kanchan chabukswar

Others

4.0  

kanchan chabukswar

Others

कन्यारत्न

कन्यारत्न

8 mins
338


विचित्र अवस्थेत आरशापुढे उभे राहून स्वतःला कुरवाळणारया दिव्या कडे बघून आजी एकदम मागे सरकली. आजीकडे लक्षच नव्हतं दिव्याचं. ती स्वतःच्या शरीराला गोंजारणे मध्ये मग्न होती. लग्नाचं वय उलटून गेलेली दिव्या पाहून आजीचा गळा दाटून आला. दीपिकाने जोरात हाक मारल्यावर ती आजीने मागे वळून बघितले, दीपिका दाराच्या बाहेर उभा राहून दार ठोठावत होती. बहुतेक किल्ली न्यायला विसरली. दरवाजाचा जोरात येणारा आवाज ऐकून दिव्या भानावर आली, तिने पटपट कपडे केले आणि केस सावरत ती दरवाजाकडे धावली. नाहीतरी आजीला आपल्या तिन्ही नाती आवडतच नव्हत्या, पण आता त्यांच्यावर तीच अवलंबून राहायची वेळ आली होती.


केशवचा संसार चांगला हसता फूलता होता, दिव्या दीपिका राणी नंतर राहुल झाला होता. तीन मुली होईपर्यंत आजी आजोबा गप्प होते, मात्र चौथ्या खेपेला त्यांनी घरामध्ये सांगितले होते, संपत्तीला वारस हवा, आता मुलगाच हवा, दिव्या दीपिकाची आई आणि वडील फार टेन्शनमध्ये होते, पण देवाच्या दयाने गोड गोबरा राहुल जन्माला आला आणि लबडे पाटलांच्या घराला नवचैतन्य प्राप्त झाले. मुलांच्या लाडाकोडात दिवस भराभर निघून जाऊ लागले.


राहुलला केशवच्या मोटरसायकल वर बसून चक्कर मारायला फार आवडे, मुलींना पण डॅडी च्या मोटरसायकल वर बसायला फार आवडे, प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या बहिणीबरोबर राहुलचा मात्र कायमच नंबर असे. पाच वर्षाचा राहुल खिदळत हसत, मोटरसायकलच्या पेट्रोलच्या टाकीवर बसला होता, डॅडी च्या पाठीमागे त्यांच्या पोटाला घट्ट धरून दीपिका बसली होती, आणि तो काळा दिवस उजाडला. अदालत रोड वरून क्रॉसिंग वरती काय झाले केशवला कळलेच नाही, धाडकन मागच्या बाजूने ट्रक घेऊन आदळला, दीपिका त्याला घट्ट धरून होती, म्हणून दोघेही मोटरसायकलवर उडवून बाजूला फेकले गेले, पण राहुल मात्र हँडलला धरून बसला होता, तो मोटर सायकल बरोबर फरपटत पुढे गेला. डॉक्टरी उपाय यांचा काहीच फायदा झाला नाही, केशव सुन्न झाला, केशव ची बायको निर्मला, तिच्या तोंडातून कोरडे हुंदके, आणि आकांत बाहेर पडू लागला, कोणाची चूक, कोणाला शिक्षा?


दीपिकाला तर असे झाले की राहुलच्या एवजी ती मेली असती तर आई-वडिलांना एवढे दुःख झाले नसते, पण तिचा आयुष्याचा दोर भक्कम होता म्हणून ती वाचली, म्हणजे तिला खरचटणे यापलीकडे काहीही झालं नाही. येणाऱ्या नातेवाईकांची कुजबुज ऐकवेना, आजी-आजोबांनी तिला धपाटे घालुन पण म्हंटले," तु का जगलीस ग? भावाचा काळ झालीस! म्हणत होते ना मी, तिच्या पाठीवर तीळ आहे, तिला जन्मताच मारायला पाहिजे होती." दिव्या आणि राणी ने दीपिकाला घट्ट धरले आणि त्या तिघी बहिणी गच्चीवर जाऊन बसल्या. दिपीका थरथरत होती, तिला माहितीच नव्हतं असं काही होईल म्हणून. बारा वर्षाच्या दिव्याने दीपिकाला पोटाशी धरले, दहा वर्षाच्या राणीने तिचे डोळे पुसून तिला म्हटले," तुझी काही चूक नाही ग, आणि मोटर सायकल थोडी तू चालवत होतीस? राहुल म्हणाला असता मी मागे बसतो तर तू पुढे बसली असतेस नाही का, पण त्याचा तर कायम हट्ट असायचा, पुढे बसायचं म्हणून."


तिघी बहिणी रात्रभर गच्चीवरच बसल्या, कोणाला त्यांची काहीच फिकीर नव्हती, आई आपल्या दुःखामध्ये, आणि केशव , राहुलच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत, अपघाताची केस होती, पोलीस केस झाली होती, सगळे निस्त रे पर्यंत सकाळ झाली, रात्रीच्या थंडीत तिघी बहिणी एकमेकींच्या उबेने गच्चीवरची झोपल्या.


बातमी समजल्यावर ती पहाटेच्या सुमारास मामा मामी आणि नाना नानी आले, आल्या आल्या निर्मला ला भेटल्यावर मामाने मुलींची चौकशी केली. घरात शोधल्यावर मुली मिळाल्या नाहीत, म्हणून मामा गच्चीवर आला, एकमेकींना घट्ट बिलगून झोपलेल्या तिघी बहिणी बघून मामाच्या पोटात कालवाकालव झाली, प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात फिरवून मामाने त्यांना खाली आणले, निर्मले ला बाजूला घेऊन मामा किंचित रागाने म्हणाला," जे झालं ते झालं, तुझ्या पदरात ज्या तीन हिरकण्या आहेत त्यांची काळजी घे, त्यांना वाऱ्यावर सोडू नकोस. घराण्याचा वंशज काय फक्त मुलगा असतो? आणि तुला जमत नसेल तर मी तिघींनाही माझ्या घरी घेऊन जातो."


मामा मामीला मूलबाळ नव्हतं, त्याच वेळेला त्याने राणीला दत्तक म्हणून घेतलं आणि आपल्या सोबत घेऊन गेले. वर्षामागून वर्षे गेली, आजोबा देवाघरी गेले, आजीने घालून पाडून बोलून बोलून निर्मले ला देखील अर्धमेले करून टाकले होते, निर्मला जास्त टिकलीच नाही, बाथरूममध्ये पडण्याचा निमित्त होऊन निर्मला पण देवा घरी निघून गेली. दिव्या, राणी, एकामागोमाग एक, ग्रॅज्युएट झाल्या, दिव्या एका आयटी कंपनीमध्ये नोकरीला लागली.

दिपीकाचा सर्व खर्च आता तीच करत होती. मामाने राणीसाठी उत्तम स्थळ आणले, मस्तपैकी लग्न करून राणी परदेशी निघून गेली. वास्तविक दिव्या सगळ्यात मोठी, पण तिचा लग्नाचा विषय घरामध्ये कोणीही काढत नव्हत.


राणीचे हनिमूनचे फोटो बघून, दिव्याच्या मनात घालमेल होत होती. आजीच्या मनात पहिल्यापासूनच दिव्या दीपिका बद्दल अतिशय दुस्वास होता. त्यातून निर्मलेच्या निधनानंतर घरात काम करायला पण कोणीतरी हवे होते, दिव्या घरातला पण सगळं सांभाळून नोकरी करत होती. दिपीका अजुन लहान होती, तिचं शिक्षण चालू होतं, एवढ्यात हातातून दिव्याला जाऊ देणं केशव आणि आजीच्या फायद्याचं नव्हतं. त्यामुळे सोयीस्करपणे दिव्याच्या लग्नाचा विषय दोघेहीजण टाळत होते.


वास्तविक कंपनी मधला अर्जुन दिव्याला अतिशय पसंत करत होता, दिव्या पण त्याला पसंत करत होती, पण अर्जुनच्या कडे जाण्यासाठी देखील केशव तयार नव्हता. आणि दिव्यामध्ये एवढी हिंमत नव्हती किती पळून जाऊन लग्न करेल. त्यातून अर्जुनच्या आई-वडिलांना रीतसर थाटामाटात लग्न करून हवे होते. इकडे आड तिकडे विहीर. प्रेमाच्या नादात दिव्या बरीच पुढे गेली होती त्यामुळे आता दुसरा जोडीदार निवडणे देखील तिला शक्य नव्हते.

एके दिवशी निर्मले ची म्हातारी काकू आपल्या नातींना भेटण्यासाठी म्हणून केशव च्या घरी आली होती, आपल्या नातवासाठी म्हणून तिने दिपीका ला मागणी घातली. उंच सुरेख स्मार्ट दिपीका सगळ्यांनाच आवडत होती.


पण त्याच रात्री केशवला अर्धांगवायूचा झटका आला आणि तो लोळागोळा होऊन अंथरुणावर ती पडला. केशव अजूनही ऑफिस मध्ये काम करत होता, त्याच्यामुळे वैद्यकीय तपासणी आणि त्याचा खर्च केशव चा ऑफिसचा उचलत होतं, तरीपण लोळागोळा झालेल्या माणसाची सेवा करायला आता घरात कोणीतरी हवं होतं. परत दिव्याचा लग्न लांबणीवर पडलं. करता करता एक वर्ष झालं, केशव च्या तब्येती मध्ये काही सुधारणा नव्हती, ऑफिसमध्ये आता तो रिटायर्ड झाला म्हणून जाहीर करण्यात आलं आणि ऑफिसमधले लोक त्याचा पीएफ आणि पेन्शनचे कागद घेऊन घरी आले. सगळे कागदांवर ती केशवचा अंगठा उमटवून ते निघून गेले. जेमतेम वीस लाख रुपये पीएफ आणि पेन्शन, गावी जी काही थोडीफार शेती होती ती तर केव्हाच खंडाने दिली होती, गावाकडचे लोक देखील लांडीलबाडी ने लबडे पाटील यांच्या घरी फक्त एक- एकच पोते धान्य पाठवीत होते, आतापर्यंत केशव गावी जाऊन जरा तरी काम करू शकत होता आता तर ते पण त्याला शक्य नव्हता.


अचानक घरामध्ये गरिबीच सावट काळोख्या सावलीसारखा दाटून आलं. दीपिका पण आता ग्रॅज्युएट झाली होती, आधी झालेल्या कुटुंबातील कलहामुळे तिलादेखील अIजी बद्दल अजिबातच प्रेम नव्हतं, पण, निराधार पांगळे वडील, मोठी बहीण, आणि एक म्हातारी आजी अशा कुटुंबामुळे तिला कोणी मित्र देखील नव्हते. पण काहीही झालं तरी दोघेही बहिणींचं केशव वरती अतिशय प्रेम होतं, डॅडी डॅडी करत दोघीजणी केशव ची मनापासून सेवा करत, केशव देखील कसंनुसं हसून, हात वर करून दोघी मुलींना कायम आशीर्वाद देत होता. केशवला नियमित प्रमाणे डॉक्टर कडे घेऊन जाणे, त्याचे औषध उपचार, त्याच्या बेड सोसला मलम लावणे, त्याचे सगळे विधी अंथरुणावर होत असल्यामुळे त्याचं शरीर कायम स्वच्छ ठेवणे ही सगळी कामं दीपिका आणि दिव्या करत होत्या.


लहानपणी दत्तक गेल्यामुळे राणीला आता केशव आणि आजी बद्दल काहीही माया वाटत नव्हती, पण तरी पण तिला दिव्या आणि दीपिका बद्दल फार ओढ होती. राणीचा संसार बहरत चालला होता, आता ती दोन मुलांची आई होती. एक दिवशी अचानक डोकं दुखतंय म्हणून दीपिका घरी आली होती, तर तिला घरातून केशवचे सॉलिसिटर मित्र बाहेर पडताना दिसले. घाबरून जाऊन ती केशवच्या खोलीकडे धावली, बाजूला आजी बसली होती आणि रडवेली होऊन दीपिका.

"डॅडींनी मृत्युपत्र केलं ग, त्यांना आता काही भरोसा वाटत नाही." दीपिका म्हणाली.

"डॅडी, मृत्युपत्राची काय गरज आहे, आम्ही दोघे आहोत ना तुमची सेवा करायला आणि तुम्हाला कधीही एकटे पडू देणार नाही काहीही झालं तरी." डोळ्यात पाणी आणून दिव्या म्हणाली.


केशव काहीच न बोलता डोळे मिटून पडून राहीला. केशव ने केलेल्या मृत्युपत्र नंतर जणुकाही आजीचे डोळे उघडले. आपल्या नाती करत असलेली सेवा त्यांची होणारी कुचंबणा, त्यांच्या आयुष्याचा होणारा विध्वंस आता तिला स्वच्छ दिसू लागला. संध्याकाळी क्लासला जाते म्हणून जाणारी दीपिका नक्की कुठे जात असेल याची आता तिला काळजी वाटू लागली. दीपिकाच्या फोन मध्ये असणारी मुलांचे फोटो, आणि डेटिंग ची ॲप यामुळे आजीची काळजी आता वाढू लागली. दिव्या आणि दीपिका बोलताना आजीने ऐकलं होतं," अर्जुन काही आता माझ्यासाठी थांबणार नाही, जरी आमचं प्रेम असलं तरी बाकीच्या गोष्टी काहीच अनुकूल नाहीत, मी आपल्या पांगळ्या झालेल्या डॅडी न सोडून जाऊ शकत नाही" दिव्या दिपीकाला सांगत होती. दोघींचा स्वर अश्रूंनी भिजलेला होता.


"आपल्या घरची परिस्थिती बघून कोणीही चांगला मुलगा माझ्याशी दोस्ती करत नाही. दोस्ती साठी पुढे होणारे अतिशय घाणेरडे मुले आहेत, आणि त्यांना वेगळेच काही माझ्याकडून पाहिजे आहे." हुंदके देत दीपिका दिव्याला सांगत होती.


हॉलमधल्या अंधारामध्ये दोघीजणी बसून आपल्या अश्रूंना वाट करून देत होत्या. आपल्या आईच्या फोटो पुढे त्यांनी छोटा दिवा लावून ठेवला होता त्याच्या प्रकाशामध्ये दोघींच्या गालावरील पडलेली अश्रू आजीला स्पष्ट दिसत होते, तसेच केशवला पण त्याच्या खोलीतून दोघीही मुलींचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता. होणारा हॉस्पिटलचा खर्च, केशव ची ट्रीटमेंट, घराचा खर्च, मुलींची वाढत चाललेली वय, घराच्या आजूबाजूला चक्कर घालणारे कावळ्यासारखी लोक, अंथरुणावर पडल्या पडल्या केशवला कळत होतं. त्यातून आता त्याला ऑक्सिजन वरती पण ठेवण्यात आलं होतं. अर्धांगवायूचा झटका आणि त्याचं एक फुफ्फुस कामातून गेलं होतं तर दुसरं अगदीच कमी अवस्थेत चालू होतं. अंगात खूपसलेल्या विविध नळया, यामध्ये जखडला गेलेला केशव, एक केविलवाणे दृश्‍य होतं घरामध्ये.


आज केशवचा वाढदिवस, दीपिकाने, सुंदर केक तयार केला होता, केशव ने खाणाखुणा कर सॉलिसिटर काकांना आणि अर्जुन च्या आई-वडिलांना बोलवण्यास होते, संध्याकाळी घरामध्ये रोषणाई करून हळुवारपणे केशवला व्हीलचेअरवरती बसून हॉलमध्ये आणण्यात आले, सॉलिसिटर काका, अर्जुन चे आई-वडील आणि अर्जुन, दिव्या, दीपिका, राणी आणि तिचे कुटुंब सर्वजण जमले होते. केक कापण्याच्या आधी, केशव ने हात जोडून अर्जुनच्या आई-वडिलांना दिव्याला पदरात घेण्याची विनंती केली, अर्जुन च्या आईवडिलांनी आनंदाने होकार दिला, अर्जुन आणि दिव्याने एकमेकांना पेढा भरवला, आणि सॉलिसिटर काकांनी आणलेल्या अंगठ्या एकमेकांच्या हातात चढवल्या. तेवढ्यात निर्मले ची काकू देखील आपल्या नातवा सकट हजर झाली, तिने परत आपल्या नातवासाठी दीपिका चा हात मागितला. केशवने आनंदाने होकार दिला. सॉलिसिटर काकांनी अजून दोन अंगठ्या बाहेर काढल्या आणि दीपीकेचा देखील साखरपुडा पार पडला. आता सगळ्यांनी मस्तपैकी केक कापून आनंदोत्सव साजरा केला, बऱ्याच वर्षांनी फोटोतल्या निर्मल, तिच्या चेहऱ्यावर कुठलंतरी स्वर्गीय हास्य दाटून आलं होतं.


आजीने आग्रह करून दोन आठवड्यातच मुहूर्त पकडला, आणि दोन्ही नाती, दिव्या आणि दीपिका यांची लग्न रजिस्ट्रारच्या कार्यालयामध्ये लावून दिली, सॉलिसिटर काकांनी गावाकडची शेती विकून आलेले पैसे तिघी मुलींमध्ये समसमान वाटून दिले, केशवने राहता बंगला दिव्या च्या नावावर केला होता, एवढे वर्ष केलेली सेवा आणि तिने दाखवलेलं निर्व्याज्य प्रेम याची परतफेड तर केशवला कधी करता आली नाही पण मुलींच्या मायेमुळे त्यांनी हा परखड निर्णय घेतला होता. मामाकडची सगळी संपत्ती राणीला मिळाल्यामुळे तिने आपल्या वाटचे पैसे दिव्या आणि दीपिकाला देण्याचे ठरवले, तर दीपिकाने आपल्या वाटेच्या पैशातला अर्धा भाग दिव्या च्या नावावर केला. फक्त तिघी बहिणीने आईच्या दागिन्यांचे समसमान वाटप केले, आपल्या आईचा त्याग आणि आठवण म्हणून.


दिव्या आता अर्जुन बरोबर केशवच्या घरातच राहत आहे, आजीचे वागणे पूर्ण बदलले आहे. दीपिका तिच्या अभिषेकबरोबर त्याच्या घरी सुखाने राहत आहे.


Rate this content
Log in