माहेर....
माहेर....


माहेर हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर एकच व्यक्ती येते ती म्हणजे "आई" या एका शब्दात आख्खं माहेर सामावलेले असते,
आई जिला आपला आवाज ऐकताच आपले सुख-दुःख समजते,
जी आपल्या चेहऱ्यावरूनच आपल्या मनात काय चाललंय याचा अंदाज बांधते,
माहेरी आलेल्या लेकीचे खूप लाड पुरवते.
आपलं माहेर म्हणजे आई हे समीकरण ठरलेलेच असते तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
आपण आई झाल्यावरच आपल्याला खरं आईचे प्रेम अन् काळजी समजते.
अन् सासरी आल्यावरच तिची किंमत कळते. आई ही आई असते,
कितीही लांब असली तरी फोनवर तुमच्या एका हॅलो वरून तुमचा आनंद अन् दुःख दोन्ही समजते...