Sanjay Raghunath Sonawane

Others

2.5  

Sanjay Raghunath Sonawane

Others

नांदा सौख्यभरे

नांदा सौख्यभरे

2 mins
1.3K


       तिचे नुकतेच लग्न झाले होते. तिचा जोडीदार सुंदर होता. तिला शोभेल असा. पण त्याला HIV ची लागन झालेली होती. याची कल्पना तिला जरासीही नव्हती. त्याचे तिच्यावर खूप प्रेम होते. तिला आपल्या आजाराची लागन होऊ नये म्हणून तिला त्याच्यापासून दूर राहण्यासाठी सल्ला दिला दिला होता. तिचे वैवाहिक जीवन वाया जाऊ नये म्हणून त्याने तिला तिच्या पसंतीच्या मित्राबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास परवानगी दिली होती. तिचा मित्र तिच्याच कॉलेजमधील होता. तो तिचा चांगला मित्रही होता. दोघांनाही त्यावेळी एकत्र येऊन लग्न कारावेसे वाटले होते ;पण तसे काही झाले नाही. दोघांची जात वेगळी होती ;पण जीवाला जीव देणारे ,एकमेकांना समजून घेणारे, कष्ट करून जगण्याची हिंमत असणारे होते.तसा तो संस्कारी व निर्व्यसनी होता. शिस्तप्रिय होता.वयानेही सारखेच होते.त्याचे तिच्या घरी नेहमी येण- जाण नेहमी चालू असायचे.त्यातून दोघांचे अतूटप्रेम निर्माण झाले होते. दोघांनाही एकमेकांना पाहिल्या शिवाय दिवस जात नव्हता.तिलाही तो हवा हवासा वाटत होता. तिचे लग्न झालेले होते. तो मात्र बिन लग्नाचा होता. दोघेही सारख्या वयाचेच होते.तो मात्र घरच्यांचा एकुलता एक मुलगा होता. नुकताच एका लिमिटेड कंपनीत कामाला लागला होता. आईवडील सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना जगण्यासाठी पेंशनचा आधार होता.आई वडील संस्कारी होते. त्याच्या आई वडिलांची त्याच्यासाठी मुलगी बघायचे सुरु झाले होते.त्यांच्या स्वजातीत मुलगी बघायचे ठरले होते.लग्न करायचा विचार चालू होता. ही गोष्ट त्याने तिला सांगितली होती.तिने तिच्या नवऱ्याची खरी माहीती सांगितली होती. नवऱ्याच्या प्रामाणिक सल्ल्यानुसार तिला तिच्या मनातील व्यथा त्याच्या समोर मांडली.तिने त्याला आयुष्यभर पतीचे काम जे आहे तसे लक्ष ठेवण्यास सांगितले होते.हे ऐकून त्याला खूप आनंद झाला होता. ती आपली पहिलीच वधू म्हणून मनातून भावना व्यक्त केल्या. तिने आयुष्यभर सोबत राहण्याचे त्याला वचन दिले होते. तिने त्याला लग्न करण्याची परवानगी दिली होती.त्याआईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यास सांगितली होती.

         पण अचानक तिच्या नवऱ्याचा HIV मुळे मृत्यू झाला. तिच्यावर दुःखाचे आकाश कोसळले होते. तिचा नवरा गेल्याने तिचा आधार तुटला होता. पण तिच्यासाठी तो घर ठेवून गेला. दुःख तरी किती दिवस धरून घरी बसायचे. पोटाला भाकर तर पाहिजेच. ती कोण देणार?चार दिवस दुःखात असलेली नातेवाईक मंडळी आपापल्या घरी निघून गेली होती. दुःख धरून, आठवूण घरी बसले तर पोट कसे भरणार?तिने तिच्या मित्राला कामासाठी सांगितले .मित्राने तिला एका लिमिटेड कंपनीत सुपरवायझरची नोकरी मिळवून दिली होती. तिचे सासू सासरे दोघेही तिच्या लग्ना अगोदर स्वर्गवासी झालेले असल्याने तिने आधार म्हणून तिच्या मित्राला जवळ केले होते. त्यातून त्यांचे प्रेम वाढत गेले. दोघेही एकमेंकाशिवाय राहू शकत नसल्याने कायद्याने विवाह केला होता. परंतु एकुलत्या एक मुलाने आपल्या विरोधात लग्न केले म्हणून कायमचे घराबाहेर काढले. तो तिच्या सोबत राहू लागला. तिच्या घरच्यानीही पसंती दर्शविली होती. थोड्याच दिवसात त्यांना गोंडस बाळ झाले. आईबाबानी विरोध केला होता तो विरोध ,राग ते गोंडस बाळ पाहून कायमचे विसरून गेले. आईबाबांना खूप आनंद झाला होता. ते जात नावाची किड विसरून गेले होते. आता सर्व कुटूंब एकत्र नांदत आहे.


Rate this content
Log in