Shital Thombare

Others

2  

Shital Thombare

Others

लिव्ह इन रिलेशन

लिव्ह इन रिलेशन

2 mins
367


आपल्या देशात लग्नसंस्काराला अत्यंत मानाचं स्थान आहे.या संस्काराने जोडलं गेलेलं पती- पत्नीचं नातं पवित्र मानलं जातं.मग ते पारंपारिक कांदेपोह्याचा कार्यक्रम करून केलेलं लग्न असो की,एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर घरच्यांचा विरोध पत्करून केलेलं लग्न असो.पती- पत्नीचं नात म्हटलं की त्यात प्रेम,जिव्हाळा,विश्वास महत्वाचा.पण आजच्या आधुनिकतेच्या जाळ्यात गुरफटलेल्या पिढीला या नात्यांमध्ये काही अडचणी नक्कीच येतात.पण एकमेकांवरच्या प्रेमापोटी काही जोडपी या अडचणींवर मात करतात तर काही सरळ विभक्त होतात. आपल्या जीवनसाथीला समजून घेण्यासाठी,त्याला पडताळण्यासाठी , संपूर्ण आयुष्य याच्याबरोबर घालवू शकतो का? हे जाणून घेण्यासाठी पाश्चात्य संस्कृतित लिव्ह इन रिलेशनचं फॅड फोफावत चाललयं. त्याचाच पायंडा कुठेतरी आपल्या देशात डोकं वर काढू लागलाय. एकमेकांच्या प्रेमात पडायचं .आपलं कितपत पटतयं हे पाहण्यासाठी एकत्र रहायचं. नाही पटलं तर वेगळ व्हायचं. (दुसरा योग्य जोडीदार शोधण्यासाठी पुन्हा तयार) बरं या कालावधीत जे नातं तयार होतं त्याला हे नाव देणार 'लिव्ह इन रिलेशन'.


'प्रेम एकदाच होतं' हे काही यांच्यावर लागू होत नाही. ते आयुष्यभर आपलं खर प्रेम शोधतच राहतात.काही जण तर चार- चार पाच- पाच वर्ष एकत्र राहतात आणि लग्नाचा विषय निघाला की तुझं माझं पटेना म्हणतं वेगळं होतात. त्या कालावधीत त्यांनी त्यांच्या नात्याच्या मर्यादा कितपत सांभाळलेल्या असतात हे त्यांनाच ठाऊक.मग अशात पुन्हा नव्याने एखाद्याशी नातं जोडणं कितपत योग्य. 'लिव्ह इन रिलेशन' मध्ये राहायचं की नाही हा ज्याचा त्याचा जरी वैयक्तिक प्रश्न असला तरी आपण आपल्या पुढच्या पिढीला कोणते संस्कार देणारं आहोत.येणारी पिढी घडवायची की बिघडवायची हे आजच्या पिढीच्या हातातं असताना कोणताही अविचारी विचार नको. मॉडर्न जगात स्वत:ला अॅडजस्ट करण्याच्या नादात आपण स्वत:ला इतकंही बदलायला नको की काही वर्षांनी आपल्या वागण्याचा आपल्यालाच पश्चाताप व्हावा. आपली आजी- आजोबा, आई-वडिल यांनी नाही का त्यांची लग्नं टिकवली. उलट उत्तमपणे निभावली. त्यांना नाही कधी गरज भासली लिव्ह इन मध्ये राहण्याची. मग आत्ताच समाजाला लिव्ह इनची गरज का भासावी? प्रेम द्या, प्रेम घ्या. एकमेकांना समजून घेऊन हळुवार पती-पत्नीचं नातं फुलवा. मग कसले हेवेदावे, कसले रुगवेफुगवे. आधुनिकतेला स्वीकारणं गरजेचं आहे पण अशी आधुनिकता जी आपल्या संस्कारांवर, संस्कृतीवर घाला घालते ती आधुनिकता काय कामाची? परिस्थितीनुसार असा निर्णय घ्यावा लागतो असं म्हणणारे ही आहेत. पण उगाच पाश्चात्यांच्या संस्कृतीला वाहून घेणं कितपत शहाणपणाचं ठरेल? पती-पत्नीच नातं असं आहे की एकमेकांना समजून घ्यायला कधी दोन क्षणही पुरेसे होतात तर कधी कधी संपूर्ण आयुष्यही कमी पडतं मग काही महिने एकत्र राहिल्याने कसं ठरवता येईल की हाच आहे आयुष्यभराचा साथी.


काय स्वीकारायचं काय नाही स्वीकारायचं हा ज्याच्या त्याचा प्रश्न असला तरी तेच स्वीकारा जे आपल्या संस्कृतीचं हनन करनार नाही. जे संस्कार रुपाने तुम्ही तुमच्या पिढीला देऊ शकाल...


Rate this content
Log in