मी 'मी'च आहे
मी 'मी'च आहे
सगळ्यांनाच पडलेला प्रश्न मला ही पडला, मी कोण आहे? मी कोण आहे? ... आई ची बेबी, बाबाची बेबो, आजीची बबली, आजोबांची बबड्या, शाळेतले नाव ऐश्वर्या! शाळेतल्या मैत्रिणींसाठी ऐश्!!
आई साठी मुलगी, बाबांसाठी मुलगी, आजी साठी नात, आजोबांसाठी नात, असे हे जवळचे रक्ताचे नाते!! मैत्रिणींसाठी मैत्रिण, मित्रांसाठी मैत्रिण! असे मैरीचे नाते!
मी दिसते कशी सुंदर, मग मी सुंदर आहे!
मी काळी की गोरी, तर मी काळी सावळी आहे!
तर मी नकी कोण आहे??.
नागरीकत्वाने भारताची नागरीक भारतीय, इंडियन आहे! लिंग मुलगा की मुलगी ह्या प्रश्नाचे उत्तर देतांना मी मुलगी असते, तुझी जात काय विचारले तर मी एका विशिष्ट जातीची असते, तुझ वय काय म्हटले की मी एका विशिष्ट वयाची असते.
तु कीतवीत आहे कोणत्या वर्गात शिकते म्हटले तर मी आठवीत आहे!,
असे अनेक प्रश्नांनी मला बाहेरचे, ओळखतात, नावाने ओळखतात ते माझे नाव 'ऐश्वर्या संगिता यशवंत पाटील.' तर मी ऐश्वर्या संगिता यशवंत पाटील आहे.
नावात काय आहे असे शेक्सपियर लिहून गेले,
मी कोण आहे ?जन्म दाखल्यात जे नाव गाव, आई, बाबांचे नाव, जन्म तारीख, जात, धर्म ही माझी ओळख असणार..
सध्या पेपर मध्ये ज्या बातया वाचतो त्या वरून एखादा माणूस जन्म धमाने अमुक व आता अमुक आहे, जातीने हा होता आता हा आहे, नोकरी साठी कसे जात बदलवली वैगरे,
हे सगळे वाचुन आपण नक्की कोण आहोत? असा प्रश्न पडतो.. काय करणार उत्तर सापडावेच लागते, सध्यातरी मी 'मी'च आहे... आणी मी स्वतः हसायला लागले!
तुमची ओळख तुमच्या बोटाच्या ठस्यावरून, चेहरा, डोळे ह्यावरून करया साठी आधार कार्ड, डिजिटल ओळख! माझे आधार कार्ड!
हो ती जन्म पत्रिका, ती आधीच्या जन्मात कोण होती, आता कोण आहे, व पुढे कोण होणार कशी जगणार, बाकींच्या बरोबर माझे संबंध कसे असणार हे सांगायला माझी जन्मपत्रिका असणार, ती वाचायला चांगल्या विद्वानाकडेच जावे लागेल!
एकदा वर्गात आम्ही मैत्रिणी खेळत होतो!
नेहमीचा खेळ एका मैत्रिणीने डोळे बंद करणे व दुसरीने न बोलता ती च्या पाठीत धपाटा टाकून मी कोण आहे, कोणी तुला धपाटा टाकला बरे ओळख आता करत सगया आपल्या खी खी करून हसत राहायचो, मग ती काही नावे घेणार, मग आम्ही नाही ही नाही, दुसर नाव सांग, ओळखले नाव तरी, खूप वूळ ती रंडकूंडीला आली तरी नक्की कोण आहे हे सांगायचोच नाही!
ती सांगायची मी ओळखले ती सरोजच आहे, ती केसात माळत असलेल्या जाईच्या फुलांचा वास आला होता मला, ती हसली, व हळूच बोलली, तीच्या आवाजावरून ती सरोजच होती, पायातया चाळीचा आवाच छूमछूम, हो सरोजच होती!!
असे बरेच वर्णन करून सरोजच होती ती सांगीतले मग, सगळ्याचा हास्य फवारा, मग सरोज हो मीच होती, सरोजलापण प्रश्न पडला मी कोण आहे, ऐश् ने सांगितले तशी मी आहे का हो..
मग कोणी ऐश तु, छान हसतेस, तु मिळूनमिसळून वागते, असे अनेक पैलू सांगणार, मग स्वतःशीच नवीन ओळख झाल्या सारखे मी छान आहे हे ठरवते!
तर कोणी भांडकूदळ आहेस तू सारखी भांडत असते, आपलेच म्हणणे खरे करण्यासाठी, मग प्रश्न पडतो खरच मी भांडकूदळ आहे का? माझ उत्तर नाही असत.. स्वतःच स्वतःची ओळख रोच नव नविन होत राहते मला, व रोजच प्रश्न पडतो मी कोण आहे, मी, 'मी' आहे!
तसेही लहान असतांना कोणी घरी पाहुणे आले की ते विचारायचे तु कोण आहे तर मी 'मी'आहे असेच सांगत होती, दरवाजा वाजवत बाबा घरी आले की तेप मी आहे असेच म्हणत, मग त्यांच्या आवाजावरून, दरवाज्यावर मारलेल्या थापांवरून मी म्हणजे बाबा, हे ओळखत असू, तर कधी आई फोन वर तीच्या मैत्रिणींनि मी 'मी' आहे करत मग स्वतःचे नाव सांगत असे,
तसेही आता थोडी मोठी झाली, 'मी'ची ओळख, मी पणा मिरवू नको करत मैत्रिणींना चिडवायला लागले!
अजून मला 'मी' सापडली नाही, पण मी 'मी'च आहे, करत आपली ओळख स्वतःला करून देते, रोज नव्याने!!!
