खोडकर चिनू
खोडकर चिनू


आमचा चिन्मय.... आम्ही सर्व लाडाने त्याला चिनू म्हणतो, कारण तो आहेच तसा, जसा काही चिनीच.... बसकं नाक, चिंगरे चिंगरे डोळे, गोरा गोरा रंग, भुरे भुरे केस.... तर असा हा आमचा चिनू अभ्यासात खूपच हुशार, सर्वच बाबतीत नंबर वन.... पण सर्वच बाबतीत हुशार असलं तरी काही अवगुणसुद्धा असतातच. सर्वगुण संपन्न व्हायला आपल्यातल्या काही अवगुणांवर मात करावी लागते. असो....
तर आमचा चिनू ना खोड्या काढण्यात खूपच बंड. खोड्या काढायच्या पण "मी तो नव्हेच" असा आव दाखवून बाजूला व्हायचं. असं अनेकदा व्हायचं, खोड्या तो करायचा पण मार मात्र दुसऱ्याला.... पण असं कधीपर्यंत चालणार ना. कधी न कधीतरी खरं समोर येणारच. सर्व मुलांनी त्याला अद्दल घडवायचं ठरवलं, कारण सर्वच मुलं खूप त्रासली होती त्याच्या खोडकरपणा मुळे.... वर्गात हुशार त्यामुळे सरसुद्धा त्याला रागवत नसत.
आज मात्र मुलांनी योजना आखली, काहीही असो, आज मात्र पर्दाफाश करायचाच! सर वर्गात यायच्या आधी सर्व मुलं क्लासच्या बाहेर गेली, चिनूला वाटलं अरे वा! आज तर छान संधी मिळालीय, त्याने काय केलं, काही मुलांच्या बॅगमधून डबे काढले, तर काहींच्या बॅगमधून पुस्तके काढली, काहींच्या बुक्सची पानंसुद्धा फाडली.... आणि आपल्या जागेवर जाऊन बसला, नेहमीसारखा "तो मी नव्हेच" आपलं पुस्तक काढून वाचत बसला. पण यावेळेस मात्र मुलं सजग होती, त्यांनी काय केलं महिताय, त्यांनी ना मोबाइलमध्ये चित्रीकरण केलं.... यापेक्षा चांगला प्रूफ कोणता? (शाळेत मोबाईल नेणं हे चुकीचं, पण खऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी हे आवश्यक होतं)
सर वर्गात आले, मुलांनी नेहमीप्रमाणे complaint केली, चिनूचं नावसुद्धा सांगितलं, पण चिनू मात्र नेहमीप्रमाणे "तो मी नव्हेच" असा आव आणून तयार.... शेवटी मुलांनी चित्रीकरण सरांना दाखवलं.
सरांनी चिनूला विचारलं, त्याने कबूल केलं, हो सर, "मीच तो..." त्याच्या आईवडिलांना शाळेत बोलावलं, सगळं सांगितलं. त्याच्या आई-बाबांनी त्याला सर्व मुलांसमोर माफी मागायला लावली. आता यापुढे मी असं वागणार नाही, उलट सर्वांना मदत करीन.
खरंच त्या दिवसापांसून चिनू खूप सुधारला, आता तो सर्वांना अभ्यासात मदत करतो. (बरेचदा आपण बघतो, मुलं खोड्या करतात, लहान आहे म्हणून दुर्लक्ष करतो, पण कधी कधी हेच दुर्लक्ष पुढे जाउन खूप मोठं कारण बनू शकतं) आपल्या पाल्यांच्या चुकांवर विरजण न घालता, लगेच त्याला समजवण्याचा प्रयत्न करा, हे बालसुलभ वय असं असतं, आपण जसे संस्कार देऊ तसंच ते घडतात.