Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Anuja Dhariya-Sheth

Others


3  

Anuja Dhariya-Sheth

Others


माझी ओळख...हाच माझा दागिना..३

माझी ओळख...हाच माझा दागिना..३

4 mins 313 4 mins 313

पुढच्या कार्यक्रमाची सुरवात झाली...देशमुख मॅडम येऊन सावी ला घेऊन गेल्या....पण सावी मात्र भूतकाळात गेली.... बघूया काय आठवत असेल तिला?

इथे येऊन आपण थांबलो होतो....आता बघूया पुढे......

सुधा काकू आणि सुरेश काका......अगदी छान जोडी....त्यांची मुले म्हणजे मोठा समीर आणि छोटी सावी....

खुप् लाडू बाई होती सावी.....लहान होती आणि त्यात मुलगी....काकाना मुली फार आवडत, त्यात दोन पिढी नंतर मुलगी झाली म्हणून सावी चे खूप लाड केले...पण शिस्तीच्या बाबतीत तेवढेच कडक.....दोन्ही मुलाना खूप छान वाढवले....चांगले शिक्षण दिले....सावे...अशीच हाक मारत तिला काका.....सावी ला लहान असल्यापासूनच चिञकला खूप आवडत असे...तिची चित्रे खूप छान असत....हळू हळू मोठी झाली....कला क्षेत्र निवडून पदवी घेतली तिने....

मोठा Dr झाला....त्याचे लग्न झाले आणि अंकीता आली....छान होती स्वभाव ला पण समीर कायम तिची तुलना सावी सोबत करी....त्याला बहिणी चे फार कौतुक....हि एकच गोष्ट अंकिताला खटकत असे....त्यामुळे ती सावी चा राग करी.....त्यांचा प्रेम विवाह होता.....अंकिता ला डान्स, अभिनय याची आवड दिसायला पण छान होती fashion Designer होती.....

तिला एकदा सावी आणि सागर बदल समजले.....तिला वाटलं हाच चान्स आहे सावी ला सर्वांसमोर खजील करण्याचा....तिने माहीती काढायला सुरुवात केली.....

तेव्हा तिला समजले की तो गरीब आहे...घरी फ़क्त आई आहे बाबा नाहीत त्याला.....त्याचे आणि सावी चे गेले दोन वर्षे प्रेम आहे....

तिने घरात स्वतःच्या नात्यात असलेले एक स्थळ आणले सावी साठी.....काका एकदम खुश झाले सून बाई वर.....त्यांनी सावी ला बोलावले....आणि सांगितलं....तिला वाटले दादा ला दिली तशी मला सुद्धा बाबा परवानगी देतील....म्हणून तिने आपल्या प्रेमाची कबूली दिली....पण सुरेश काका एकदम ओरडले....सावे हे शक्य नाही....धावत सर्व आले...काय झाले बघायला...तर काकांचा चेहरा एकदम लाल झाला होता....

काकू घाबरत म्हणाल्या काय झाले??? ह्या पोरीनं नाव खराब केले माझे....प्रेम आहे म्हणे....शोभतं का हे??? तुमचे लक्ष नाही....अंकिता ने लगेच उचलून धरल, बरोबर बोलतायत बाबा...मुलगा कसा आपल्या बरोबरीचा हवा....हो सून बाई...खर आहे तुमचे आमचा प्रेमाला विरोध नाही...पण तोला मोलाचे हवे....आम्हाला हे मान्य नाही.....

सावे आम्ही बघितले आहे तिथेच तुझे लग्न होईल.....ती खूप रडली...पण काही उपयोग नव्हता....तिने सागर ला फोन केला आपण पळुन जाऊ माझे बाबा ऐकणार नाहीत....खूप कडक आहेत....मी नाही राहूं शकत तुझ्याशिवाय....

शेवटी जे व्हायला नको तेच झाले त्यांनी पळून जाऊन लग्न केले....आणि अंकिताने जखमेवर तिखट मीठ लावुन तिच्या साठी या घराचे दार कायमचे बंद केले....

काकांना खूप धक्का बसला....काकू तर रडत होत्या.....काकांनी सांगितलं ती आपल्याला मेली....तिच्याशी कोणीच बोलायचं नाही....नाहीतर माझे मेलेले तोंड बघायला लागेल...

आज तिच्या लग्नाला १० वर्ष झाली तरी कॊणी बोलत नव्हते की कॊणी साधी चौकशी सुद्धा केली नव्हती....

मधल्या काळात खूप घडामोडी घडून गेल्या....त्यांचा संसार खूप छान सुरू होता....एक मुलगी होती त्यांना....सागर मेहनती आणि चांगला मुलगा होता..सावी ची चिञकला पण लोकांना आवडत होती....आणि खूप मागणी होती तीच्या चित्रांना......पण तिचे नाव ती लावायची नाही चित्राखाली....त्यामुळे ती अज्ञात कलाकार म्हणून प्रसिद्ध होती....फ़क्त एक सिम्बॉल लावायची....आयुष्यात एवढे चढ उतार आले की तिच्या मधल्या नव्या कलेचा तिला शोध लागला...उत्तम लेखिका झाली....तीच्या सासूबाई एक टपरी चालवत होत्या....त्या गेल्यावर तिथे काही बदल करून तिने...छोटे खानावळ उभी केली अगदी कमी दरात.... ना नफा ना तोटा....असे उद्दीष्ट होते तिचे.....आणि मागच्या महिन्यात सागर ने तिच्या साठी हा फ्लॅट घेतला होता....विकत पण त्याने मुद्दामून भाड्याने घेतला असे सांगायला लावले.....

इकडे सुधा काकूं ची स्थिती काही वेगळी नव्हती.....त्यांना सुध्दा वाट्त होते लेक समोर आहे तर तिला भेटावे, तिला प्रेमाने जवळ घ्यावे....सावी साठी केलेले दागिने तिला द्यावे...पण तिचा स्वाभिमान त्यांना माहित होता आणि अजूनही तो तसाच होता....तें त्यांनी थोड्या वेळा पूर्वी बघितलं होते....त्यात मुलाला दोन्ही मुले, मुलगी नव्हती त्यामुळे नाती बद्दल त्यांना प्रेम वाट्त होते....पण काकां पुढे त्यांचे काही चालत नव्हते.....

ती सोसायटी मध्ये राहायला आलेली समजल आणि काका परत गरजले कॊणी तीच्या सोबत बोलणार नाही.....लक्षात ठेवा सर्वानी.....

 सावीला सुद्धा आई जवळ बोलायचे होते, तिची तिने केलेली प्रगती आईला सांगायची होती....खूप मोठी व्यक्ती झाली होती सावी....पण अगदी साधी राहणीमान असायच तिचे....तिला दिखावा आवडत नसे....आणि स्वतः च स्वतः चे कौतुक करायचे तिला कधी जमलंच नाही.....

आणि घरच्या कोणीच ती काय करते काय नाही याची चौकशी साधी बाहेरून सुध्दा केली नव्हती....एवढी वर्ष झाली तरी राग तसाच होता आणि तो ठेवायला अंकीता खत पाणी घालत होती.....

तेवढ्यात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सावी ने डोळे पुसले...आणि भानावर आली.....

देशमुख मॅडम मात्र खूप ऍक्टिव्ह होत्या सोशल म्हणा, कला म्हणा सगळ्याच गोष्टीची आवड होती त्यांना....आणि सोसायटी मध्ये राहणार्या प्रत्येक व्यक्ती बद्दल महिती करून घेणे, आणि मैत्री करणे खूप आवडत असे....त्यामुळे सावी बदल त्यांना सर्व माहीती होते....फ़क्त त्यांनी सावी ला तसे सांगितलं नव्हते.....

दोघी पण आपआपल्या विचारात असतानाच परत एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला... कारण आता कार्यक्रमाची सांगता होणार होती....आणि सर्व जणी ऑल राऊंडर अशा प्रमुख पाहुणे याना भेटायला उत्‍सुक होत्या....

देशमुख मॅडम त्यांच्या स्वागत करण्यासाठी तयारी करायला गेल्या होत्या.....

सर्व जण अगदी विचार करत होते कोण असेल?? तुम्ही पण विचार करा आणि वाचा पुढच्या भागात....

काय होते सावी चे??

कोण असेल पाहुणे?

सुधा काकू आणि वहिनी काय म्हणेल?


अजून लेख वाचत राहण्या साठी मला फॉलो करायला विसरू नका..... लाइक आणि कंमेंट करत रहा.....

सूचनांचे स्वागत....


Rate this content
Log in