shivani Solanke

Others

2  

shivani Solanke

Others

मुलगा आणि मुलगी समान

मुलगा आणि मुलगी समान

4 mins
179


(पात्र: सासु:शांताबाई,सुन:उमदा, मुलगा:उमेश,नात:राशि,नातु:गणपत,मैत्रीण: कांता(शांताबाईची),मैत्रीण:राधा(राशि ची), डॉक्टर, नर्स.

सासु: इमले कुठं हाय मेले तू(आवाज देतांनी)

सुन: आली सासु बाई झाडत आहे.

(शांता फरशीवर आणून कचरा टाकते)

शांता म्हणते: इकडे सुनबाई हा कचरा तुझा बाप उचलनार का 

उमदा: नाही नाही सासुबाई मी झाडते ना

सासु: आवाज देऊन गळां दुखतयं पानी दे, नरडा सोखला आवाज देऊन सारा बघत का (ओरडत म्हणताननि)(उमदा झाडु खाली ठेवून जाते)

(तिकुन उमेश येतानी)

उमेश: आई ऐ, आय, कुठे हाय तु?( हे ऐकून शांताबाई हातात फळा घेते)

उमेश: काय व माय तु कायले झाडत हाय?

शांताबाई : अरे पोरा जेव्हापासून माहित पडलं की सुनबाई आई होणार तवापासुन नुसता हातपाय आवरला तीनं(नाटक करतानी अरं देवा कंबर गेली रे)

उमेश: उमदा ऐ उमदा (रागात म्हणतानी)

उमदा: आली हो 

उमदा: हे घ्या पानी सासुबाई ,कधी आलात तुम्ही

(उमेश उमदा ला झापड मारतो)

उमदा:( रडतानी म्हणते) काऊन मारलं मला काय दोष माझा? 

उमेश: बस गप्प(उमेश उमदा ला ओरडून निघून जातो) (राशी सगळे बघत असते तिथे येते आणि म्हणते का मारलं माझ्या आईला तेव्हा शांताबाई तिच्या कानाखाली देते आणि म्हणते समजून सांग तुझ्या मुलीला नाहीतर नंतर शांताबाई तिथून निघून जाते आणि राधा आणि उमदा एकमेकांना समजत म्हणते रडू नको मुली काही नाही झालं.

  

२ रा दिवस


(शांताबाई सुपारी फोडत असते तेव्हा राशीचे जवळ येते आणि म्हणते)

राशि: आजी मला एक रुपा हवा माझ्या शाळेची आज नवनीत ची परीक्षा आहे जर मी त्यात पास झाली तर मला फुकटचे शिक्षण नाही आणि पैसे पण मिळते.

शांता: काम धंदा नाही का तुला कोणता सकाळी सकाळी पैसे मागायला चल निघ इथून काढतोडी मी सकाळी सकाळी कोणाचा चेहरा पाहिला आजचा दिवस खराब होतं वाटत.

(राशी रडत रडत अंदर जाते आणि तिच्या आईला म्हणते आई शाळेत परीक्षा आहे जर का पैसा भरला नाही तर तर परिक्षेत भाग घेता येणार नाही)

(उमदा तिच्या साडीच्या पत्रातला एक रुपया काढून राशि ला देते आणि म्हणते)

उमदा: जा पोरी सांगू नको कोणाले अन पास हो कशी मैल एक हुशार आहे.(राशी आनंदात उड्या मारत मारत शाळेत जाते तिकुन कांताबाई येते आणि शांताबाई आवाज यते)

कांताबाई: शांता शांता

शांताबाई: कोण आलं इतक्या सकाळी बाप्पा इतक्यान ओरडत हाय.

कांताबाई: आव शांती हा काय लाडू मी आजी झाली मले मले नातू झाला.आव तुले माहित आहे सुनी अत्याचार केल्यान नातु होते.

शांताबाई: (हळू आवाजात म्हणतानी) हो काय बरं सांगतल त्वा मले आता म्या पण असंच करणार. पण तुला हे कोणी सांगितलं.

कांताबाई: अहो म्या हे एका चमत्कारी बाबाच्या प्रवचनातून ऐकलं होतं. मग म्या पण तसच केलं. तू जर शांते सांगतो तसं कर नाहीतर मग नातीच्या चेहरा बघून मत. चालतो शांताबाई रामराम!

(विचार करता मी नाही केलं मला पण तू नातू होणार)

शांताबाई म्हणते: जर या वेळ मुलगा झाला नाही तर माझ्या मुलाचं नाव दुसरे लग्न करून देणार आणि तुझ्या त्या काळतोंड्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवा

(उमदा मनातल्या मनात म्हणते देवा कशी परिस्थिती आहे माझ्यावर मदत कर रे माझी)


 ४ महिन्यांनंतर

 

(उमदा ला दाखवखन्यात नेते, बाहेर शांताबाई, उमेश आणि राशि उभी असते.)

डॉक्टर: खुप गंभीर परिस्थिती आहे कारण, आई ची परिस्थिती खराब आहे.(इतक म्हणून डॉक्टर आत जातो)

शांताबाई: आरं देवा कसं करावं, देवा तु मनदा ले घेऊन जा पण माया नाता ले वाचव.

(हे ऐकून राशि घ्या डोळ्यात अश्रू आले ते म्हणाली)

राशी: आजी असं म्हणू नका हो माझ्या आईला काही व्हायला नको.( शांताबाई त्याचा उलटा अर्थ काढते)

शांताबाई: तुय का म्हण हाय कि माया येणारा नातु मेला पाहिजे. हे बघ उमेश तुयी लेख स्वताच्याच भावाले मारण्याची प्रार्थना करते.

(उमेश राशि ला झापड मारतो आणि म्हणतो)

उमेश: गप्प बसून राहा तिथे.

(बेचारी राशि गप्प बसून राहते आणि तिच्या आईला वाचवण्याची प्रार्थना करते)


 दोन तासा नंतर


नर्स: आई आणि बाळ अगदी ठीक आहे.

(शांताबाई व उमेश विचारतात काय झालं मुलगा की मुलगी)

नर्स: जलेबी, जलेबी झाली.

(शांताबाई तोंड हेकोडं करत)

शांताबाई: काय मुलगी झाली हे कसं शक्य आहे .

नर्स: अहो मुलगा झाला.

शांताबाई: आगं पेंढ म्हण की ते उमेश पेंढआ झाला.

कुठे हाय माया नातु. ( राशी आनंदात म्हणते मला भाऊ झाला )

शांताबाई: ते काळंतोडे तुझु सावली नको माझ्या नातावर. 

  

काही वेळा नंतर


(राशी लपून आईला भेटायला जाते) 

राशी: आई कशी हाय तु ठिक हाय तु

नमदा: होय पोरी तु कशी हाय 

राशी: होय चल म्या निघतोय आता 

नमदा: होय जा घरी


२ दिवस नंतर

राधा: राशी ऐ राशी 

उमेश: कोण आलं काय व राधे आज इकडे कशी आली

राधा: आहो काका आपल्या राशीचा चार राज्यांतुन पहिला नंबर आला ५००० इनाम आणि फुकटचे शिक्षण पण रशिले शिक्षणाले गेली तरचं पैसे भेट नाही तर मिळणार नाही.चला जातो राशी दोन दिवसांपासून शाळेत नाही आली म्हणून शिक्षक बाई पाटवल जितक्या लवकर पाठवाल तितक्याच लवकर पैसे भेटन.

(राधा जाते आणि सकाळ होताच राशी ला पाठवतात आणि पैसे आनतात)

शांताबाई: पैसे भेट ले‌ अन त्या काळ‌तोडी पासून छुटकारा भेटला.


 १३ वर्षा नंतर

शांताबाई: गणपत कुठे हाय माया नातु गणपत ऐ गणपत 

गणपत: आजी मला काही पैसे हवेत पण आई देत नाय हाय.

शांताबाई: किती पाहिजे हे घे

उमदा: सासुबाई तुम्ही याची आदत बिगळवत हाय 

(आहेच चालत राहते गणपत वाया जातो)

  ‌‌‌‌‌७‌ ‌वर्षा नंतर

गणपत: आजी मला काही पैसे द दारू पिऊन धिंगाणा घालत म्हणतो

शांताबाई: नाही आहे माझ्याकडे

गणपत: नाहि हाय (गणपत आजी आई बाबा यांना मारहाण करून सगळ्यांना घराच्या बाहेर काढून टाकतो)

उमदा: सासुबाई तुम्ही याची आदत बिगळवली तुमच्या मूळ झालं 

(१९ दिवस नंतर शांताबाई व उमेश व‌ उमदा एका वृक्षा घर करून राहतात तेवढ्यात एक सुंदर मुलगी दुरुन दीसते )

शांताबाई: कोन हाय हे

(एक बाई म्हनते नवीन कलेक्टर हाय हे )

शांताबाई: हे कसं बाई ची जात अन कलेक्टर

(ति तरुण मुलगी शांताबाई, उमेश आणि उमदा आणि प्रेम ने म्हणते आजी बाबा आई चला आपल्या नव्या घरी)

शांताबाई: तु राशी हाय ना माफकर मले तुला इतका त्रास दिला तरी तु आम्हाला माफ केलं 

राशी: झालं ते विसरून चाला घरी

(सर्व आनंदात राशिच्या घरी जातात)

मुलगा असे मुलगी दोन्ही समान असतात हे आपण आपल्या नाटकांमध्ये बघितले आहे.

                          - शिवानी संजय सोळंके


Rate this content
Log in