कृष्णाच्या धाडसाची कथा.
कृष्णाच्या धाडसाची कथा.
कृष्णा मुख्यमंत्र्यांची मुलगी तिला आधी पणा पासुनच समाजसेवेची आवड होती.म्हणुन तिने डॉक्टर होऊन आपले आयुष्य गरीब आणि गरजू लोकांची मोफत सेवा करण्यासाठी घालवले होते.
एक खेडे गाव जिथले लोक फक्त मांत्रिकावर विश्वास ठेवत डॉक्टरांना त्या गावात प्रवेश करू देत नसत. एक मोठ्या रोगाची साथ आली पण तरीही लोकं मांत्रिकाची राख आणुन ती लावत असत यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला.
गावातील ग्रामस्थांना नजुमानता प्रसंगी त्यांचा मार खाऊन कृष्णा ने त्या गावात आपला कॅम्प लावून तेथील रूगणांवर औषधोपचार करण्याचे धाडस केले.
आणि सर्व रुग्णांना बरे केले त्याबरोबरच गावकऱ्यांची अंधश्रद्धा ही दुर करुन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
