लाडाची लेक ग...
लाडाची लेक ग...
रमा आणि वैदही दोघीही मार्केटमध्ये खरेदीला गेल्या.... मस्त स्कूटी वरून...... वैदही तर भन्नाट स्कूटी चालवायची... दोघींनी शॉपिंग केली आणि मग हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी खाऊन पिऊन घरी निघाल्या, अर्धा ते एक तासात पोहोचल्या... घरी आल्यावर वैदहीने बॅग मधले कपडे बाहेर काढत,
“ आई तू तुझे सूट घालून दाखव मला... मस्त दिसशील आणि ही साडी तर भारीच, आई.... बाबांना पण आवडेल हा कलर आणि समीर तर डोळे फाडून उभा राहील .....”
वैदहीची बडबड सुरू होती, रमा किचनमधून पाणी पिऊन आली आणि वैद्यु साठी एक ग्लास पाणी आणलं
“वैदही थांब जरा, हे घे, पाणी पी जरा...
वैदहीनी ग्लास घेतला आणि उभ्या उभ्या प्यायला लागली,
“अग,हळूहळू जरा बसून पी....
माझ्या कपड्याच्या मागे लागलीस आणि तुझे कपडे.....
“ आई फिरायला कोण चाललंय ?..
“मी....”
“ हो ना... मग तुझे कपडे इम्पोरटंट...नाही का....
वैदही रमाच्या गळ्यात हात घालून,
“ आय लव यू आई..”
“ अगं वेडाबाई, तू...ना... सगळ्यांना लाडावून ठेवलंस....ह... वैद्यु.....”
“ नाही ह.. आई असं काही नाहीये”
वैदही आणि रमाच नातं खूप वेगळं होतं, कोणी बघेल तर विचारात पडेल इतकं सुंदर बॉंडिंग होत त्यांच....
दोघींही आपापल्या बॅग्स घेऊन रूममध्ये गेल्या... आणि थोडावेळ आराम केला... दारावरची बेल वाजली,रमा नी दार उघडल “अरे, समीर...आलास, बस पाणी आणते....
“ वैद्यु कुठे आहे?..”
“ झोपली आहे ती...”
“ आता या वेळी...?( घडी कडे बघून)....
“ अरे आम्ही आज शॉपिंग ला गेलो होतो, दमली असेल... रूममध्येच आहे ती...”
“ पण या वेळी कोणी झोपत का?
“ समीर झोपली नाही आहे मी....वैदही रूम मधूनच बोलली, तू बस मी चहा आणते.....”
“ वैदू तू झोप मी चहा केला......
“ नाही नाही आता दिवेलावणीची वेळ झाली, असं झोपलेल बरं दिसत नाही...”
वैदेहीने उठून दिवा लावला, स्वयंपाक करून ती बाल्कनीत जाऊन बसली थोड्यावेळाने समीर तिथे आला
“ काय गं, काय काय शॉपिंग केली आज...”
“ आईचे कपडे, आईसाठी छान सूट घेतलेत.... आई-बाबा खूप वर्षानंतर फिरायला जात आहेत ना आय एम सो हॅपी मी त्यांची संपूर्ण तयारी करून देईल त्यांची ही ट्रिप त्यांच्यासाठी मेमोरेबल ठरेल, उद्या मी आईला पार्लरमध्ये घेऊन जाणार आहे....”
समीर डोक्यावर हात ठेवत,
“ अरे बापरे...…
वैद्यु त्याच्या खांद्यावर हात ठेवत ,
“गप्प बस आणि चल जेवायला..
दुसर्या दिवशी दुपारी वैदही रमाला घेऊन पार्लर मध्ये गेली, ती पार्लर वाली काही वैदही ची ओळखीची नव्हती त्यामुळे तिने जस्ट हाय-हॅलो केल आणि तिला सांगितला फेशिअल, आयब्रो आणि हेअर कट ...एवढं सगळं करायचं
“ वैदयु इतकं सगळं......
वैदही आई कडे बघून,
“आई......
“ओके...ओके...
फेशिअल, हेअर कट करता करता दोघींच्या मस्त गप्पा सुरू होत्या त्या दोघींकडे बघून पार्लर मध्ये काम करणारी लेडी,
“ तुम्ही दोघी नक्की मायलेकी आहात ना?”
रमा आणि वैदही दोघीही एकमेकीकडून बघून हसल्या..... पार्लरमध्ये 3 ते 4 तास घालवल्यानंतर रमा आता थकली, पन्नासाव्या वयात एवढं पार्लरचा काम कुठे झेलतं....
आठ दिवसांनी रमा आणि धीरज दोघांची थायलंडची विमानाची तिकीट बुक केलेली होती, रमा पहिल्यांदाच एवढ्या दूर आणि जास्त दिवसांसाठी जाणार होती, वैद्हीनी रमा साठी शॉपिंग पासून ते पथ्यपाणी फराळ बनवण्या पर्यंत सगळं करून ठेवलं.
जाण्याचा दिवस आला, वैदेहीने सकाळी उठून सर्व तयारी केली... सायंकाळी 5 ची फ्लाईट होती, 3 ला च सगळे एअरपोर्टला पोहोचले, एक तास गप्पा झाल्या चेकिंग ची वेळ झाली,
वैदही: आई बाबा एकमेकांची काळजी घ्यायची, बॅग मध्ये मी सगळ्या मेडिसिन ठेवल्या आहेत त्या वेळच्या वेळी घ्यायच्या, वैदहीच्या सूचना सुरू होत्या... रमाला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं, रमा थोडी हसली आणि मग वैदही जवळ जाऊन रडली देखील....
“ आई, काय झालं ....?
“मला असं वाटतं की मी फिरायला नाही चालले मी माझ्या सासरी चालली आहे बघ ना मला रडू पण येतंय ....”
“आई रडू नको नाहीतर मला रडायला येईल”
साईडला एक जोडपं बसलेलं होतं, त्यांचं यांच्याकडे लक्ष होतं... या दोघींच्या गप्पा ऐकून तिने न रहावता विचारलं,
“ तुमच्या दोघींच बॉंडिंग किती छान आहे ना... नक्की तुमचं नातं काय?
रमा बोलली,
“ आई – लेकीच ’’
तर तितक्यात पटकन वैद्यही
“ सासु सुनेच”
दोघी एकमेकींकडे बघून खळखळून हसल्या....
