Anuja Dhariya-Sheth

Others

3  

Anuja Dhariya-Sheth

Others

माझे स्वातंत्र्य

माझे स्वातंत्र्य

4 mins
222


प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य हवे असते... रोज कामाचा रामरगाडा आवरुन ती कंटाळत असते.... पण या सगळ्या गोष्टींचा कितीही कंटाळा आला तरी तिला स्वातंत्र्य कधी मिळत नाही... कधी मोकळीक मिळत नाही...आपण बघणार आहोत अशाच एका तिची कथा.....


अनुपमा एक ग्रॄहीणी.... मेनोपॉज जवळ आलेला त्यामुळे मनात असंख्य नकारात्मक विचार... सतत दुसऱ्यांसाठी झटणारी स्वतःला वेळ न देणारी....त्यामुळे बऱ्याच वेळा दुसऱ्यांकडून कळत नकळत पणे गृहीत धरली गेलेली... मी कोणाला नको झाले..असे काही बाही विचार करणारी.... म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या आजू बाजूला सहज दिसणारी... अशी होती...


लॉकडाउन आल्यापासून तर अगदी मेटाकुटीस आली होती... रोज न संपणारी कामे आणि सगळ्यांच्या येणार्या फर्माईश पुरवता पुरवता अगदी तिने स्वतःला त्या कीचन मध्ये लॉक करून घेतले होते.... तिला तिच्या मैत्रिणीने किती वेळा सांगितलं होते,मुले मोठी झाली की थोडी बाहेर पड...तुझे स्‍वतंत्र अस्तीत्व निर्माण कर...पण ती सतत घराचा आणि घरातील माणसांचा विचार करी... आणि परत जैसै थे... त्यामुळे सर्वाना तिची एवढी सवय झाली की ती दमत असेल असा विचार कॊणी करत नव्हते....आता तिला पश्चाताप होत होता पण... काही उपयोग नव्हता....


एक दिवस अचानक ताप आला...त्यात हे कोरोनाचे वातावरण ....दोन दिवस झाले ताप काही जाईना... टेस्ट केली तर पॉसिटीव्ह... घरात बाकी सर्वांच्या टेस्ट झाल्या त्या नेगेटिव्ह होत्या... लगेच हिला घरीच वेगळे ठेवण्यात आले... आता तिला सगळ्या पासून सुटका मिळाली होती... आणि ती स्‍वतंत्र झाली होती.... पहिला दिवस तिला कंटाळा आला... एवढी कामाची सवय.. आणि हे असे बसून राहणे,तिला सवय नव्हती... जड जात होते...


घरातील बाकीच्या लोकांची परिस्थिती तर अजून वेगळी... दोन मुले...नवरा याना कसलीच सवय नव्हती...घरात एवढी कामे असतात...हे माहिती नव्हते... आता त्यांना अनुपमा आठवत होती... तिलाही फार वाईट वाट्त होते..पण ती काहीच करू शकत नव्हती....


दुसरा दिवस उजाडला... ती झोपली होती... आज किती वर्षांनी ती एवढी गाढ झोपली होती... रात्री बराच वेळ ती जागी होती.... विचार करत होती... थोडीशी घाबरली पण होती... तिला स्वातंत्र्य तर हवे होते... पण हे असे स्वातंत्र्य मिळेल असे तिला वाटलं नव्हते...तिला एका खोलीत ठेवले होते...बाहेर वाकून बघितलं हळूच...प्रत्येक जण काही ना काहीतरी काम करत होता.... त्या सर्वांना असे काम करताना ती पहिल्यांदा बघत होती... तिला खूप छान वाटल... तिच्या मैत्रिणीचे वाक्य तिला आठवल आणि पटले सुद्धा... पडत धडपडत शिकत होते सर्व...


ती म्हणाली चला मला असे स्‍वतंत्र राहावे लागले पण जो तो स्वतंत्र होत आहे... तिने आवाज दिला तसा तिचा मुलगा तिला चहा, नाश्ता देऊन गेला... त्यांच्या डोळ्यात तिच्या विषयी असलेले भाव बदलले होते...तिला जाणवत होते...पण जवळ घेऊ शकत नव्हती ती कोणाला...


अन मग् ती विचारात हरवली... बऱ्याच दिवसांनी एखादी गोष्ट मिळाली की काय करू अन काय नको होते तसे झाले होते तिचे... आधीची ती आठवत होती तिला...किती छान लिहायचे मी... किती छान पेंन्टीगज होती माझी... आता या मिळालेल्या स्वातंत्र्याचा मी उपयोग करणार.... अजून 8 दिवस होते आयसोलेशनचे... तिला जवळच मुलांचे कलर्स दिसले... तिने भींतीवर खूप छान पेंन्टीग करायला सुरुवात केली.... कोणीच नव्हते... एकदा- दोनदा नवरा मुले बाहेर उभे राहून गप्पा मारायला आले... पण त्यांचा दिवस कामांत जास्त जात होता... कधी सवयच नव्हती, त्यामुळे वेळ लागत होता... वस्तू शोधून शोधून त्यांना कंटाळा येई, चार दिवसांनी तिच्या मैत्रीणीना समजले मग् रोज एक जण डब्बा देऊ लागली.... मग् थोडा वेळ मिळू लागला घरातल्यांना...


दार उघडे होते..‌ मुलाने तिला चहा ठेवलाय म्हणून आवाज द्यायचा डोकावले तर काय... रूम अगदी छान दिसत होती... त्याने बाबांना हाक मारली लांबून सर्वानी बघितले... आपली आई असे काही करू शकते, हे मुलांना माहीती नव्हते... सगळ्यांना आनंद झाला... दोन दिवसांनी रिपोर्ट येणार होते... रिपोर्ट नेगेटिव्ह आले आणि तिची त्या स्वातंत्र्या मधून सुटका होणार होती. घरात सर्वांनाच आनंद झाला होता... तिलाही झाला होता, पण ती द्विधा मनस्थितीमध्ये होती...


तिच्या मनाची अवस्था अतुल ने म्हणजे तिच्या नवऱ्याने ओळखली. तो तिला म्हणाला, अनु... ती बघतच बसली,आज किती तरी वर्षाने त्याने तिला अनु म्हणून हाक मारली होती... अतुल म्हणाला, हे बघ अनु, आता या आजारामुळे तूला जे स्वातंत्र्य मिळाले, त्याचा तू खूप छान उपयोग केलास.. आता मागे वळू नको.. तूला जे आवड आहे तें तू कर... आम्ही आता तूला कशात अडकून ठेवणार नाही... एवढे वर्षे तू आमच्या साठी घालवलेस, आणि त्याची किंमत आता आम्हाला कळत आहे..आम्हाला माफ कर... दोन्ही मुलांनी माफी मागितली...


अनु मनात त्या कोरोनाचे आभार ‌मानत होती, ज्यानें तिला स्वतंत्र केले होते अशा पारतंत्र्यामधून कि जे कारण नसताना तिनेच स्वतःहून ओढून घेतले होते...


या कथेतुन मला एवढंच सांगायचं आहे की वेळीच स्‍वतंत्र व्हा अन स्वतःची वेगळी ओळख निर्मांण करा....

अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका...


साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


Rate this content
Log in