प्रेम
प्रेम
1 min
1.5K
राधाचं श्रीकृष्णावर खूप खूप प्रेम होतं, जसं तिचं प्रेम तशी मिराची त्याच कृष्णावर भक्ती होती. पण तो होता फक्त आणि फक्त रुक्मिणीचाच.
पुराणातली ही गोष्ट तिलाही माहीत होती आणि आपल्या जीवनात तिने अनुभवली आणि स्वीकारली सुद्धा. तिचा कृष्णदेखील त्याच्या रुक्मिणीचाच राहिला.
मात्र, ह्या राधेने म्हणा किंवा मीरेने म्हणा एक गोष्ट केली. मरणोत्तर आपले अवयव दान करण्याच्या त्या कागदाच्या तुकड्यावर तिने contacts ह्या रकान्यात आधी त्याचं नाव लिहिलं.
तिला जन्म नाही करता आला त्याच्या नावावर म्हणून आपला मृत्यू ती त्याच्या नावावर करून गेली.