Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Anuja Dhariya-Sheth

Others

3.8  

Anuja Dhariya-Sheth

Others

माझी ओळख...हाच माझा दागिना...१

माझी ओळख...हाच माझा दागिना...१

3 mins
879


सहजीवन सोसायटी मध्ये महिला दिनाची जोरात तयारी चालू झाली होती.....सोसायटी खूप मोठी होती त्यामध्ये १०-१५ मोठ्या complex होत्या आणि प्रत्येक complex मध्ये ५ विंग....जणू काही छोट नगरच होते.....सगळ्या महिला अगदी उत्सव असल्या सारखी तयारी करत होत्या.... सोसायटी च्या अध्यक्ष सौ. माधुरी देशमुख अगदी उत्साही होत्या.....सगळ्याची त्यांना खूप आवड....त्यामुळे गेले ५वर्ष त्याच अध्यक्ष होत्या....आणि ते ही बिनविरोध.... असो तर अशी गोकुळ असल्यासारखी ही सोसायटी..... प्रत्येक सण उत्साहपूर्ण साजरा करायची.....पण ह्या महिला दिनाची गोष्टी जरा वेगळी होती.....कार्यक्रम पण वेगळे होते....आणि सकाळी ७ ते रात्री ९ सर्व बायकांची तिथे सर्व बाबतीत सोय केली होती. एकंदरीत खूप मोठा कार्यक्रम होता.....आणि प्रमुख पाहुणे म्हणून येणारी व्यक्ती ही खूप मोठे व्यक्तीमत्व असलेली होती....पण तिचे नाव आधी सांगायचे नाही अशी तिने अट घातली होती....त्यामुळे सर्व महिलांना अगदी उत्सुकता होती..... आणि अखेर तो दिवस आला.


सर्वांत पहिला कार्यक्रम होता सायकलींगचा....सर्व आपल्या सायकली घेऊन सज्ज.....तेवढ्यात सावी आली तिथे.....तिच्या हातात असलेली सायकल बघून सर्व हसायला लागल्या....कारण थोडे जुने मोडेल होते सायकलचे.. सगळ्यांची कुजबुज सुरू झाली... कोण गं ही??? तेवढ्यात कोणतरी बोलली अगं आताच राहायला आलेत, भाड्याने घेतलाय गोखलेंचा फ्लॅट.... आणि जुनी ओळख पण विसरलीस का??? अगं आपल्या सुधा काकू आहेत ना त्यांची मुलगी....अगं पळून जाऊन लग्न केलं ना तीच ही....तेवढ्यात देशमुख मॅडमनी घोषणा केली सर्वांनी तयार रहा.... आपली ही रॅली शिस्तबद्ध वाटायला हवी....सगळ्यांना विनंती कृपया सहकार्य करा.... तशा सर्व बायका चूप झाल्या....नवीन बायका होत्या त्यांना काही माहिती नव्हते...त्यामुळे त्या खूप छान वागल्या सावीशी.....जुन्या उगाच जखमेवर मीठ चोळत होत्या....पण तिने दुर्लक्ष केले....आणि सायकल रॅली खूप छान झाली....आणि ज्यांना सायकल चालवणे शक्य नव्हते त्यांना पण सहभागी होता यावे म्हणून 2 wheelar रॅली पण ठेवली होती.... देशमुख मॅडम चा हाच स्वभाव होता की सगळ्यांना भाग घेता आला पाहिजे....म्हणून तर त्या सर्वांच्या लाडक्या होत्या.....तर असा हा पहिला कार्यक्रम खूप छान झाला....


त्यानंतर सर्वांना चहा, कॉफी ठेवली होती, देशमुख मॅडम स्वतः सर्व आवर्जून बघत होत्या.... सावी नुकतीच रहायला आली होती.... आणि तिच्यासोबत पण त्या छानच वागत होत्या..... आणि अचानक सुधा काकू आणि सावी समोरासमोर आल्या...तिची आईच त्या....त्यांना बघून तिला भरून आले....त्यांना ही वाट्त होते पोटच्या पोरीला जवळ घ्यावे....पण सर्व आठवलं मागचे आणि त्या रागाने निघून गेल्या.....बाजूच्या बायका बघत होत्या सर्व.....आणि लांबून मजा बघत होत्या.... तेवढ्यात परत देशमुख मॅडमनी पुढचा कार्यक्रम घाेषित केला...आणि सर्व बायका तयारीत मग्न झाल्या..... तेवढ्यात कोणीतरी विचारले मॅडम आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या आल्या नाहीत??? मॅडम म्हणाल्या अहो आल्यात त्या, सायकलिंगपण केले त्यांनी आपल्यासोबत...पण त्यांची अट आहे ना म्हणून नाव घेतले नाही....त्यांना सर्व कार्यक्रम अगदी एन्जॉय करायचे आहेत तुमच्यासोबत म्हणून तर त्या शेवटी म्हणजे अगदी बक्षिस वितरण सोहळा होईल तेव्हाच स्टेजवर येणार आहेत....


आता मात्र सर्व बायका विचार करू लागल्या....कोण नवीन होते का सकाळी.....पण सोसायटी एवढी मोठी होती....बरेच चेहरे तसे नवीन....पण देशमुख मॅडम मात्र सर्वांना अगदी नावासकट ओळखत असत..... पण दुसरा कार्यक्रम सुरू होणाऱ त्यामुळे जास्त कॊणी मनावर घेतले नाही....सर्व तयारी करायला गेल्या.... आता बघू या पुढच्या भागात.....कोणता कार्यक्रम आहे? आणि कोण असेल प्रमुख पाहुणे? (क्रमशः)


Rate this content
Log in