मेजवानी पितरांची !!!
मेजवानी पितरांची !!!


४ जी - ५ जी च्या जमान्यात जिवंत माणसांना एकमेकांना जोडण्यासाठी , सपंर्क करण्यासाठी वेगवेगळ्या 'सर्व्हिस प्रोव्हायडर' चा आधार घ्यावा लागतो... सोबतच चांगल्या 'मेक' चा हातात 'स्मार्ट' फोन' पण लागतो !!!
पितृ पंधरवडा आला की आठवण होते आपल्या पूर्वजांची. आपल्याला नाही आलीतरी करून देत कोणीतरी - नातलग ... अरे हो आता तर टीव्ही - चॅनेलवाले असतात धुमाकूळ घालायला…चर्च्यासत्र …वैगरे वैगरे…
कावळ्यांना बोलावून पितरांना मेजवाणी कशी देतात वैगरे वैगरे…
नदी किनारी भटजींची मनमानी वैगरे वैगरे ...
पुनर्जन्म आहे कि नाही याची चर्च्या करण्यात वेळ कश्यासाठी वाया घालवायचा...
मानू थोड्यावेळ पुनःर्जन्म आहे व त्याची घेऊ की मज्जा!!!
तीन पिढ्या एकत्र नांदताना आता कोणी पाहिले?... पण माहिती पाहिजे त्यांची पण नाव गाव.. गोत्र !!!
स्वः हा म्हणून पुढे जायचे…
देव देवतांची नावे, फुल वाहून पाण्यात सोड्यायची ... तीळ, गंध, फुले...
पुनर्जन्म आहे असे समजून मनात विचार येतो आणि गालावर हसू….
आधीच्या कुठल्यातरी पिढीत मीच असेल माझी कोणीतरी… नातं - पित्याचे, मातेचे, बहीणभावाचे !!!
मैत्रीचे!!! गुरुशिष्यांचे!!! सूडभावनेचे, घट्ट जिवाभावाचे!!!
कोणास ठाऊक कसे होते ? राहिल्या असतील माझ्याही काही अतृप्त इच्छा आकांशा ?
भूकबळी माझाही झाला होता का? ठेवले होते का मी कोणास उपाशी?
मनुष्य जन्म हा मिळाला ह्या जमी ...'मी'च माझे पितर बनून घेऊ दे की मला मेजवानीची मज्जा…
खाऊदे गरम गरम उडीद वडे, खीर पुरी, वरण भात,भजे आणि ओरपू दे कढी!
बोलवू दे माझ्या सगे सोयऱ्यांना माझ्या सोबत मेजवानीचा लाभ घ्यायला !!!
करू दे मला 'मी' च पितर जेवणाचं 'सिलेब्रशन'!!!
अहो तिथी नाही माहित ? काही हरकत नाही…
आहे त्याच्यावरही आमच्या कडे 'सोलुशन '!!! सर्वपित्री अमावास्या !!!... ती ही नाही माहित असेल तर ... करा रोजच मेजवानी ... उपाशी कोणी असेल तर करा मदत त्याला जेवणासाठी ... शिक्षणासाठी मदत पाहिजे असल्यास, मदत करा शिक्षणासाठी ... थोडावेळ काढून प्रेमाने दोन शब्दही बोला आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींशी !!!