माझे मुलं
माझे मुलं
❤️ माझ्या लाडक्या मुला… ❤️ जेव्हा तू माझ्या पोटात होतास, तेव्हाच मला जाणवलं होतं की जगातलं सगळ्यात सुंदर नातं माझ्या आयुष्यात येणार आहे. तू माझ्या पोटात हळूहळू वाढत होतास… तुझी नाळ माझ्या नाळेशी जोडली गेली आणि त्या क्षणापासून माझं आयुष्यच तुझ्याशी जोडून गेलं. तू तुझ्या पप्पांना पप्पा बनवलंस, पण मला मात्र तू जन्माआधीच आई बनवलं होतंस. ❤️ तुझं हसणं, तुझं रडणं, तुझी खुशी, तुझं दुःख, तुला कशाचा त्रास होतो, तुला कशाची अॅलर्जी आहे, तुला कधी काय हवं असतं आणि काय नको असतं… या सगळ्या गोष्टी कदाचित तुलाही कधी कधी माहीत नसतील, पण एक आई म्हणून मला त्या जाणवतात. कारण तू माझ्या रक्ताचा अंश आहेस… माझ्या हृदयाचा तुकडा आहेस. ❤️ लोक नेहमी म्हणतात, “मुलाला जास्त लाडाने वाढवू नका.” पण मला असं वाटतं—ज्या मुलाला आपण प्रेमच दिलं नाही, त्याचे लाड कसे पुरवणार? म्हणून मी तुला प्रेम दिलं, लाड केले, जपलं… कारण तू माझा मुलगा आहेस. आणि तू माझा मुलगा आहेस याचा मला आयुष्यभर अभिमान राहील. तुझ्यामध्ये मला माझं प्रतिबिंब दिसतं… आणि तुझ्या पप्पांचंही. तुझ्या पप्पांमध्ये मला स्वाभिमान, मेहनत, कष्ट करण्याची ताकद आणि सुंदर मन दिसलं. त्या सगळ्यांचं प्रतिबिंब मला तुमच्यामध्ये पाहायला मिळतं. तुमच्या दोघांच्या रक्तात माझा आणि तुमच्या पप्पांचा अंश आहे. आम्हाला जे संस्कार मिळाले, तेच संस्कार तुम्हाला देण्याचा मी मनापासून प्रयत्न केला. कधी तुमच्या हातून चुका झाल्या असतील, तर त्या मनाला लावून घेऊ नका. माणूस चुका करूनच शिकतो. चूक झाली तर त्यातून काहीतरी नवीन शिका, स्वतःला सुधारा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. आयुष्यात एवढं मोठं व्हा की, ज्या आईने तुम्हाला मोठं केलं, सुख-दुःखात तुमची साथ दिली, प्रत्येक पावलावर तुमच्या पाठीशी उभी राहिली… त्या आईला तुमच्याकडे पाहून मनापासून अभिमान वाटला पाहिजे. तुम्हाला राजकुमारांसारखं आयुष्य देण्याचा मी प्रयत्न केला. आता तुमचंही एक कर्तव्य आहे—मला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि अशी कामं करा की माझं मन अभिमानाने भरून येईल. कधी माझ्यात आणि तुमच्यात मतभेद होतील. कधी माझे शब्द तुम्हाला आवडणार नाहीत. कधी माझा राग येईल. पण त्या मतभेदांमुळे आपलं नातं कधीही तुटू देऊ नका. कारण काळ जसजसा पुढे जाईल, तसतसं माझं वय वाढत जाईल. माझे हात-पाय पूर्वीसारखे चालणार नाहीत. माझी ताकद कमी होईल. कदाचित माझी चिडचिडही वाढेल. कधी मी थकेन… कधी हारेन… कधी रागावेन… पण त्या वेळी माझ्या शब्दांना मनाला लावून घेऊ नका. कारण तुम्ही दोघे आहात म्हणूनच मी आहे. तुम्ही दोघेच माझी ताकद आहात. तुम्ही दोघेच माझ्या जगण्याची उमेद आहात. ❤️ माझ्या मुला, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही खूप मोठे व्हाल. तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडतील. तुमची स्वप्नं पूर्ण होतील. आणि एक दिवस तुम्ही अशी व्यक्ती व्हाल की, लोक तुमचं नाव घेताना म्हणतील— “ही त्या आईची मुलं आहेत, जिने त्यांना खूप प्रेमाने आणि संस्कारांनी वाढवलं.” त्या दिवशी माझ्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू असतील… आणि मनात फक्त एकच भावना असेल— “माझ्या मुलांवर मला खूप अभिमान आहे.” ❤️ माझ्या लेकरांनो, आयुष्य कितीही मोठं झालं, कितीही दूर गेलात तरी एक गोष्ट कधीही विसरू नका— तुमची आई तुमच्यावर आज जितकं प्रेम करते, तितकंच शेवटच्या श्वासापर्यंत करत राहील. तुम्ही माझ्या आयुष्याची फक्त दोन मुलं नाही… तुम्ही माझं संपूर्ण जग आहात. ❤️ — तुमची आई ❤️ My Dear Sons… माझा अभिमान, माझी ताकद, माझी जगण्याची उमेद. 🌹
