" जनी" भाग- 1
" जनी" भाग- 1
भाग- 1
" जनी"
मॅडम यांनी आवाज दिला. बेल झाल्यानंतर सुद्धा काही मुली हजर नसल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला .त्यांनी ताबडतोब आवारामध्ये सर्व मुलींना बोलवलं ! आणि काही सूचना देण्यासाठी रांगेत उभे केलं .
पांडे मॅडम म्हणजे आमच्या होस्टेल रेक्टर ! तापट ;स्वभाव ,व खतरनाक अशा मॅडम ! जवळपास दोनशे मुलींचा सांभाळ करणे साठी यांची नेमणूक केलेली होती . आमच्या क्वार्टरमध्ये जवळ जवळ तीन इमारत असून खालच्या मजल्यावर ऑफिस व राहण्याचा रूम होता .ऑफिस व राहण्याचा कॉर्टर जवळच असल्यामुळे . प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या मुलीनंवर त्यांची नजर होती . बाजूच्या दुसऱ्या इमारतीमध्ये स्वयंपाक घर व बाथरूम लागूनच असल्यामुळे त्यांचे लक्ष नेहमी असत .एका रूम मध्ये दोन मुली व त्यांच्या जोडीला एक मोठी मुलगी ! अशा पद्धतीने प्रत्येक रूममध्ये व्यवस्था केली होती . सकाळी आठ वाजता वॉर्निंग बेल झाली की साधारण पाच-सहा पर्यंत सर्व तयारी करून ग्राउंड वर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या . अर्धा तास कवायत , व्यायाम झाल्या नंतर साफ सफाई आटोपल्यानंतर सर्वांना चहा ,आणि नाश्ता दिला जात आणि नंतर शाळेत जाण्यासाठी तयारी साठी अर्धा तास दिला जात शाळेत वेग वेगळ्या वयोगटाच्या मुली आणि वर्ग असल्या कारणाने आमच्यात प्रेम , माया , ममता , असेच असल्यामुळे व गेटच्या बाहेर जाण्यास कोणालाही परवानगी नव्हती .
ग्राउंड मध्ये बोलावल्यानंतर या तीन मुली रूम मध्ये ! ग्राउंड वर हजर नसल्या कारणाने मॅडम संतापल्या होत्या . मॅडमने स्टेजवर बोलावले सर्वांसमोर त्यांना शिक्षा म्हणून शाळेचे ग्राउंडची साफसफाई करण्यास सांगितले . त्यां नंतर मात्र रोज दुसऱ्या किंवा तिसऱ्या मिनिटाला सर्व मुली हजर होतात .सर्वांना शिस्त आणि नियमांचे पालन करणे बंधनकारक होते . त्या तीनही मुलींना शिक्षा संपल्यानंतर मॅडमचा ऑफिसमध्ये बोलवले व तिघींना मॅडमने खडसावून विचारले ! त्यात मोठी मुलगी म्हणून 'जनी ' च नाव होतं तिच्यावर इतर दोन मुलींची जबाबदारी होती . उशिरा झाल्यामुळे पांडे मॅडम मात्र जनी वरच जागवल्या व जनी ला एक थप्पड ठेवून दिली . त्यामुळे जनी 'चा संताप झाला .जनी जोर जोरात रडायला लागली . तेव्हा मॅडम ने कारण विचारले ! तेव्हा तिने उत्तर दिले बाथरूम मध्ये नळाचे पाणी संपल्यामुळे आम्हाला उशीर झाला . त्यामुळे पंधरा मिनिट आम्ही तयारी करण्यास उशीर झाला . जनी चे उत्तर ऐकूण व तिचा धीटपणा बघुन खूष झाल्या . मॅडमने ताबडतोब इतरांना बोलून नळाची दुरुस्ती करण्यात आली . आज जनी 'चा इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश झाला होता . जनी ' ही लहानपणा पासून अतिशय धीट हजरजबाबी मुलगी होती .कोणतेही अडचण ; कारण स्पष्टपने सांगत होती . तिला खोट्या गोष्टी सहन होत नव्हत्या पाचवी ला प्रवेश घेतल्या नंतर वर्गामध्ये हुशार व चुन चुनीत असल्यामुळे बाईने तिला मॉनिटर बनवले . वर्ग सांभाळणे भांडण करणाऱ्या मुलींना शिक्षा देणे . लहान पणा पासूनच तिचे नेतृत्व गुण वाढीला लागले .अभ्यासातही हूशार व खेळातही हूशार असल्यामुळे हळूहळू वर्गामध्ये व शाळेमध्ये नावारूपाला येऊ लागली .मुलींचे भांडण झाले परस्पर ती सोडून निवडा करत होती . बऱ्याच वेळा पांडे मॅडमनी ती भांडणे सोडत असताना व समजूत घालत असताना बघितले होते .तिच्यावर पांडे मॅडम जास्त जबाबदाऱ्या देत होत्या .खेळांमध्ये. सांस्कृतिक. कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी अग्रेसर होती . सातवी पासून तिचे शरीर आखीव रेखीव होता .इतर मुलींपेक्षा दिसायला ती अतिशय सुंदर ! लांब सडक केस आणि उंच अशी गोरीगोमटी असल्यामुळे सर्वानाआवडू लागली . होस्टेलमध्ये , कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी ती पहिला नंबर असत . पांडे मॅडमची जनी ' अतिशय आवडती विद्यार्थिनी झाली . तिला शिक्षा मिळाल्या नंतर तिने कधीही उशीर केला नाही . सर्वगोष्टी वेळच्या वेळी करणे . हे गुण तिच्या अंगवळणी पडले .
एका सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बालनाट्य मध्ये भाग घेतला असताना तिने आईची भूमिका केली होती. पेहराव करून सर्व मुलींनी बालनाट्य सादर केले होते . मात्र नाटक संपल्या नंतर तिच्या मनामध्ये चल बिचल सुरू झाली. पांडे मॅडम ला विचारण्याचा प्रयत्न केला की मॅडम वडील कोण आहेत कुठे असतील मी या ' होस्टेल मध्ये कशा पद्धतीने आली ?मात्र पांडे मॅडम नी सांगितले की वेळ आल्यानंतर तुला सर्व सांगितलं जाईल आता तू फक्त शाळेकडे व शिक्षणाकडे लक्ष देश . ! होस्टेलमध्ये एकदा शाळेतून आल्या नंतर साडे अकरा बारा वाजता जेवण मिळाले की सायंकाळी आठ वाजे पर्यंत जेवण मिळत नव्हते . मधल्या काळामध्ये भूक लागली तरी गेटच्या बाहेर कोणाला जायची परवानगी नव्हती . आणि कुणी जाण्याचा प्रयत्न केला तरजबर शिक्षा मिळत असल्यामुळे कोणी धाडस करत नव्हते . कोणत्या गोष्टींमध्ये धाडस करणे हे गुण जनी च्या अंगी असलेले होते . तिने एकदा तिच्या वर्गाच्या मागच्या खिडकीमध्ये जाऊन होस्टेलचा गेटच्या बाजुला एका भिंतीवर चढून तिकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र तार कंपाउंडमध्ये तिचे कपडे अडकल्यामुळे तिला बाहेर जाता आले नाही . त्यांना ती सापडले गेली तेव्हा मात्र तिला खूप शिक्षा केली व तिला समजून सांगितले काही अडचण असल्यास आम्हाला येऊन भेट . ! असा प्रयत्न पुन्हा करू नकोस अन्यथा तुझी येथून हकालपट्टी केली जाईल .व बाहेरच्या जगामध्ये तुला कोणीही सांभाळणार नाही . तेव्हा पासून मात्र जनी मध्ये थोडा बदल झाला .पाचवी ची परीक्षा संपली असेल त्याच्या नंतर एका आठवड्याने एक परदेशी कुटुंब मॅडमच्या ऑफिसमध्ये बसले होते .कशासाठी ? आले आणि काय चर्चा झाली ?याची कल्पना किंवा कोणालाही नव्हती . मात्र जनी व तिच्या रूम मधील दोन्ही मैत्रिणींना ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं त्या कुटुंबा बरोबरगार्डन मध्ये जायला सांगितलं . गार्डन मध्ये आल्यानंतर कुटुंबापैकी दोघांनी आम्हाला एकेकीला असंख्य प्रश्न विचारले .आणलेला खाऊ खायला दिला . विविध प्रकारचे खेळ खेळले .एक तास मनोरंजन झाल्यानंतर आम्हाला परत ऑफिसमध्ये नेले . तेव्हा आमच्या पैकी माझ्या रूम मध्ये असणारी रत्ना त्या कुटुंबाला आवडली होती व त्यांनी तिला दत्तक घेण्यासाठी सारी कागदपत्रे व फॉर्मॅलिटी पूर्ण केली. आम्हाला सांगण्यात आले की हे तुझे आई-वडील आजपासून तू यांच्याकडे यांच्या गावी रहा आणि मुलगी म्हणून रहा तेव्हा मुलींचा किंवा कोणाचाही काही विचार केला जात नव्हता .कारण सर्वस्वी पांडे मॅडमचा निर्णय होता . शेवटचा निर्णय असत .त्या दिवशी रत्ना ला घेऊन ते परदेशी कुटुंब गेले रूम मध्ये फक्त जनी आणि तिची दुसरी मैत्रीण प्रभा दोघीच होत्या त्या रात्रभर अस्वस्थ वाटले जणू काही आपले लहान बहीण हरवल्याचा भास तिला होऊ लागला रात्रभर ती शांत झोपू शकली नाही .दुसऱ्या दिवशी पांडे मॅडम ला विचारले आमची मैत्रीण रत्ना केव्हा येईल तेव्हा पांडे मॅडमनी सांगितले टीप भारतामध्ये नसून दुसऱ्या देशामध्ये तिला दत्तक घेण्यात आल्यावर व त्या कुटुंबाला मुलबाळ नसल्याने त्यांनी तिला दत्तक घेतल्या मोठ्या श्रीमंत कुटुंबामध्ये दिलेले आहे . ती येथील आठवणी विसरावी म्हणून तिला परत इथे आणले जाणार नाही .मोठी झाल्या नंतर तुम्हाला नक्कीच तिला भेटता येईल . ?म्हणून त्यांनी आम्हाला जाण्यास सांगितले तेंव्हा पासून जनी स्वप्नपाहू लागली की मला ही असे आईवडील भेटले तर ? माझे खरे आई वडील कोण ? असतील याविषयी तिच्या मनामध्ये नेहमी शंका निर्माण होऊ लागल्या आणि जेव्हा पुस्तकामध्ये गोष्टी वाचत असताना किंवा ऐकत असताना तिला नेहमी आपल्या आईवडिलांचा भास होत होता तिला नेहमी आपल्याला कोणीतरी बोलावते आहे असा भास होत होता. हळूहळू वर्ष संपत आलं इयत्ता सहावीच्या वर्गात गेली होती त्यांच्या रूम मध्ये आता नुकतीच नवीन आलेली एक मुलगी वर्षाची असेल .सामील करण्यात आलं तिची चौकशी केली तेव्हा सांगितलं की गर्दीच्या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी पोलिसांना सापडलेली असून आता बोलता येत नसल्यामुळे तीच्या बद्दल काही सांगत नव्हती . खूप लहान असल्यामुळे तिची रवानगी होस्टेलमध्ये म्हणजे रिमांड होम मध्ये केली होती .हळू त्याची जागा त्या मुलीने घेतली हळूहळू यांच्यामध्ये घट्ट मैत्री ज्याने ही सर्व होस्टेलमध्ये रिमांड होम मध्ये एक डॅशिंग मुलगी म्हणून नावारूपाला येत होती . व काही काम सांगितले तरी ते नाही म्हणत नव्हती आणि सहकार्य करणे . मदत करणे .हा तर तिचा पिंडच होता .
एकदा मध्यरात्री बाथरूम मध्ये तीला काहीतरी अंधारामध्ये हालचाल झाल्याचे दिसले तिने लाईट लावून बघितले तर भला मोठा साप . ! बाथरूममध्ये .शिरलेला होता तिने ताबडतोब आरडा ओरड करून तेथे असणाऱ्या शिक्षकांना बोलले ताबडतोब त्यापासून सुटका केली .मात्र घाबरून न जातातीने डेरिंग व केलेल्या मदतीमुळे ती म्हणत होती .एखादी मुलगी आजारी झाली असेल तर तिच्या जवळ बसणे . काळजी घेणे ती एखाद्या मोठ्या स्त्री प्रमाणे ती करत असे तिच्या रूम मध्ये आलेली नवीन मुलगी व नवीन वातावरण मूळे ती तापाणे फणफण पडली होती .व डोळे पांढरे करत होती . तेवढे रात्री तिने पांडे बाईंना निरोप दिला हॉस्टेलमध्ये सोय नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये रात्री तिला ऍडमिट करण्यात आल तेव्हा नीने स्वतःहून त्या मुली जवळ थांबण्यास तयार झाली त्यामुळे तिने डॉक्टरांची हॉस्पिटलची ओळख करून तीन दिवस हॉस्पिटलमध्ये थांबली होती . चौथ्या दिवशी परत हॉस्पिटल मधून तिच्या रूममध्ये दाखल झाली . त्यामुळे तिला बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेणे व सहकार्य करणे हे गुण तिचे वाढत होते त्यामुळे तिच्याविषयी सर्वांना सहाजिकच आपुलकी निर्माण होत होती शरीर भक्कम असल्यामुळे सहावीला असून ति शरीराणे मोठ्या मुलीप्रमाणे भक्कम व गोरीगोमटी असल्यामुळे सुंदर ! तिच्या सुंदर त्यामध्ये भर पडत होती . अशा पद्धतीने हळूहळू तीने ही सातवी मध्ये अँडमिशन झाले . सातवीत गेल्यानंतर वय वर्ष बारा ? मी पदार्पण केले होते . त्यामुळे शरीरामध्ये शारीरिक बदल होताना दिसत होते . तिची छाती गाल आणि तारुण्यात पदार्पण केल्याप्रमाणे तिच्या शहरांमध्ये बदल झाल्याने . त्यामुळे ती अतिशय सुडोल अशी दिसू लागली . आणि डेरिंग असल्यामुळे जणूकाही ती वर्गातील मुलींची पांडे मॅडम सारखी रेक्टर !सर्व मुलींना भासू लागली . तिच्या अंगी असणारी माया; ममता ;या बरोबरच डॅशिंग आणि डेरिंग भरपूर होती . एखाद्या मुलीने छोट्या मुलींनी तिची छेड काढली किंवा तिचं नाव घेतलं त्यांना ताडकन वाजून दिल्याशिवाय राहत नव्हती .तिला मोठ्या मुलीही घाबरून वागत असे . सातवी मध्ये आल्यानंतर साधारणता जेनी ;ला बारा वर्षे झाली असतील तेंव्हा पासून ती होस्टेलमध्ये आहे . आठवते तेव्हापासून त्यांची काळजी घेण्यासाठी असणाऱ्या आजी म्हणजे एक "सरला" आजी व एक "वानू "बाई या दोघींचे काम म्हणजे दाखल झालेल्या लहान मुलींना त्यांना समजेपर्यंत आईप्रमाणे सांभाळ करणे . सेवा करणे ही सारी कामे ते करत असे त्यामुळे लहान मुलींना त्या स्वतःच्या आईच वाटत . सांभाळ करणे . नियंत्रण करणे .हे सारे काम पांडे बाईंकडे ! असल्यामुळे पांडे बाईंचा सर्वांना दरारा आणि धाक . मात्र पांडे बाईंची अतिशय प्रिय व आवडते अशी मुलगी होती..... ती म्हणजे ? ..... ' जनी ...
----------------------
क्रमशा भाग 2
