Suresh Kulkarni

Others

2  

Suresh Kulkarni

Others

पासिंग मुंबई !

पासिंग मुंबई !

10 mins
1.4K


फायर प्लेस समोर बसून मामाने ड्रिंक्सचा एक लार्ज पेग भरला. तो तोंडाला लावणार तेव्हड्यात फोन वाजला. अननोन नंबर. 

"मामा, एक डील आहे."

" हा. बोला."

"बल्क ,पण महत्वाचे ट्रान्स्पोरट!"

"डेस्टिनेशन ?"

"कोकणच्या एका वळचणीच्या सागर किनाऱ्यावरून."

"डिलेव्हरी?"

"मुंबई पास करून द्यायची. दिल्लीचा पाशा पुढे घेवून जाणार."

"म्हणजे कोकण ते पाशापर्यंत पोहचवण्याची डील ?"

"हो."

"साईझ ?"

"पाच बाय तीन बाय दोनचे, पन्नास ते साठ किलो वजनाचे क्रेट ! नग चाळीस !"

"आत काय आहे ? हे विचारणार नाही. माझ्या आटी. एक माझ्या पद्धतीने काम करीन. दोन पाशाला पझेशन दिले कि माझा संबंध संपला. स्टॉक बल्की आहे. रिस्क वाढते. डील तीन कोटीची !"

"मामा जास्त ---"

"काय हमाल समजलास ? मामा जास्त बोलत नाही आणि जास्त बोललेलं मामाला आवडत हि नाही ! तेव्हा बाय !" मामा भडकला.

"थांबा ,थांबा. मला मान्य आहे." समोरचा घाई घाईत म्हणाला.

"कोकणचा आणि पाशाचा कॉन्टॅक्ट नंबर ?"

समोरच्याने झटपट दोन्ही नंबर सांगितले. क्षणभर मामाने डोळे मिटून मनात ते दोन्ही नंबर रिपीट केले.

"पैसे दुबईत डॉक्टर कडे पोहचते कर !" मामाने फोन बंद केला. या नंबरवर खात्रीच्या माणसाशिवाय मामाशी संपर्क साधता येणे शक्य नव्हते. त्यामुळे मामा बिनघोर होता.

मामाने लगेच दुसरा नंबर फिरवला.

"राका, डील झालीय !"इतके बोलून मामाने हातातला मोबाईल समोरच्या फायर प्लेसच्या आगीत भिरकावून दिला ! 

राकाने आपला मोहरा मोबाईल कम्पनीच्या ऑफिसकडे वळवला. 'डील झाली !' म्हणजे मामाच्या फोन कॉलचे रेकोर्ड डिलीट करायचचे, इतकेच काम राका कडे होते. या कामात तो 'कामाचा' माणूस होता ! 

                                                                  000  

दादूचे घर टिपिकल कोकणी घर होते. नारळाच्या , पोफळीच्या झाडात लपलेले. उतरत्या कवलारू छपराचे. कोकणच्या कोठल्या तरी समुद्रा शेजारच्या शेतातल.  

मामाची जीप घरा समोर उभा होती. दादू मामाच्या परिचयाचा. तरी फोन नंबर विचारून घेतला होता. कारण तोही मामा सारखा सारखे फोन बदलत असे.

"दादू,आपण पुन्हा भेटत आहोत. मागच्या दोन वेळेस तुझ्या कडून माल नेला होता. आता तुझ्या कडच्या बल्क मालाची डील आहे. मुंबई पार करून द्यायचय ! दादू नेमक काय आहे ?"

"चाळीस लाकडी पेट्या ! वजनदार ! आत काय असा म्हाईत नाय !"

"जरा नजरे खालून घालाव्यात असे वाटले, म्हणून आलो."

दादू , मामा घरा मागच्या अंगणात आले.नारळाच्या झावळ्या खाती दडवलेले पेटारे दादुने झावळ्याचे एक टोक उचलून दादुने दाखवले. गन्स ! अनुभवी मामला क्षणात अंदाज आला. कदाचित ग्रेनेड्स पण असतील !!

दादू सोबत, 'काजू'ची बाटली , खेकड्याचा रस्सा अन भाकरी, खावून मामा संध्याकाळी पाचच्या सुमारास निघाला.

"दादू , जे ठरेल ते नंतर कळवतो !" मामाने जीपला पहिला गेअर टाकत सांगितले.

दादू वेड्या सारखा मामाच्या जीपच्या टेल लाईट कडे पाहतच राहिला. विचित्र माणूस ! इतक जड आणि धोकादायक सामान. किमान एक ट्रक लोड तरी! मामा कस पोहचवणार? मुंबई पोलीस पिसाळलेल्या कुत्र्या सारख वासावर असत ! नवा आलेला मुंबईचा इन्स्पेक्टर राघव तर अंडरवर्ड मध्ये 'टायगर'म्हणून फेमस झालाय ! कुठून कशी झडप घालील नेम नाही ! मामाच काम मामा जाणे. आजवर मामा फेल गेल्याच दादुने कधी ऐकले नव्हते.

                                                                      000 

इन्स्पेक्टर राघावचे अंडरवर्डचे नेटवर्क जबरदस्त होते. गुप्तहेर संघटनेचा सिक्रेट मेसेज आलेच होता. काहीतरी गडबड होणार याची त्याला जाणीव होती. ड्रग्स ,सोने किवा हत्यारे मुंबई पास करण्याची शक्यता होती. हल्ली कल्पनाही करता येणार नाही अशे रुट्स हे स्मगलर्स वापरत आहेत. राघवने आपल्या इंफोर्मेर्सना 'लक्ष'ठेवण्यास वार्न केले होते.

                                                                     000  

मामा राघवला चांगलाच ओळखून होता. त्याच्या हातावर तुरी देवून इतका मोठा 'माल' मुंबई बाहेर काढणे केवळ अशक्य ! किमान आजवरचा इतिहास हाच होता. म्हणून यावेळेस मामाने खूप काळजी पूर्वक योजना आखली होती. मामाच्या डोक्यात या योजनेची ब्लू प्रिंट तयार होती. फक्त दुबईचा निरोप अजून आला नव्हता. इतक्यात फोनची रिंग वाजली.मामाने मोबाईल on केला. मेसेज होता. -----'मिळाले --डॉक्टर.' मामा समाधानाने हसला.

                                                                    000 

"पाशा, मी मामा. दापोलीहून दिल्लीच्या व्यापाऱ्या साठी दोन टेम्पो नारळ आणि फणस पाठवतोय. मुंबई बाहेरच्या शेवटच्या टोल नाक्या पासून तीन किलोमीटरवर माझे ड्रायव्हर तुझ्या ताब्यात टेम्पो देतील. तारीख अकरा ऑक्टोबर ! वेळ वीस मिनिट आधी कळवीन ! "

" क्या मै तबतक घाट में झक मारू ? टाईम बता !"

"पाशा , दिमाग थंड रख.' राघव ' नामका शैतान इन्स्पेक्टर बंबईके सर पे मनडराता है ! उससे पाला है ! पैसे या लौंडी से पिघलनेवाला नही है ! पल भर मिल्जाये तो झटकेसे गड्डी निकाललुंगा. समझा ! बैठे रहो !" मामाने फोन बंद केला. 

                                                                  000    

"दादू,मामा बोलतोय. चार दिवसांनी म्हणजे दहा ऑक्टोबरला रात्री अकरा वाजता दोन टाटाचे टेम्पो येतील माल लोड कर. "

                                                                     000 

"शंकर , मामा बोलतोय.. ' दहा, अकरा , किंवा बारा ऑक्टोबरला टाटाच्या चारशे सात टेम्पो मधून 'काही'तरी मुंबई पास होतंय !' हि टीप राघवपर्यंत पोहोचली पाहिजे ! शंका येवू न देता ! तुझे पन्नास हजार डिकोस्टाच्या बारमनकडे ठेवलेत!" 

मामा एकीकडे माल पोहनचोवतोय आणि आपणच पोलिसांना टीप पण देतोय? का ?

                                                                    000  

"सर, नाम अब्दुल है मेरा !"

"हा ,क्या खबर ?"

"डीब्बेमें माल पास होगा."

"नंबर ?"

"क्या ऐसे डीब्बेको नंबर होता है ?"

आपण मुर्खासारखा प्रश्न विचारल्याची राघवला कल्पना आली. एक तर अश्या गाड्यांना नंबर नसतो. असलातरी खोटा असतो. बहुतेक वेळा चिखलाने नंबर प्लेट लडबडलेली असते. 

"फिर और कोई पेहचान ?"

"उसके पीछे अम्बुलंस होगा ! "

"कितने डीब्बे है?"

"दो !"

"कब होगा पास ?"

"दस ,ग्यारा या बारा !"

"क्या ,खबर पक्की है ?"

"सर, नया है क्या ? खबर खबर होती है ! कच्ची - पक्की तू तुम्हारा देख लो. मालूम पडी तो बता दि. खुदा हाफिज !"

राघव फोनचे लोकेशन ट्रेस केले नाही. कारण अशे फोन पी सी ओ तून केले जातात हे त्याला माहित होते.

अब्दुलचा 'डीब्बा'म्हणजे टाटा चारशेसातचा टेम्पो. ट्रक ला तो छकडा , म्हणजे सहा चाकी ,म्हणतो. अब्दुल फटकळ पण खात्रीचा इन्फोरमर , यात राघवला शंका नव्हती. मग राघव मुंबई नाकाबंदी , सध्या वेशातील पोलीस पेरणी , यात गुंतून गेला . 

                                                                     000  

अकरा ऑक्टोबरचे दुपारच्या दोनचा सुमार होता. मुंबई बाहेरच्या पहिल्या टोलनाक्या जवळच्या एका ढाब्यावर राघव स्वतः नऊ ऑक्टोबर पासून लाल भडक लुंगी आणि काळा मीचकुट टी शर्ट अन डोक्याला टापशी बांधून मुक्काम ठोकून होता. तो एखाद्या धटीगण अन लांब पल्ल्याच्या ट्रकचा ड्रायव्हर सारखा दिसत होता. दोन दिवस त्याने जागून काढले होते. ते त्याच्या लालभडक डोळ्यावरून कळत होते. तरी त्याची सतर्कता तसूभरहि कमी झाली नव्हती. कान डोळे उघडे ठेवून तो निवांतपणे , एक बाजेवर, बिड्या पीत बसला होता. कोकणातून येणारे माशाचे, नारळाचे, काजुगरेनच्या पेट्या चे लहान मोठे ट्रक ढाब्याच्या मोकळ्या पटांगणात सावली धरून उभा होते. त्यांचे ड्रायव्हर क्लीनर पोर जेवणासाठी थांबले होते. काही जेवत होते काही जेवण यायची वाट पहात होते. नेहमीचेच दृश्य. खरतर अश्या ढवळ्या दिवसा फारसे काही घडेल असे राघवला वाटत नव्हते. आजची रात्र मात्र खूप महत्वाची होती. 

"काय ? कुनी कड जातव ?"राघवने त्याच्या शेजारच्या बाजेवर अंडा करी आणि बाजरीच्या भाकरीवर ताव मारणाऱ्या दोन पोरगेल्या ड्रायव्हरला विचारले. 

"काय नसा ,हातच मुमाईच्या खालता जावूक असा. नारूळ अन फणस असा. आमचो चुलतो लांब लाम्ब्चोर बजार करत. तेच्या साठी अमी खेपा घालूक असा ."

"मन्जे कोकण मेवा !"

"हा तसोच! तुमी खई निग्लाव?"

"रत्नागिरीस जातोय. स्टील रॉड चा ट्रक आहे !"

"बरा असा . जेवतुलाव का ? नसन तर या !"

"नको . आत्तात हात धुलाय. तुमच चालू द्या . "

त्या दोघांशी बोलताना राघावचे लक्ष नाक्यावर होतेच. त्याच्या नजरेला काही तरी जाणवले. एक छोटीशी रुग्णवाहिका नाक्या जवळच्या वाहनात थांबली होती. त्यात वावगे काहीच नव्हते. पण रुग्णवाहिका रिकामी असलीतरी तिचा वाहक ते वहान अम्बुलंस असल्याचा फायदा घेत पुढे दामटण्याचा खटाटोप करत असतो. येथे तसे दिसत नव्हते. राघव सावध झाला. कारण त्या अम्बुलंस पुढे दोन टाटाचे टेम्पो होते! 

राघवने झटक्यात मोबाईल काढला , नाक्या समोरील त्याचा टीमला अलर्ट केले. 

"हवालदार गाड्या थांबवा! " त्याने ताडकन नाक्याकडे मुसंडी मारली.

राघवच्या टीमने तत्काळ अडथळे उभारून गाड्यांची रांग थोपवली. काय होतय हे लक्षात न येवून मागील वहाने हॉर्न वाजवू लागली. त्या रुग्णवाहिनी समोर दोन संपूर्ण कव्हर केलेले ट्रक होते. हवालदारांनी रीतसर तपासणी सुरु केली होती. राघवने तडक मोर्च्या त्या रुग्णवाहिनीकडे वळवला. पण आपापल्या गाड्यातून उतरलेल्या ड्रायव्हर लोकांनी त्या फाटक्या लुंगीवाल्याला अडथळा केला. एका वर्दीतल्या शिपायाने त्याचा मार्ग मोकळा करून दिला. पण तो वर उशीर झाला होता. ती रुग्णवाहिनी, आणि ते दोन टेम्पो सोडून त्यांचे ड्रायव्हर पसार झाले होते !

राघवने टीमच्या मदतीने, ते तिन्ही वाहने रस्त्यातून बाजूला घेतली. दोन्ही टेम्पो नारळांनी खचाखच भरली होती. नारळाचा ढीग बाजूला केल्यावर तो माल हाती लागला !आंब्यासाठी वापरतात तश्या देवद्वाराच्या फळकुटाचे चार क्रेट होते. त्यातील पाचटा खाली देशी कट्टे ! चार क्रेट मध्ये एकून चोवीस ! वर पन्नासच्या आसपास जिवंत काडतूस ! रुग्णवाहिनीच्या सीट मध्ये चार किलो गांजा ! या साऱ्या घबडाचा पंचनामा करी पर्यंत टी व्ही वाले आलेच !

 राघव पुन्हा 'हिरो' झाला.! एक शिपेच त्याचा मुकुटात खोवला गेला ! अर्थात याला त्याची जिद्द , मेहनत, सहास कारणीभूत होते यात कोणीही शंका घेवू शकणार नव्हते. ' मुंबई इज सेफ इन द हंड्स ऑफ राघव !' अशी स्तुती सुमन वरिष्टाकडून उधळी गेली ! अर्थात राघव सुखावला नव्हता! काहीतरी चुकत होत नक्की ! पण काय ?  

                                                                 000       

काही तरी गडबड झाल्याची नाक्या पासून तीन किलोमीटरवर असलेल्या पाशाला भनक लागली. त्याने मामला फोन लावला. मामाने फक्त 'वेट'म्हणून फोन कट केला.

                                                                   000      

थोडी वहातुक सुरळीत झाल्याची खात्री झाल्यावर ते पोरगेलेसे कोकणचा मेवा घेवून सावकाश निघाले. त्यातल्या एकाने मोबाईल वर एक मेसेज केला. 

'वीस मिनिटात मोहनचतोय !' आणि तो फोरवर्ड केला. तो नंबर होता पाशाचा!

                                                                     000   

मामा एकटाच आपल्या डाबरमन कुत्र्याबरोबर लॉनवर  खेळत होता. दूर फेकलेला चेंडू ते कुत्र तोंडात धरून परत आणून देत होत. तो खुश होता. मामाने राघवला किरकोळ यशाचे आमिष दाखवून करोडोचा माल मुंबई पास करून दाखवला होता ! अंडरवर्ड मध्ये हा किस्सा बराच गाजणार होता . शेवटी लोक त्याला 'मामा' म्हणत ते त्याचे नाव , उपाधी म्हणून नाही तर तो शॉर्ट फार्म र्होता  ' - मास्टर माईंड -'चा ! 

                                                                      000 

                   



Rate this content
Log in