Anuja Dhariya-Sheth

Others

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Others

माझी आऊ...

माझी आऊ...

3 mins
263


अजूनही मृणाली सावरली नाही हो वहिनी... शोभा ताई काळजीने म्हणाल्या.


शोभा ताई म्हणजे तिच्या वडीलांची आई त्या आपल्या विहीणबाईंना म्हणाल्या..


नुकत्याच झालेल्या मानसिक धक्क्यातून सर्व जण सावरत होते. मृणाली म्हणजे महेश आणि मानसी यांची लाडाची एकूलती एक लेक..


अख्ख जग या कोव्हीडमुळे थांबल, प्रत्येक कुटुंबाला या कोरोनाने एकावर एक धक्के दिले त्यातलेच हे कुटुंब...


खर तर मानसी आणि महेश यांचा सुखाचा संसार सुरु होता, कोरोनामुळे लॉकडाउन झाले आणि तें तिघेही मस्त तें एन्जॉय करत होते, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आई बाबा घरी त्यामुळे माऊ म्हणजेच मृणाली खूप खुश होती. तिचा जन्म झाल्यापासून मानसी घरीच होती, माऊ आणि तिची आई म्हणजे वेगळेच नाते होते, हळू हळू माऊ मोठी झाली आणि मानसी हळू हळू नोकरी साठी बाहेर पडली.. खूप छान सुखी कुटुंब होते. शेवटी दॄष्ट लागावी असेच झाले.


कोरोनाचे सुरवातीचे लॉक डाउनचे दिवस त्यांनी एकत्र छान घालवले, आऊ आणि माऊ दोघी मस्त एकत्र खूश होत्या. आऊच म्हणायची ती आईला...


आऊला सोडून तर ती कुठेच जायची नाही ती.. पण आज या कोरोनाने तिच्या आऊला मात्र तिच्या पासून कायमचे दूर नेले. तेव्हा पासून कोमेजून गेली होती. जास्त कोणाशी बोलायची नाही, महेश पण ६ महिने झाले तरी तेवढा मोकळा झाला नव्हता.


मानसी गेली जणू अख्ख्या घराचे चैतन्य गेले, महेशपेक्षा सुद्धा दोन्ही आजी माऊची काळजी करत होत्या.. मानसीचा तिला आवडणारा फोटो, सतत हातात घेऊन असायची..


आज तिची मावशी लंडनवरून येणार होती, दोन्ही आजीना आशेचा एक किरण दिसत होता, त्यांना मनापासून वाटत होते की, मानसीची बहीण मनवा नक्कीच तिला या धक्क्यातून बाहेर काढेल..‌


मनवाच्या येण्याने वातावरण थोडेसे हलके-फूलके झाले होते. दोन दिवस कोणीच काही बोलायचं नाही, अशी तिने ताकदच दिली होती..


मनवाने खूप मस्त मस्त गिफ्ट आणले होते, माऊ त्या गिफ्ट कडे बघत पण नव्हती. ११ वर्षाची माऊ हातात घेतलेला आऊचा फोटो काही सोडत नव्हती. शेवटी मनवाने असे काही युक्ती केली की माऊ बऱ्याच दिवसांनी बोलायला लागली.


मनवाने मानसीचे खूप सारे जुने फोटो आणले होते, मानसीला सर्वच गोष्टींची आवड होती, डान्स, वक्तॄत्व, रांगोळी.. शाळा कॉलेज मध्ये बक्षीस मिळाल्या‌वर काढलेले खूप फोटो घेऊन माऊला आवडतील त्या फोटोंचे छान कलेक्शन केले. प्रत्येक फोटो सोबत मानसीची आठवण सांगत सांगत तीने तिला छान समजावले. माऊ तुझी आई आज असती ना तर तिला तिची मॄणाली अशी आवडलीच नसती. आता पण या फोटोमधून ती आहे, ती तुझ्याकडे बघते आहे, तू अशी रडलीस, शांत बसलीस तर तुझ्या आऊला आवडेल का? तिची खूप स्वप्न होती, माझी माऊ खूप शिकून मोठी होईल, खूप गुणी मुलगी आहे. माझ्या सारखेच माझ्या माऊला सगळ्यात बक्षीस मिळतील बघ मनु.. असे मला ती नेहमी सांगायची..


खरच मावशी, आऊ असे म्हणायची का ग? माऊने उत्सुकतेने विचारले, तिच्या चेहऱ्यावर परत वेगळीच चमक बघून दोन्ही आजी, महेश याना खूप छान वाटले.. त्या दिवसापासून तिने परत एकदा उभारी घेतली.. परत पहिली माऊ सर्वांना भेटली.. महेशसूद्धा बऱ्याच दिवसांनी खुश होता, जणू माऊच्या चेहऱ्यावर आलेली चमक त्याच्या आयुष्याला जगण्याची वेगळीच दिशा मिळाली होती..


प्रत्येक स्पर्धेला, परीक्षेला जाताना मात्र तीच्या आवडीचा असलेला आऊचा फोटो ती नेहमीच सोबत ठेवायची..


Rate this content
Log in