STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Others

3  

शब्दसखी सुनिता

Others

खरे प्रकाशपर्व

खरे प्रकाशपर्व

4 mins
181

      दिवाळी जवळ आली म्हणून सुमितची आई आणि आजी फराळ बनवत होते, सुमित ही घरातील सजावटीच बघत होता. तो आणि त्याची लहान बहिण अंजली त्याला मदत करत होती. घरात फराळाचा खमंग वास आला तसा तो अंजलीला म्हणाला....

आ हा ऽऽ आता अस वाटतय खर्‍या अर्थाने दिवाळी आली.

तशी अंजली पळत निघाली कीचनमध्ये, सुमितला एकट्यालाच तयारी करावी लागली. सगळी तयारी सूरू होती. त्याचे बाबा संध्याकाळी लवकर घरी आले नि त्यादिवशी आईबाबांसोबत सुमित आणि अंजली दोघेही बहीण - भाऊ शाॅपिंग साठी गेले. त्यांनी खुप खरेदी केली. सुमितने त्यांच्या आजी आजोबांसाठीही खरेदी केली होती. त्यांना गर्दीत जायला नको वाटतय म्हणुन, सुमित लहान होता पण खुप हुशार होता. शाॅपिंग झाल्यावर दोघेही त्यांच्या बाबांच्या गाडीतुन येते होते.

दोघेही बहीण भाऊ आपण दिवाळीत कशी धम्माल करायची, हे करायच, ते करायच याबद्दल भरभरून बोलत होते. त्या दोघांना अस बोलताना बघून आईबाबाही सुखावले.

गाडी त्यांच्या घराच्या रस्त्याने निघाली, त्यांच्या घराजवळ आल्यावर बाबांनी दुकानातुन काहितरी थोड सामान घ्यायच म्हणून गाडी थांबवली. तिथे जवळच असलेल्या एका दृश्याकडे तो बघत होता. एक छोटीशी चार बांबु रोवून उभी केलेली झोपडी, तिथे एक लहान मुलगी खेळत तर एक मुलगा आपल्या आईकडे हट्ट

करत होता. ते शब्द, आवाज सुमितला ऐकू येत होते. " ये आई, उद्या दिवाळी आहे ना मलाही नवीन कपडे पाहिजे "


" तुला मोठा असुन कळत कस नाय,चार दिस झाले. म्या तुला तेच समजावते. आर, आपल्याला ईथ येऊन लय दिसही नाही झाले. अजुन चार दिस काम केलेले

पैसेही नाही मिळाले. ते मिळू दे ना राजा...तुला पहीले नव कपडे घेते म्हटली ना... "


ती त्या मुलाची आई त्याच्या तोंडावरून हात फिरवत त्या रडणार्‍या मुलाला शांत करत होती. सुमितही लहानच होता. तो पाचवीत इयत्तेत होता. त्याला ते सगळ

बघून खुप कसतरी झाल. आपल्याला तर आज सगळ मिळूनही आपण हट्ट करतो. तेवढ्यात बाबा आले. त्यांनी गाडी स्टार्ट केली, तसा सुमित भानावर आला.

तो थोडा शांत झाला. तस मघापासुन बडबड करणार्‍या सुमितला आईला विचारल... काय झाल सुमित... काही राहील का तुला घ्यायच ? का बर अस 

अचानक शांत झालास ? सुमितला काय बोलाव कळत नव्हत पण काय करायच ते त्याने ठरवल होत. अंजली मात्र खुप खुश होती. ती तिला घेतलेल्या वस्तु पाहण्यात रमली होती... त्यांच घर जवळ आल. सगळे उतरले. जेवण झाली. सुमितला आजी बाबांनी शाॅपिंगच काय काय आणल ? ते विचारल तो खुप आनंदाने सगळ सांगत होता. तेव्हा त्याला ते आठवले. त्याने सगळ त्याच्या आईबाबांना सांगितल.


      दुसर्‍या दिवशी दिवाळी होती. सुमित सकाळपासून आपल्या मित्रांसोबत नवीन कपडे घालुन खेळत होता. खुप आनंदात होता. घरचे सगळे खुप आनंदात 

होते. दिवाळी म्हणून त्यांच्या घरी पाहुणे आले होते. सुमितला तिकडे त्या मूलाला ड्रेस, फराळाचे पदार्थ द्यायला जायचे होते. नेमक्या त्याच वेळेला त्याचे बाबा आले

नव्हते. संध्याकाळची वेळ होती. सर्वत्र घराघरांत दिव्यांची आरास, पणत्या आणि आकाशकंदील उजेडात आसमंत उजळून निघाला होता. लहान मुले नवीन ड्रेस घालून इकडे तिकडे पळत होते. प्रत्येकजण आपला ड्रेस एकमेकांना दाखवत होते. सुमितचे बाबा आले. तेव्हा तेच सुमितला म्हणाले,

"चल बाळा, आपण त्या काल तु सांगीतलेल्या मुलाला ड्रेस देऊन येऊया... त्याला खुप आनंद झाला. त्याच्या आईने फराळाचे पदार्थ, मिठाई, आकाशकंदील आणि

पणत्या सगळ काही त्याच्या बाबांनी त्या कुटुंबासाठी घेतल होत... ते तिथे गेले. तेव्हा तो मुलगा दारात बसला होता शांत, यांना बघून तो आश्चर्यचकीत झाला. 

यांच्या हातातील वस्तुंकडे बघत होता. तेवढ्यात त्याची आई आली. तेव्हा सुमितचे बाबा म्हणाले... " हे घ्या आमच्याकडून तुम्हांला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा... "


त्या बाईच्या डोळ्यांत पाणी आल.

" दादा, का आणलत इतक सगळं, अहो आपली ओळख नाही तरी तुम्ही इतकं आमच्यासाठी आणलत..."


" आम्ही अलिकडेच या गावात आलो. काहीतरी काम मीळेन या आशेने पण अजुन काम नाही मिळाल."


" ताई , तुम्ही दादा म्हणालात ना, त्यातच सगळ आल. मी सकाळी जातानाही तुमच बोलण ऐकलय. " आणि हो आज दिवाळी आहे ना मी या दोघांसाठी ड्रेस आणलेत, हे घ्या बघा... कसे आहेत... मुले धावत आली त्याच्याकडे... ति मात्र दादाकडे बघत होती. मनात विचार करत होती. काही लोक किती चांगले असतात, दुसर्‍यांचा इतका विचार करतात. खरच हीच माणस देवापेक्षा कमी नाहीत. त्याने सगळ त्या ताईंना दिल. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, आणि हो तुमच्या कामाचीही सोय होईल आमच्या इथेच... तेव्हा तुम्ही नक्की या... त्याने त्यांच एक कार्ड दिल त्यावर ॲड्रेस होता. तिनेही आनंदाने घेतला. निराशेतुन तिला आशेचा किरण दिसला.


तिने पणत्या लावल्या. त्यांच्या झोपडीतील आणि जीवनातील अंधार नाहीसा होउन सगळ प्रकाशमय झाल होत. नवीन ड्रेस घातले. त्यांना गोडधोड खायला दिल. सुमितच्या बाबांनी त्याला सांगितल. " बेटा, दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि तेजाचा सण... हा सण सगळ्यांसाठी आनंद घेऊन येतो... तो आनंद दुसर्‍यांच्याही वाटेला यायला हवा ना... या दिवाळीत एक वेगळ करायच ठरवल होत... या दिवाळीत दोन घर उजळूया... एक त्यांच... एक आपल... आपल्यासोबत सर्वांचीच दिवाळी मिठाई प्रमाणे गोड करू या... शेअर करण्यातच खरा दिवाळीचा आनंद असतो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन