाठी टॅक्सीवाले पुढे सरसावत .प्रत्येक रिक्षा वाला सिट मिळावेत व आपला धंदा व्हावा या दृष्टीने पुढे येत . आम्ही टोटल बावीस लोक होतो . त्यामुळे चार टॅक्सी केल्या व आम्ही एका हॉटेलमध्ये पोहोचलो . व हॉटेल मध्ये प्रत्येकी पाच व्यक्तीप्रमाणे साधारणता पाच खोल्या बुक केल्या . आम्ही फ्रेश झालो बॅगा ठेवल्या आणि बाहेर फिरण्यासाठी निघालो प्रथम सर्वांना भुका लागल्या कारणाने जेवणाची सोय करण्याची गरज होती . म्हणून आम्ही बीचवर गेलो तेंव्हा वेळ रात्रीची असल्याने बीच वर जाऊन समुद्राचा आनंद घेण्यासाठीची अपेक्षा होती .ती अंधारामुळे पूर्ण होऊ शकणार नव्हती .तरीही हॉटेल पासून जवळच तेथे पोचलो .बीचवर मात्र अगदी टोपल्यांमध्ये विक्रेते मद्याच्या बाटल्या , फेरीवाले विकत होते .आपल्या राज्यामध्ये वाईन शॉप मध्ये गेल्याशिवाय ज्या बाटल्या भेटत नाही . त्या तिथे मुक्तपणे बीचवर फेरीवाल्यांकडून मिळत असत . हो तेही आपल्यापेक्षा कमी किमतीत . किमती कमी होत्या त्यामुळे सगळ्यांनी बियर पिण्याचा आनंद घेतला . बरोबर असणारे विविध प्रकारच फरसाण .स्नॅक्स , खाऊन निवांतपणे येथेच्छ पणे वाळूवर खूप वर्षांनी घरच्या मंडळीनां सोडून आनंद घेतला . साधारणता रात्रीचे दहा अकरा वाजले तरी जणू काही स्वर्गात असल्याचा भास .आनंद उपभोगत होतो . बॅच वर असलेल्या वाळूवर लोळणे त्या वाळूवर एवढी स्वच्छता कि अंगालाही वाळू लटकत नव्हते . समुद्राच्या किनारी स्वर्गसुखाचा आनंद घेतला . आणि हळूहळू बारा एक वाजेपर्यंत आमच्या रूम कडे प्रयाण केले .तेव्हा हे सर्व सहप्रवाशी अगदी एकमेकांना काल मित्रासारखे वाटत व आज चा इतका ऋणानुबंध निर्माण झालेला होता की कित्येक वर्षापासून एकत्र असल्याचा आनंद घेत होते . अगदी रक्ताच्या नात्यापेक्षाही हे मैत्रीचं नात घट्ट झालं होत .ते केवळ प्रवासामुळे ! सहप्रवासी चे रूपांतर खऱ्या मित्रांमध्ये झाले होते .अशाच तऱ्हेने साधारणता रात्री मोठ्या होडीवर विविध प्रकारचे डान्स ,रंगीत ऑर्केस्ट्रा चा आनंद लुटला .त्यामध्ये आमच्या कित्येक प्रवाशांनी स्टेजवर जाऊन नाचण्या चा आनंद घेतला . साधारणता चारदिवस आमचा मुक्काम .मात्र दिवस आणि रात्र घड्याळाकडे कधी पाहण्याची वेळ सुद्धा मिळत नव्हता .अशा पद्धतीने आमची सहल .जीवनात मिळणारा आनंद काय असतो . हे सर्वच घेत होते . त्यामुळे कुणालाही आपल्या घरच्यांची आठवण सुद्धा येत नव्हती .आपण जणू पृथ्वीतलावरून स्वर्गात आहोत कसा भास होत होता .आणि चौथ्या दिवशी आमच्या परतीच्या प्रवासात रिझर्वेशन असल्याने तिथून निघावं लागलं . निघताना . आपल्या बॅगमध्ये साधारणता एक दोन कोणी तीन चार बाटल्या कपड्यांमध्ये वाइनच्या बाटल्या घेतल्या होत्या .मात्र जेंव्हा स्टेशन मध्ये आलो तेंव्हा मात्र गेट मध्ये चेकिंग ! पोलिसांची चेकिंग ! सुरू होती .कारण गोव्याहून बाहेर जाताना वाईन च्या बाटल्या दुसऱ्या राज्यात नेण्यास बंदी होती . रेल्वे मध्ये सुद्धा होती . मात्र आमचे सहप्रवासी एवढे चालक ! काही मित्र रिकाम्या बॅगा घेऊन पुढे गेलेत आणि त्यांच्याबरोबर दुसरे चार मित्र अशा पद्धतीने न चेक करता न तपासता शिरलो .जेव्हा रेल्वेने परतीचा प्रवास सुरू झाला . प्रवासाचा आनंद परतीच्या प्रवासाचा आनंद ! जणू स्वर्गच ! सुटल्याचा भास होत होता .आम्हा कोकण रेल्वे मध्ये बसलो तेव्हां डोंगराच्या बोगद्यामध्ये रेल्वे शिरत व जेंव्हा बाहेर निघत तेव्हा आपण स्वर्गातून पृथ्वीवर आल्याचा भास होत होता . पहिले बोगद्यातून बाहेर पडत जणू पृथ्वीच्या गर्भातून पृथ्वीवर अवतरल्याचा भास होत .परत दुसऱ्या दुसऱ्यांदा अशा रीतीने आमचा परतीचा प्रवास सुरु झाला यांच्या साधारणता दोन दिवसाच्या प्रवासामध्ये आमच्या मित्रांनी एकमेकांच्या आणलेल्या बाटल्या रिकामा करणे व रिकाम्या झालेल्या बॉटल दुसऱ्याच्या भरलेल्या जाणी ठेवणे त्यांना आग्राहाने बोलणे आणि मोठ्या आनंदाने सांगणे अरे तुझ्या असू दे ! हे माझ्या बागेत भरपूर बोटल आहेत . घेऊया ! त्यात मित्रांना आग्रा करून देणे .जेव्हां परत जंक्शनच्या ठिकाणी रेल्वेने उतरलं आणि एकमेकांच्या बॅगा एकमेकांनी उघडुन पाहिल्या तेंव्हा बऱ्याच मित्रांना धक्का बसला . याच बॉटल यांचा आग्रह आपल्याच व्हायचा आणि त्यात रिकाम्या बॉटल आपल्याच बॅगमध्ये .मात्र आनंद या गोष्टी पुढे काहीच नसल्या कारणाने अशा पद्धतीने रेल्वे प्रवास संपला . परत आमचा जुना तोच जुना प्रवास सुरू झाला . तीच रेल्वे . तीच वेळ .तेच काम . असा हा जीवनाचा प्रवास आजही आम्ही करित आहे . त्याच ठिकाणी . आहे त्याच पद्धतीने . करत आहोत . हो यालाच जीवनाचा प्रवास असे म्हणतात .
