कौतुक....
कौतुक....


पहिली मुलगी झाली म्हणून राग करणारे बाबांना बघतच आशु मोठी झाली..सतत छोट्या भावाचं कौतुक करणारे बाबा बघितले की तिला खूप वाईट वाटे...बाबांनी चार शब्द प्रेमाचे बोलावें याकरीता ती खूप प्रयत्न करायची..
बाबांचा स्वभाव अतिशय तापट नेहमीच ओरडून,चिडुन बोलायचे...
आज तिच्या पाठवणीच्या वेळी सर्वच भावूक झाले,मोठ्या बायका तिला चांगली वाग हो,असे सांगत असतानाच बाबा मोठ्या अभिमानाने म्हणाले,माझ्या आशुबद्दल मला पूर्ण खात्री आहे कोण बोल लावेल अशी ती कधीच वागणार नाही,माझी मुलगी खूप गुणी आहे तिला सांभाळा...असे हात जोडून तिच्या सासरच्या माणसांना सांगत होते...
पाठवणीच्या वेळी बाबांनी केलेले कौतुक पाहून आशुला खूप आनंद झाला..पहिल्यांदाच त्यांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडली अर्थात आनंदाने....