लोकसंख्येचा विस्फोट
लोकसंख्येचा विस्फोट
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेला, संतांचा वारसा असलेला कृषिप्रधान देश आहे.
भारताला सर्वात मोठा धोका लोकसंख्येचा आहे. लोकसंख्येवर नियंत्रण नसल्यास विषमता निर्माण होईल.
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या गरजा पूर्ण होण्यासाठी संघर्ष होईल. वाढती महागाई, अराजकता ह्याला जनतेला तोंड द्यावे लागेल. लोकसंख्या देश विकासाला फार मोठा अडथळा आहे. बेरोजगारीला आमंत्रण आहे.आर्थिक विषमता निर्माण होईल.जमिनीचे क्षेत्र कमी व लोकसंख्येचा भार जास्त अशी परिस्थिती निर्माण होईल.मोकळी हवा, सूर्यप्रकाश मिळने अवघड होईल.निसर्गाचा समतोल बिघडेल. प्रदूषण, अस्वछ्ता वाढेल. आदिवासी समाजात लोकजागृती करावी लागेल.शिक्षणासाठी त्याना मोफत पुस्तके, वह्या, आर्थिक मदत करुन शिक्षणाच्या शंभर टक्के प्रवाहात आणावा लागेल.वाढत्या लोकसंख्येमुळे मागास भागात व देशात कुपोषण वाढत राहील. प्रत्येक क्षेत्रात मानवी साधने अपूरे पड़तील.म्हणून केंद्रशासनाने ठोस उपाय योजावेत. त्यासाठी शिक्षण सर्वसामान्य लोकांना मिळने काळाची गरज आहे. ते महाग करू नये. भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला ्दर्जेदार शिक्षण मोफत मिळावे.शिक्षणातील गळती थांबली पाहिजे.लोकसंख्या शिक्षण काळाची गरज आहे.
पंचवार्षिक नियोजनात लोकसंख्येवर आधारीत विकासाची दिशा ठरवावी.लोकसंख्येवर सक्तीचे नियंत्रण असावे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधिनी एकत्र येऊन कायदा मंजूर करावा. अन्यथा देशात गरीबीचे प्रमाण वाढत राहील. पाणी, वीज, अन्न, आरोग्य,निवारा, शिक्षण ह्या समस्या वाढत राहतील.जीवनात अनेक संकटाना सामोरे जावे लागेल.
लोकांचे जीवनमान कोलमडेल.चोरी, दरोडे, भ्रष्टाचार यांचे प्रमाण वाढेल. गुन्हेगारी वाढेल.निकृष्ट जीवन जगावे लागेल.लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम यावर चर्चासत्र आयोजित करावे. प्रसारमाध्यमाद्वारे लोकांपर्यंत माहिती पोहचवली पाहिजे. त्यावर आधारीत मालिका,लघु चित्रपट दाखविले पाहिजे.