नातवंड
नातवंड


मीराताई अतिशय शिस्तप्रिय...त्यांना सर्व अगदी नीटनेटके लागायचे...
मुलाचे लग्न झाले,वर्षभरातच नातवंडे झाली ती ही जुळी...
मग् काय त्यांचे कपडे,खेळणी यांनीं घर अगदी भरून गेले...
सुरवातीला खूप चिडचिड करायच्या...त्यांना अशी सवयच नव्हती...दोन्ही बाळं हळू हळू मोठी होऊ लागली आणि त्यांच्या बाळलीला बघण्यात त्यांना या साऱ्याचा विसर पडला...
वसंतरावांनी आणि त्यांच्या मुलांनी सहज चेष्टा केली...आजी या नात्यात पडल्यापासुन तुझी शिस्त हरवलीआहे...
त्या हसुन म्हणाल्या,ह्या एका प्रेमळ स्पर्शाने समजलंय.. "नातवंडांना दूधावरची साय का म्हणतात??"
आर्थिक परिस्थिती बेताची त्यामुळे नोकरी करताना घर पण नीटनेटके राहावे यासाठी हा खटाटोप केला...आता या वयात परत एकदा मातॄत्त्वाचा रंग अनुभवताना आई म्हणून निसटून गेलेले क्षण आजी म्हणून अनुभवते आहे....