STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

मैत्री

मैत्री

2 mins
13

मैत्री...
 मैत्री एक अमूल्य ठेवा आहेच.या मैत्रीचा हल्ली मात्र उहापोह झालेला दिसतो. मैत्रीच्या नावावर अनेक प्रकार केले जातात. जे दृश्य,अदृश्य असतात. डिजिटल युगातील मैत्री उपयोगाची नाही. या मागचे कारण असे की समोरची व्यक्ती कोण आहे हे आपल्याला दिसत नाही. मग मैत्रीपूर्ण व्याख्या बदलत जातात. जीवाला जीव देण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या तरी सुद्धा.. माणूस प्रत्यक्ष समोर दिसत नाही. मग कधीतरी गेट-टुगेदर केले जाते. गेट-टुगेदर मधून आपल्याला माणूस समजतो. तोपर्यंत या माणसाची या व्यक्तीशी मैत्री आपली कशी आणि का झाली हे नंतर विचारांती आपल्याला समजते. या मैत्रीत कधी फसवत होते तर कधी खरंच एक चांगला मैत्रीचा हिरा मिळून जातो. यासाठी डिजिटल मैत्रीवर खूप विश्वास ठेवू नये असे माझे वैयक्तिक मत आहे. आपण शालेय जीवनामध्ये जी मैत्री केली आहे, ती मैत्री आजही या डिजिटल युगात ती टिकून आहे. पस्तीस वर्ष जी मैत्री आपण मनात ठेवून होतो त्या मैत्रीला तर मुहूर्त स्वरूप येत आहे या विविध नेटवर्किंगच्या माध्यमातून. डिजिटल युगाच्या माध्यमातून. आपलेच जुने मित्र आपल्याला इंस्टाग्राम, whatsapp, facebook यावर मिळतात. आणि खरच खूप आनंद होतो. मग गेट-टुगेदर होते.फ्रेंड्स एकत्र येतात. जुन्या मित्रांच्या परत नव्याने ओळखी होतात. कोण कोणत्या क्षेत्रात कामाला आहे हे समजते. जुन्या गप्पांना उधाण येते. ही आपली खरी मैत्री असते. हे दृश्य स्वरूपात अनुभवलेली असते. याला मूर्त स्वरूप प्राप्त झालेले असते. आणि कोण कसा आहे हे आपल्याला माहित असते जरी आता मोठेपणी स्वभाव बदलले तरी मूळ स्वभाव जात नाही हे खरे आहे. आपल्या नोकरीच्या ठिकाणी किंवा आपल्या घराच्या आसपासचे मित्र, समाजातील मित्रपरिवार आहे असे दृश्य स्वरूप मैत्रीचे खूप चांगले आहे. या दृश्य स्वरूपातील मैत्रीमुळे लोकांचे स्वभाव कळतात आणि मैत्री कितपत त्यांच्या ठेवायची हे समजते. खोलवर मैत्री कोणाशी करायची भरभर मैत्री कोणाशी करायची हे देखील समजते. त्यामुळे आपल्या मैत्रीमध्ये बघा अशी काही माणस असे असतात की आपण आपल्या मनातील सर्व गुपित त्यांना सांगून रिकामे होतो. कारण आपल्याला खात्री असते ही माणसं पुढे बोलणार नाहीत. आणि त्यावर आपल्याला उत्तम सल्लाही देतील. डिजिटल युगातील मैत्री करताना सावधगिरीने करावी. प्रत्यक्ष भेटल्याशिवाय मैत्रीच्या व्याख्या पूर्ण करू नयेत. नाहीतर आपल्याच मैत्रीच्या या व्याख्येमध्ये आपणच अडकणार हे मात्र शंभर टक्के खरे आहे. म्हणून डिजिटल युगातील मैत्री काळजीपूर्वक करावी. स्वतः खात्री केल्याशिवाय त्या व्यक्तीची त्या व्यक्तीशी जास्त बोलू नये. संपर्क करावा पण तो संपर्क झाल्यानंतर ती व्यक्ती खरंच मैत्रीला योग्य आहे का हे पहावे आणि मैत्री पूर्वक संबंध पुढचे जपावेत..
 वसू ✒️


Rate this content
Log in