Vilas Yadavrao kaklij

Others

3  

Vilas Yadavrao kaklij

Others

मित्र

मित्र

3 mins
391


आजही तो दिवस आठवतो कॉलेज लायब्रीमध्ये पुस्तक घेतांना दोघांनी एकच पुस्तक मागितले व एकच प्रत होती मला पाहिजे होत असू दे म्हणून माघार घेतली. मी पण म्हटले उदया मला दे, शांतपणे घेतले. ओळख झाली कॅन्टिंगला चहा. बस आजही ती मैत्री टिकून आहे. अतिशय स्वाभिमानी , शांत , स्वभाव सामान्य परिस्थिती एकच ड्रेस अगदी झोपडपट्टीत रहाणारा वडिल पॉवलुमध्ये रोजंदारीने काम करित. आई रोजंदारी करीत वडिलही अत्यंत स्वाभिमानी असल्यामुळे सासरची श्रीमंती पण गर्व असल्याने संबध तोडले उपाशी राहिन मात्र भिक मागणार नाही,  त्यामुळे त्यांचे वडिलांचा बहिणींच दवाखाना खर्चा मूळे कर्ज बाजारी. झोपडीवजा दहा बाय दहा चे घर वर पत्रा आजुबाजूला कुडाच्या भिंती अशा घरी पहिल्यांदा आम्ही मित्र गेलो. आई आजारी असतांना भेटलो. बारदान टाकून स्वागत केले, प्रेमाणे चहा दिला तो फायु स्ट्रार मध्येही न मिळणारे प्रेम , आपुलकी दिसली नतंर देवीच्या चक्र पुजा करतांना चक्र भरतात व जेवण देतात आम्हाला प्रेमाने आमत्रंण दिले. काही मित्र म्हटले नको परिस्थिती नाही त्यांची मात्र आम्ही श्रीमंत मित्रांच्या घरि न जाता राजूकडे गेलो. सर्व पूरणपोळीचे जेवण जेवलो त्यांच्या वडिलांना डोळे भरून आले आमच्या गरीबाच्या घरी आले भरून पावलो. फि भरण्यास पैसे नसले तरी फार्म भरला कि नाही न सांगता कारणे सांगत मात्र आम्ही मदत करत. अगदी १०रूही आठवणीने परत करी अंगी हुशारी १२वी ला स्पर्धा परिक्षा दिली बीएसीला आमचे बरोबर अॅडमिशन घेतले पण पेपर टाकणे लुमवर कारकुनाचे काम करून कॉलेज केले आमच्यापेक्षाही जास्त गुणांनी इकडे स्पर्धा परिक्षेत सिलेक्ट झाला LIC मध्ये जॉब मिळाला लांब तेव्हांपासून आमच्यात अंतर वाढले मात्र प्रेम सुद्धा वाढले.

त्याला प्रमोशन मिळाले मग भाडयाने घर घेतले मोटारसायकल घेतली मग मात्र त्याचा मामा मुलीच्या लग्नासाठी आमत्रंण दिले तेंव्हा मात्र राजूच्या वडिलांचा स्वाभिमान जागा झाला राजूची आई दवाखान्यात असतांना कोणतीही मदत न करणारा श्रीमंतीचा गर्व बहिण झोपडपट्टीत रहाते म्हणून ओळख न देणारा मामा ओळख दाखवू लागला बापा पेक्षा ही राजू जास्त स्वाभिमानी होता मात्र शांतपणे उत्तर दिले मला तीन वर्ष लग्न करता येणार नाही सर्व काही लाथाडले व स्वतः कष्टाने कमवून तुझ्या सारखी श्रीमंती मिळविन ! एका गरिब घरची मुलगी केली सामान्य लग्नसोहळा आम्ही सर्व मित्र साक्षीदार होतो . र्दुदैवाने आज त्याचे आईवडिल नाहीत मात्र कष्टाने व स्वाभिमानाने मिळवलेले धन , संपत्ती आणि समाधान काय असते , हे फक्त गोष्टीत ऐकले जाते व सांगितले जाते पण प्रत्यक्ष कृति तून आज जगण्याचा वा जगवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना टिपीकल . सामान्य . ' लोअर क्लास ,गावंढळ राबणारी कष्टकरी जमात म्हणून हिणवले जाते उलट वरिल गुण वा हे शब्द ज्यांच्या जीवनात अस्थित्व नसते अशी माणसे आज सुसंस्कृत उच्चभ्रू समजली जातात प्रतिष्ठीतीत व्हीआयपी .माननीय . वंदनीय , समजुन पुजली जातात व हेच घटकातील समाज जास्त असल्याने समाजातील जी दरी वाढते . संस्कृती हिच विकृती बनत चालली .क से निर्माण होतील श्रावणबाळ , कशी होईल सुधामाची मैत्री , कशी होईल सावित्री , राजूचा- राजन का होतो? या सर्वांची उत्तरे मला एका राजूच्या कथेत मिळाली व आपणासही खऱ्या मित्रांची अर्थात राजूंची ओळख जेंव्हा होईल तेंव्हा खरा शिवाजी आपल्या घरात नक्कीच निर्माण होईल . असा एक सच्चा मित्र एक राजू


Rate this content
Log in