Surekha Nandardhane

Others

3.6  

Surekha Nandardhane

Others

म्हातारपण हरवले तर?

म्हातारपण हरवले तर?

2 mins
177


खरचं म्हातारपण हरवले तर काय होईल ?

आपण याची कल्पना सुध्दा केली नाही पण बहुतांशी लोकं म्हणतील म्हातारपण हरवले तर चांगले होईल.

  पण आपले काय हरवेल 

 आपणही हे क्षण हरवणार 

  आपण टीव्ही वर वर्तमानपत्रात किंवा कोणाकडून ऐकतो की कुणाचे मुलं आईवडिलांना सांभाळत नाही कोणी वृद्धाश्रमात ठेवतात कुणी बाहेर गावी निघून जातात तर काही एका घरात राहून सुद्धा बोलत नाही .

त्याच्या मनावर काय परिणाम होईल ज्या वयात त्यांना आधाराची गरज असते त्या वयात त्यांना असे दिवस बघायला मिळतील .

    तीन दिवसांपूर्वी मी माझ्या मैत्रीण साठी काम शोधत होते तिला कामाची गरज होती . आम्हाला कळले की एका वृदाश्रम मध्ये काम आहे मग दोघी तिकडे गेलो

तिथे बरेच म्हातारे लोकं होती . काही तर ठीक होती पण काही खूप वयस्कर होते 

   कोनाच्या डोळ्यात अश्रू तर कोणी वाटेकडे डोळे लावून वाट बघत होते 

  त्यांचा तो निरागस चेहरा बघून खुप वाईट वाटले 

मनात विचार आला नको रे देवा हे म्हातारपण


 खरंच यांचे म्हातारपण हरवले तर ?

  हेच आईवडील आपल्या मुलांसाठी रात्र दिवस कष्ट करतात त्यांना काही कमी पडू नये म्हणून

  याच मुलांजवळ वेळ नसतो 

    आई वडील सर्वांना हवी असते पण जेव्हा ती म्हातारी होतात त्यांचे आजारपण वाढते तेव्हा नकोशी वाटतात.

  आज यांच्यामुळे च आपल्या संस्कृती चा वारसा चालत आहे.यांच्यामुळेच नात्यांचे धागे बांधून आहे

  हे म्हातारपण हरवले तर काय होईल . जास्तीत जास्त 

आपल्या मुलांना पांढरे केसांची मोठी आई दिसणार नाही 

 आजीच्या बटव्यातली औषध मिळणार नाही. रात्री भूताच्या गोष्टी सांगणारी आजी दिसणार नाही .

  बागेत फ़िरायला घेऊन जाणारे चॉकलेट आणणारे आजोबा दिसणार नाही .

याच सुखपासून आपणही वंचीत राहू

  हे म्हातारपण हरवू न देता नात्याला जपा 

 ते आजच्या आपल्या विचारात अनपढ असले तरी दुनियादारीत खूप हुशार आहे .


Rate this content
Log in