Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

kanchan chabukswar

Others


4.0  

kanchan chabukswar

Others


मिठू, आई आणि मोदक

मिठू, आई आणि मोदक

4 mins 33 4 mins 33

" आई आधीचे अकरा मोदक तू सांगितल्या प्रमाणे व्यवस्थित झाले, पण मला बाहेर जायचं होतं म्हणून मी तांदळाची उकड फ्रीजमध्ये ठेवली आणि आता बघ तीच काय झालं" मिठू चा रडवेला स्वर


" काय प्रमाण घेतलं होतं?" आई

" तू लिहिलं तसेच घेतलं होतं, आणि आता बघा ती कशी चिकट चिकट झाली आहे. नमिता म्हणाली मैदा टाकू नकोस म्हणून मी नुसतं तांदुळाचे पीठ घेतलं होतं, इंडियन स्टोअर मधून आणलं होतं." मिठू ची तक्रार


" उद्या आमचे 10 मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत, मी हौशीने मोदक करीन म्हटलं होतं, आता काय करू?" मिठू


मिठू अमेरिकेला जाऊन दोन वर्ष झाली होती, यावर्षी प्रथमच तिने आपल्या मित्रमंडळाला गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरी बोलावले होते. तशी मिठू आणि नमिता एक टू बीएचके घेऊन एकट्याच राहत होत्या. प्रत्येक सणाच्या वेळेला आत्तापर्यंत आईच डब्बा पाठवत असे, पण जसा करोना सुरू झाला, पार्सल पाठवणे बंद झाले.   मिठू ने बहुतेक सगळा जुजबी स्वयंपाक आईकडून शिकला होता, आणि आता पण ती व्हिडिओ कॉल करून शिकत होती.


दोन वाट्या नारळाच्या खवा बरोबर दीड वाटी गूळ घालून, मस्तपैकी खसखस घालून, वेलची पूड, जायफळ पूड घालून सारण एकदम फस्क्लास झालं होतं. गुळामुळे रंग देखील सुंदर आला होता. आईने पद्धतशीरपणे कृती पाठवली होती त्याप्रमाणेच मिठू तयारी करत होती.

आता एक तर रात्र झाली होती, बाहेरून काही नवीन पीठ वगैरे म्हणायचं तर मॉल्स बंद झाले होते, आणि दुसऱ्या दिवशी नऊ वाजल्यापासूनच मित्र मंडळ घरी येणार होतं. आपली फजिती होणार या कल्पनेने मिठू अगदी नाराज झाली होती.


" ऑल पर्पज फ्लोर आहे का?" आईने विचारले.

" हो आहे."

" ठीक आहे मग, व्हिडिओ ऑन कर, आणि मला दाखव, आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये तुझी चिकट पीठ थोडेथोडे घाल, त्यामध्ये एक एक चमचा ऑल पर्पज फ्लोर घाल, मळत राहा, घाबरू नको," आईने धीर दिला.

" आई, बघ किती विचित्र झाले आहे, अगदी भजा सारखं पीठ झाल आहे, हाताला बोटाला बघ किती चिकटत आहे." मिठू नाराजीने म्हणाली.

" असू दे, थोडे पीठ तुझ्या बाउलमध्ये खाली टाक, त्याच्यावरती तुझं चिकट पिठ टाक, आणि मिसळत राहा," आई म्हणाली.


अखेर चार-पाच चमचा घातल्याने मिठू चा पीठ थोडं घट्ट व्हायला लागलं.

" हा बेटा, बरोबर आहे, आता वरून थोडं तेल घाल, चमचा चमचा घाल." आईने सांगितले.

शेवटी हा उपाय करून झाल्यावर ती जवळजवळ वीस मिनिटाने मिठू च पीठ योग्य प्रमाणात घट झालं.

" तू म्हणते पीठ जास्त मळत रहा, नक्की काय करू?" मिठू चा प्रश्न.

" अगं हाताच्या मनगटावर च्या बाजूने पीठावर जोर देऊन देऊन ते ओढायचं असतं, हाताना चिकटलं तर थोडे कोरडे पिठ नाही तर तेल लावायचं, आता घड्याळात बघून दहा मिनिटे मी सांगते त्याप्रमाणे पिठावर जोर देऊन ते ओढ." आता आईने देखील स्वयंपाक घरात थोडे पीठ कालवून मिठू समोर मळायला सुरुवात केली. गोळा केल्यानंतर, तो हाताच्या पंजाने जोरात पुढे ढकलायचा, त्याच्यानंतर परत मागे ओढायचा, असा बराच वेळ दोघींचा मळण कार्यक्रम चालू राहिला.


" मिठू, दुधाची उकड घ्यायची असेल तर अर्ध दूध अर्ध पाणी घालावं, नाहीतर मोदकाला भेगा पडतात. तु सांगितल्याप्रमाणे दोन वाटी पिठाला दोन वाटी पाणी, एक चमचा तूप, अर्धा चमचा मीठ असंच घेतला आहेस ना? तु त्याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा घातला असतास तर असं पीठ बिघडलं नसतं. काही हरकत नाही आता आपण करतो आहे ना. रडू नकोस." आई समजत होती.


दहा पंधरा मिनिट दोघींचाही पीठ व्यवस्थित झाल. मदतीला नमिता पण आली.

नमिता न मोदकाचा साचा स्वच्छ धुऊन काढला, कोरडा पुसला, आणि त्याला तूप लावून तिने तयार ठेवला. केलेल्या पीठाचे व्यवस्थित 20 गोळे करून आईच्या सांगण्यावरून गोळ्यांना ओल्या कपड्याने झाकून ठेवले.

आता एकेक गोळा हातावर ती घेऊन तो परत मळून साच्यामध्ये घातला, गोळ्याच्या मधोमध अंगठ्याने दाबून काढून अलगद चारी बाजूंनी पीठ पसरवले, मध्ये झालेल्या खोबणी मध्ये सुरेख सोनेरी रंगाचे सारण भरले, त्याच्यावरती दोन किस्मिस आणि काजूचे तुकडा ठेवला, सारणाची मागची बाजू एका छोट्या पातीने झाकून टाकली. मिटू चे मोदक आता मोदकाच्या साच्याला चिटकत नव्हते, व्यवस्थित आकाराचे मोदक सटासट व्हायला लागले. व्हिडिओ मधून आता मिठू आणि नमिताच्या चेहऱ्यावरती मंदस्मित झळकू लागले. तिकडे आईला देखील हायसे वाटले.

गप्पा मारत मारत आईच्या सूचने नुसार सगळे मोदक करून वाफवायला ठेवले.

प्रत्येक मोदकावर हौशीने 2,2 केशराच्या काड्या देखील चिटकवल्या.


इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना सगळे मोदक मस्तपैकी वाफवून देखील झाले. सुरेख नक्षीदार डब्यामध्ये सगळ्या मोदकांची मांडणी करून मिठू ने आईला दाखवली. दोघांनी एकमेकांना गोड पापी  [ फ्लाइंग किस] दिली. मिठू आणि नमिता ने सगळे मोदक गणपती बाप्पा च्या फोटो समोर ठेवले आणि त्याला मनोमन नमस्कार केला.


" आई उरलेल्या पिठाचे काय करू?" मिठू चा प्रश्न.

" किती उरले? त्याच्यात थोडं मीठ तिखट मसाला, जिरे, ओवा, आले लसणाची पेस्ट टाक. आणि ते तळून टाक छोटे-छोटे भजे करून मस्त लागतील बघ." हसत हसत आई म्हणाली.

"अरे वा! मजाच आहे, मस्त आयडिया दिलीस आई." मिठू एकदम खुश होऊन म्हणाली. "आमचे मित्र मंडळ तर एकदम आश्चर्य चकित होऊन जाईल."


       आईने घरच्या गणपतीसमोर दिवा लावला, सुगंधी वासाची उदबत्ती लावली, आणि मनोमन प्रार्थना केली." देवा माझ्या मिठू चे मोदक आनंदाने स्वीकार कर, तिचं रक्षण कर."


घरोघरी चे लेकरं दूर परदेशी राहतात, आपल्या ध्येयासाठी, सुंदर आयुष्यासाठी, मात्र सणावाराला घरची कडाडून आठवण येते.

मग आहेच, ऑनलाइन आई, आणि गणपती बाप्पा चा माऊस.


Rate this content
Log in