माझाही संसार...
माझाही संसार...
सुनीत आणि स्नेहल यांचा प्रेमविवाह...दोन मुले आणि ते दोघे छान चौकौनी सुखी कुटुंब...लग्न जरी दोन्हीकडून मान्य केले असले तरी, थोडे अंतर ठेवूनच वागायचे सर्व...
आता आलेले लॉकडाउन त्यातून बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, दुर्दैवाने सुनीतची नोकरीसुद्धा गेली...
स्नेहल शिक्षिका असल्यामुळे तिचे ऑनलाईन स्कूल सुरु होते...त्यात कामाला कॊणी नाही, मुले घरात तिची खूप ओढाताण होत होती...
सुनीत कोणत्याही कामाची लाज न बाळगता मदत करत होता... शेजारी असलेल्या रमाकाकूंना हे काही बघवलं नाही... त्यांनी लगेच तिच्या सासूला सांगितलं... आईने फोन करून स्नेहलला खूप बोल लावले... ती रडू लागली... आईने सुनीतला समजावले अशी कामे केलीस तर, बायको डोक्यावर बसेल... त्याने ऐकून घेतले... अन् स्नेहलला म्हणाला, अगं संसार माझा पण आहे... मी नाही मदत करणार तर कोण करणार?