STORYMIRROR

Surekha Nandardhane

Others

3  

Surekha Nandardhane

Others

नकळत झालेली चूक

नकळत झालेली चूक

2 mins
292

काकू …. ही फुलं घ्या . देवाजवळ ठेवा 

   राजू हा शेजारचा मुलगा खुप सुंदर व गोड्स असा अवघा पाच वर्षांचा राजू किती आपुलकीने बोलत होता हे बघून काकूंचे डोळे भरून आले . अनघा ही काकूंची मुलगी व राजुची समवयस्क मैत्रीण दोघांची खूप घट्ट मैत्री होती 

लहान पना पासून सोबत खेळायची कोणताही खाऊ ते वाटून खात हेवा वाटावा अशी त्यांची मैत्री .

  

  राजू दोन महिन्या नंतर अनघाच्या घरी आला. येताना ओंजळीत फुले घेऊन आला व काकु जवळ देत देवाजवळ ठेवायला सांगितली . आपल्या हातातील फुले काकू घेत नाही हे राजुच्या लक्षात आले तसा तो पुन्हा बोलला .


" काकू ही फुल देवाजवळ ठेवा काका लवकर बरे होऊन घरी येतील ".

  

 राजुचा निरागस व निष्पाप चेहरा बघून काकूंचे डोळे भरून आले .

त्यांनी राजू जवळची फुल घेतली आणि त्यालाही प्रेमाने जवळ घेतले .

 " ठेवालं ना काकू ही फुलं ."

हो रे बाळा फुल देवाला अर्पण करते आणि देवाजवळ प्रार्थना करते .तसा राजू गोड हसला व घरी निघून गेला .


        ही घटना आहे कोरोना काळातली ज्या वेळी कोरोनाने आपल्या देशात गावोगावी हाहाकार माजविला होता . तो काळ ते दिवस विसरणे अशक्य आहे .


  या कोरोनाने कित्येक लोकांची रोजी रोटी हिरावली तर कियेकांचे घर उध्वस्त केले कित्येक लोकांचे बळी घेतले .


   राजू चे व अनघा चे वडील एकाच कंपनीत कामाला होते व राहायला शेजारी होते त्यामुळे त्यांचे चांगले संबध होते . या संबंधात एक बाधा झाली . राजुच्या बाबांना कोरोनाची लागण झाली . हे अनघाच्या आईला माहीत झाले 

तेव्हापासून त्यांनी कोरोनाच्या भीतीने दरवाजे खिडक्या बंद ठेऊ लागली . राजुच्या आईशी पण बोलणे बंद केले .

राजू अनघा कडे गेला की त्याला बाहेरून चं परत पाठवून द्यायच्या त्याला अनघा सोबत बोलू देत नव्हत्या .

हे राजुच्या आईला कळले तेव्हापासून त्या राजुला घरातच खेळायला सांगायच्या .दहा बारा दिवसात राजुचे बाबा बरे झाले व ते कामावर जायला लागले तरीसुद्धा राजुला त्यांनी कधी घरात घेतले नाही .


    राजू रोज अनघाच्या घराची खिडकी उघडेल याची वाट बघत बसायचा पण बरेच दिवस खिडकी उघडली नाही तेव्हा खुप नाराज व्हायचा .

 

   एक दिवस अचानक खिडकी उघडली व अनघा दिसली 

ती रडत होती तिला राजुने रडण्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली माझे बाबा पण तुझ्या बाबसारखे आजारी झाले 

तितक्याच अनघाची आई तिच्यावर रागावली व खिडकी बंद केली .दुसऱ्या दिवशी राजू सकाळी उठला आपली तयारी केली व त्यांच्या बागेतील फुल तोडून अनघाच्या घरी गेला

  

" काकू ही फुल घ्या व देवाजवळ ठेवा .माझ्या बाबाला पण देवाने बरे केले . काका ही लवकर बरे होऊन घरी येतील तुम्ही रडू नका . "

  त्या निरागस मुलाचे बोलणे ऐकून काकूंचे डोळे भरून आले .

    त्याचे बाबा आजारी असताना आपण त्या निरागस निष्पाप मुलाशी किती निष्ठुरपणे वागलो याचा काकुला खुप पच्छताप झाला .

   आपल्या कडून कळत नकळत चुक झाली हे त्यांच्या लक्षात आले .



Rate this content
Log in