कन्यारत्न
कन्यारत्न


पत्नी:अहो, दररोज हे काय चाललय?
पती:हे म्हणजे काय?मी काय गुन्हा केलाय का?
पत्नी:दररोज दारू पिऊन येतात, उगाचच भांडण करता, तुम्ही तर चांगले शिकलात मग चांगल्या संसारात ही पीडा कशाला?
पती:हे बघ राधा, आपल्या लग्नाला किती वर्षे झाली?
पत्नी:वीस वर्षे.
पती:तूच सांग आपल्याला सारख्या पोरीच होतात. आपल्याला वंशाला मुलगा हवा की नको?
पत्नी:मग मुलगी वंशाचा दिवा नाही का?पूर्वीचे जुने विचार सोडा. परिस्थिती आता बदलत चालली आहे. आता मुलगी ही वंशाचा दिवा आहे.आपणच शिकलो की नाही मुलगा, मुलगी समान आहे म्हणून. मग भेद का करायचा? मुली आता चंद्रावर जाऊन आल्या. मुलांप्रमाने त्याही पुढे गेल्या आहेत. काही मुली तर आईवडिलांना म्हातारपणाच्या आधार झाल्या आहेत. आईवडिलांची सेवा त्याच करत आहे.
पती:पण आपले भाऊबंद, नातेवाईक आपल्याला अप्रत्यक्ष टोचून बोलतात. त्यांची तोंडे कोण बंद करणार?म्हणून मी टेंशन मधे दारु पितो.
पत्नी:अहो ते अशिक्षित आहे.त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. मुलगी किंवा मुलगी व्हावी हे आपण ठररवायचे नाही. निसर्गाने जे दिले ते आपण स्वीकारायचे.
पती:मग आपण थोडे मुलासाठी प्रयत्न करू या.
पत्नी:ते कसे काय?
पती:हे बघ,आपण डॉक्टरकडे जाऊ या आणि डॉक्टराना सांगूया की आम्हाला मुलगाच पाहिजे.
पत्नी:कशासाठी हा मुर्खपणा?मुलासाठी तुम्ही निष्पाप जीवांची हत्या करणार आहात का ? त्यातून जोपर्यंत मुलाचा गर्भ नसेल तोपर्यंत हे असे कृत्य करणार आहात का? देवसुद्धा आपल्या सात पिढ्यांना माफ करणार नाही आणि जे काय पाप आपण करणार आहोत त्याचे परिणाम लगेच भोगावे लागतील.
पती: तरीपण एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊया.
(डॉक्टरकडे जातात)
डॉक्टर मला मुलगाच हवाय.
डॉक्टर:तुमच्या दोघांची संमती असेल तर काही हरकत नाही. करू या आपण प्रयत्न. पण हे करताना फार गुप्तता पाळावी लागेल. कारण गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे.त्याला खर्चही जास्त लागेल. असुद्याना मुलगी काय फरक पडणार आहे?मलाही एकच मुलगी आहे.आम्ही सर्वजण आनंदी आहोत. उगाच नसत्या भानगडीत कशाला पडता?
पती:ठीक आहे डॉक्टर येतो आम्ही.
डॉक्टर:या.
नंतर घरी आल्यावर पतीच्या विचारात बदल होतो व ते डॉक्टरांचा आदर्श घेतात.
पती:राधा, तू म्हणते तेच खरे आहे. माझ्या मुलीच मला मुलासमान आहे. आजपर्यंत आपले खूप आर्थिक नुकसान झाले. संसारात दहा वर्षे आपण मागे राहिलो. तुला मी खूप मानसिक त्रास दिला.
पत्नी:झाले गेले विसरा आणि मुलीलाच मुलगा माना.
पती:(कृष्णा) खरोखर मुलगी आई, बहिण, मुलासारखे कर्तव्य जपते.मला जे निसर्गाने दिले तेच स्वीकारणार. मी त्याच्या विरोधात नाही जाणार. छोटे कुटुंब सुखी कुटुंब.