खेळ सावल्यांचा
खेळ सावल्यांचा
खेळ सावल्यांचा। ( भाग १ )
रात्रीचे दोन वाजले कसला तरी लख्ख प्रकाश ( उजेड) सुयोग च्या डोळ्यावर पडला . आपल्याला कोणीतरी आवाज दिला असे त्याला जाणवले . तसेच तो झोपेतून ताडकन उठून बसला तर त्याला घरात कोणताही प्रकाश दिसला नाही .
रूममध्ये नाईट लॅम्प चा प्रकाश टीमटीमत होता .
त्याला वाटले कदाचित वेदिकाने त्याला आवाज दिला असेल म्हणून त्याने वेदिकाकडे बघितले तर ती शांत झोपलेली होती .
वेदिका सुयोग ची पत्नी होती . तिच्या पोटात सात महिन्याचे बाळ वाढत होते . त्यांच्या घरात मोठी व्यक्ती नसल्यामुळे सुयोग तिची खुप काळजी घेत होता .
काय हवं काय नको तोच बघायचा . तो पूर्ण जबाबदारी पार पाडायचा .
त्यांच्या घरात एक छोटासा नवीन पाहुणा येणार म्हणून ते खुप आनंदात होते . ते दोघेही त्यांचे स्वप्न रंगवत होते .
सुयोग ने वेदीकाच्या अंगावर पांघरून घालत तो किचन मध्ये पाणी प्यायला गेला . तो फ्रीज बंद करून बाहेर पडणार तोच परत लख्ख प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला . तो थोडं बिचकत डोळे बंद केले . दोन मिनिटात डोळे उघडून इकडे तिकडे बघू लागला तितक्यात त्याची नजर खिडकीत गेली . त्याला तो प्रकाश बाहेर दिसला .
कोणीतरी टॉर्च चमकवत आहे असे त्याला वाटले .
पण ईतक्या रात्री या काळ्याकुट्ट अंधारात व दाट झाडाझुडुपांमध्ये कोण बरं असेल तो विचार करत होता व खिडकीतून बाहेर बघत होता .
परत त्याच्या चेहऱ्यावर तो उजेड आला. जणू कोणी
चेहऱ्यावर बँटरी चमकवत आपल्याला बोलवत आहे इशारे करत आहे असे त्याला वाटले .
सुयोग बेडरूममध्ये आला कपाटाचं डायव्हर उघडून त्याने बँटरी काढली व दारामागून काठी घेत कोणताही आवाज न करता तो रूममधून बाहेर पडला व रुमचे दार ओढून घेतले .
सुयोग व वेदिकाला शांत वातावरण हिरवे रान व थोडासा गारवा घेत खेळणारी मोकळी हवा असे वातावरण त्यांना खुप आवडायचे .म्हणून सुयोग ने गावाच्या थोडं लांब घर बांधले होते .घराच्या पाठीमागे दाट झाडी होती. वातावरण खुप छान होते व कसलीही भीती नव्हती त्यामुळे ते दोघे तिथे आरामात व मनात कोणतीही भीती न बाळगता राहायचे .
सुयोगच्या एका हातात बँटरी तर एका हातात काठी होती . तो काठीने झुडपातून रस्ता काढत प्रकाशाच्या दिशेने जात होता .
त्याला भान ही नव्हते आपण घरापासून किती लांब आलेले आहो . तो प्रकाश त्याला जवळच वाटायचा पण जसजसा तो पुढे जात तसतसा प्रकाश लांब दिसत होता .
वाऱ्याचा घोगंवणारा तो भयानक आवाज सुयोगच्या कानी पडला तसा तो थोडा घाबरत थबकला त्याच्या डोक्यात विचारांचे वादळ उठले.तो इकडे तिकडे बघू लागला आपण खुप लांब निघून आलो हे त्याला जाणवले .
आपण ईतक्या लांब आलो तर तो प्रकाश कुठून आला हे बघूनच जाऊ या असे त्याने ठरविले .
त्याला एका झाडामागे तो प्रकाश दिसला . तो हळूच त्या प्रकाशा जवळ गेला तिथे त्याला एक बाई उभी दिसली.
तिचे काळेभोर लांब केस व अंगावर पांढरी शुभ्र साडी होती .
सुयोग पहिले घाबरला व नंतर हिम्मत करून बोलला
कोण . कोण आहे तिकडं! असे म्हणताच तिने तोंड त्याच्याकडे फिरविले .तसे तिचे डोळे चमकले तिच्या ओठाला रक्त आलें होते . तिला बघून सुयोग घाबरला त्याला खुप घाम फुटला त्याची बोबडीच जशी बंद झाली .
त्याच्या तोंडातून शब्द ही निघत नव्हता .
तो अ… अ…अ… करत वाऱ्याच्या वेगाने पळत सुटला .
ती कोण बघुया पुढच्या भागात
