Rahul Ingole

Children Stories Tragedy Inspirational

3  

Rahul Ingole

Children Stories Tragedy Inspirational

पोळा

पोळा

6 mins
240


"बा उठ नं चल घराकडं रात पसून माय किती काळजी करायली माहित हाय का तुला" सुमणीचे हे शब्द ऐकताच नामदेव खडबडून उठून बसला. पाहतो तर मारतया व सुमनी त्याला मलूल चेहरा करून उठवत होते. त्यालाच कळत नव्हते आपण येथे कसे? मालकाच्या घरातील पत्राच्या ओसरीत काल दारू जास्त झाल्यामुळे नामदेव झोपला होता . काल दिवसभर पोळा साजरा करण्यात नामदेव मग्न होता. पोळा संपल्यावर मालकांनी दिलेली एक नाईंटी मारल्यामुळे नामदेव फुलटू होऊन मालकाच्या घरी झोपला होता. आपली बायको व दोन चिमुकले शेतात आखाड्यावर आहेत याचे त्याला भानच राहिले नव्हते. 


काल सकाळीच मालक शेतात येऊन पोळयाची तयारी करण्यास सांगत होता. तसा नामदेव पण मोठ्या उत्साहात पोळ्याची पूर्वतयारी करत होता. त्याने लवकर उठून बैलांना कॅनलवर नेऊन धूवून आणले होते. नंतर एक-दोन तासासाठी चरण्यासाठी सोडून घरी आला होता. घर कशाचे? ते तर खुराडेच! मातीचा चिखल करून त्यावर दगड विटांचे थर चढवून 'घर' तयार केले होते. "सुमने तुही माय कुठंय नामदेवने वोरडून विचारलं. तशी लक्ष्मी घरातून सारवन घेता-घेता म्हणाली, "आले त्या पोरीला कामून ओरडायले?"


"अगं आज पोळा हाय. बैलांना सजवून धजवून गावात नयावं लागल ना?" नामदेव शब्द खाली करून बोलला.

" माहित हाय. काल पासून लेकरं नांदवलेत काहीतरी गोड करा म्हणतेत." लक्ष्मी घरातून सारवनाचा हात धुत आली आणि दूरडी व भाजीचे पातेले घेत म्हणाली.

" हे बघ लक्ष्मी, मालक आज काहीतरी किराना माल भरून देणार हाय. गावात बैल नेता नेता सुमनी व मारत्याला माहयासंग पाठव." नामदेव भाकरीचा तुकडा चावत म्हणाला.


तशी लक्ष्मी फटकाऱ्याने म्हणाली, " येता-येता तुम्हीच आणा की! लेकराची कशाला बेजारी करता?" तसा नामदेव तिला शांत करत म्हणाला, "हे बघ आज पोळा असल्यानं पोळा फुटल्यावर बैलांना मालकाच्या भावकीच्या चार घरी तरी मिरवावं लागल त्यामुळं उशीर होईल."

"वय ते पण बराबर हाय" लक्ष्मी शांतपणे म्हणाली.


डोक्यावर व कपाळावर आलेला घाम पुसत नामदेव बोलत होता , आज मला तर मालकाच्या घरी जेवायला हाय. पोरांनी किराणा आणला की तुम्ही काहीतरी गोडधोड करून खा. मला यायला उशीर होईल तशी लक्ष्मी म्हणाली, बरं पोरांना आवाज द्या गावात जाताजाता."

ताटात हात धुऊन उठता उठता नामदेव म्हणाला," तीन सवा तिनला पोरायला झोरया घेऊन चींचच्या झाडापाशी पाठवून दे .घेऊन जातो व काही मालकांनं भरून दिलेलं सामान भरून पाठवून देतो.


बापाचं जेवण होईपर्यंत बाहेर चिखलाचे बैल करण्यात मग्न असलेले मारत्या व सुमनी धावत आले, "माय आज खरंच काहीतरी गोड खायला मिळेल मिळेल ना वं?" आईच्या कुशीत लडिवाळपणे जात सुमनी म्हणत होती.

लक्ष्मी म्हणाली, "व्हय, तुहया बापा संग जाऊन गावातून काही सामान घेऊन या."

आज काही गोड खायला मिळणार म्हणून सुमणी व मार्त्या दोघे पण आनंदात होते.


पोळा. वर्षातून येणारा बैलांचा सर्वात मोठा सण. मोठ्या उत्साहात बैलांची सगळीकडे सजावट चालू होती. तसा नामदेव पण तयारी करत होता. मालकाने आणलेल्या झुली, गोंडे, घुंगरमाळा घालून नामदेव बैलांना उत्साहात सजवत होता. वर्षभर साथ देणार्‍या त्या बैलजोडीला नामदेव जणूकाही जाणीवच करून देत होता की, "बघ तुझी मी किती काळजी घेतो". मालक पण मोठ्या तोऱ्यात इकडे-तिकडे मिरवत होता. मालकाला त्याच्या बैलाचं कौतुक गावात मिरवायचं होतं. पण बैलांना सांभाळणारा सालगडी पण त्यादिवशी बैलाप्रमाणे झकास दिसला पाहिजे, म्हणुन मालकानं नामदेवला पण नवाकोरा ड्रेस घेतला होता." नामदेव आता झक्कास जमलं बघा. नामदेव घातलेल्या नव्या कोरया कपडयाचं कौतुक करत मालक म्हणाला.

शर्ट-पॅंट, डोक्यावर टोपी, गळ्यात रुमाल, व बैलांना ओवाळतांना मालकिणीने लावलेला कुंकवाचा भंडारा नामदेवला शोभून दिसत होता. बैल जोडी व नामदेव उत्साहात होते. जणू त्यांचा आज वाढदिवसच होता!

"नामदेव, तुम्ही पांदीने बैल घेऊन या. लवकर गेले म्हणजे बरं. मालक मोटरसायकलवर बसत बसत म्हणाला.


मालक व मालकीण घराकडं रवाना झाले. आज गावात पोळ्याच्या मुहूर्तावर नाईंटी मिळणार या उत्साहातच नामदेव बैलजोडी घेऊन पांदीनं गावाकडे गेला. मारत्या व सुमनी तीन सव्वातीन वाजता चिंचच्या झाडापाशी बापाची वाट पाहत उभे होते. पण त्यांना कुठे माहित होते की, त्यांचा बाप एक वाजतात गावात गेला आहे. मारत्या व सुमनी बापाची वाट पाहून सव्वासहा वाजता आखाड्यावर परतले. लक्ष्मीला वाटले, पोरांनी सामान आणलं असेल? पण रिकामी थैली पाहून लक्ष्मी म्हणाली," काय रे मालकांना सामान दिलं नाही का"


तशी सुमनी हिरमुसल्या चेहऱ्याने म्हणाली, बा लवकरच गावात गेला. आम्हा दोघांना पांदीतून जातानी भीती वाटती."

तसा मारत्या म्हणाला," तूच तर त्यादिवशी बापाला म्हणत होती की, पांदीतून सांभाळून जात जा.

लक्ष्मीला वाटलं, आपला नवरा लवकर गेला म्हणजे संध्याकाळी लवकर सामान घेऊन घरी येईल.

" हे बघा पोरांनो तुमचा बाप काहीतरी किराणा सामान आनंल संध्याकाळी." लक्ष्मी म्हणाली.

"बर माय". म्हणत दोघं पोरं पोळा पोळा खेळण्यात रंगून गेली.

दिवस मावळत होता. सूर्य बुडण्याची घाई करत होता. तसा अंधार घाई करत होता. पाहता-पाहता नामदेव चा परिवार त्या आखाड्यावर अंधारात नामदेव ची वाट पाहत होता. बापाची वाट पाहून सुमनी व मार्त्या कंटाळून गेले होते. "माय बाप कवा येईल वं"? सुमनीनं विचारलं.

"येईल बाई आता, गावात बैलांना चार घरी फिरवावं लागतं ना?" लक्ष्मी तीची समजूत काढत होती.

"माय, मला आता भूक लागली". मार्त्या म्हणाला.

"हे बघा पोरांनो तुम्ही वरण-भात खाऊन घ्या तुमचा बाप आला की मी तुम्हाला उठून मालकांन दिलेल्या वाढन खाऊ घालते." लक्ष्मी म्हणाली. मायना दिलेलं वरण-भात खाऊन सुमनी व मारत्या तिथं चुलीजवळ आईच्या मांडीवर झोपी गेले.


गावात बैलजोडी घेऊन आला तसा मालकांन नामदेवला नायनटी दिली होती. बैल जोडी व नामदेव दोघं पण खूप आनंदात होते. पारावर पोळा भरला होता. सर्व गावातील बैलजोड्या आल्या होत्या. बैल व त्यांना सांभाळणारे देखील वेगळ्याच आनंदात हुंदडत होते. जणू बैलाबरोबर त्यांना सांभाळणार्‍या साल गड्यांचा देखील सण होता. सालगडी यांनी बैलांना व सालगडयाना मालकाने सजवले होते. पाहता पाहता पोळा संपला. एकच धावपळ झाली. सर्व बैल वेगाने धावत होते. नामदेव पण आपल्या बैलांना घेऊन मारुतीच्या प्रदक्षिणा घालण्यात स्वतः हरवून गेला होता. चार-पाच घरी बैलांना नैवेद्य दाखवल्यानंतर नामदेवने बैलजोडी मालकाच्या घरी आणली. बैलजोडीला पुरणपोळीचा घास चारल्यानंतर मालक नामदेवला म्हणाला, "नामदेव बैलं आपल्या गावच्या पांढरीत असलेल्या झोपडीत बांधुन या" पहिल्या नाईंटी ने फुल्टू झालेला नामदेव "बर मालक" म्हणाला. आपले लेकरं बाळ आपली वाट पाहत असतील याची मुळीच कल्पना नामदेवला नव्हती.


आपले सुमनी व मार्त्या चिंचच्या झाडापाशी आपली वाट पाहत असतील, याचा त्याला पूर्णपणे विसर पडला होता. त्याने झोपडीत जाऊन बैल बांधले. गावाकडे जाता जाता वाटेत मालक नाईंटी देत म्हणाला "हे बघा एवढे घ्या व जेवण करा मस्तपैकी. व जाता जाता पोराबाळांना थोडा गोडधोड घेऊन जा. "बरं मालक" म्हणत नामदेवने बाटलीत पोटात रिचवली. रात्रीचे आठ वाजले होते. गाव आता सामसुम होता. कुठेतरी बैलांच्या गळ्यातल्या घुंगरमाळा तालासुरात वाजत होत्या. घराघरातून खमंग असा सुगंध येत होता. पारावर नैवदयाचा खच पडला होता. आखाड्यावर नामदेवची पत्नी लक्ष्मी व दोन चिमुकले त्या अंधारात नामदेव ची वाट पहात होते. लक्ष्मी त्या पोरांना पदराने हवा घालत होती. तिच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले होते. घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते. धन्याला कुणी बोललं तर नसेल? का कुणी धन्याच्या भोळसरपणाचा फायदा घेत टिंगल-टवाळी केली नसेल?, का दारू लय झाल्यामुळे कुणास वेडेवाकडे बोललं तर नसेल?, कुण्या बैलाचा धक्का तर नसेल लागला?असे अनेक विचार मनात येतांना लक्ष्मीच्या पोटात गोळा उठायचा. नामदेव मालकाच्या घरी आला तेव्हा सर्वांचे जेवण चालू होते. मालकाने नामदेवला पण सोबत घेऊन पोटभर जेवू घातले. नामदेवने जेवण झाल्यावर तिथेच वोसरीत धरणीवर थोडा आराम करायचा व पंधरा वीस मिनिटानंतर शेताकडे जायचे असे ठरवून एक हात उशाला घेऊन झोपण्याचा प्रयत्न केला. पण दिवसभर बैलांच्या सजावटीत व त्यांना पारावर फिरवताना झालेल्या दगदगीमुळे नामदेवला सकाळपर्यंत जागच आली नाही.

" बा उठनं, चल घराकडं" हे सुमनीचे शब्द ेकताच नामदेव भानावर आला. रात्रभर नामदेव ची वाट पाहून सकाळीच नवऱ्याची खबर घेण्यासाठी लक्ष्मीने पोरांना मालकाच्या घराकडे पाठवले होते. मार्त्या व सुमनी कडे पाहून नामदेवला 3 सवा३ वाजताची वेळ आठवली. आपली वाट पाहून लेकरं उपाशी झोपली असणार? असं नामदेवला वाटू लागलं.


पोळा. खरंच बैलांचाच सण. वर्षभर शेतात राबायचे व एक दिवस पुरणपोळीचा घास खाऊन परत पुढच्या वर्षाच्या पोळयाची वाट पाहायची असा विचार करतच पडलेल्या चेहर्‍याने नामदेव, सुमनी व मार्त्या आखाड्यावर परतले.


Rate this content
Log in