Anuja Dhariya-Sheth

Others

3.3  

Anuja Dhariya-Sheth

Others

जाऊबाई नाही बहिणी

जाऊबाई नाही बहिणी

6 mins
563


निकिता लग्न होऊन घरात आली, मोठे दीर, जाऊ त्यांची दोन मुले, सासू, सासरे त्यात तिचे हे दुसरे लग्न.. दोघेही घटस्फोटीत होते.. त्यामुळे बऱ्या पैकी लग्नाची वय आता उलटून गेली त्यामुळे आलेले अवघडलेपण होते.. जाणून घेईं पर्यंत काही काळ गेला.. हळू हळू रूळू लागली ती घरात.. मोठी जाऊ नम्रता अगदी प्रेमळ होती, निकिताला सांभाळून घ्यायची.. सर्व असले की खूप छान वागायची.. लोकं तर म्हणायचे, आताच्या या काळात दोघी जावा अगदी बहिणी सारख्या राहतात म्हणजे खरंच कौतुक आहे..


ती वहिनी वहिनी करत जायची, वहिनी पण सर्व करायची.. पण कुठेतरी काहीतरी कमी होते, वहिनी हातचं राखून वागतात असे तिला जाणवायच.. तिला त्यांच्या दोघी मध्ये मैत्रिणीचे नाते हवे होते.. नम्रता स्वभावाला खूप छान होती.. पण निकिता- निखिल सोबत कुठे जायचं म्हटलं की ती काहीतरी कारण काढून टाळाटाळ करायची, निकिता सोबत मुलांना पण पाठवायची नाही..


निकिताच्या गरोदरपणात पण नम्रताने सर्व केले, मोठ्या बहिणी प्रमाणे, पण एक कोरडेपणा होता त्यात.. आणि ह्याच कोरडेपणाच उत्तर निकिता किती दिवस शोधत होती... बाळ हळू हळू मोठे होऊ लागले, सर्व छान सुरू होते.. त्यांचे एकत्र कुटुंब अगदी मस्त गुण्यागोविंदाने रहात होते...


बाळाच्या बारशाला येऊ शकल्या नाहीत म्हणून आजे सासूबाई आज त्याच्या पहिल्या वाढदिवसाला येणार होत्या, बारशाला येणार होत्या पण एकदम कडक लॉक डाउन झाले आणि राहून गेले.. नंतर काही ना काही अडचणी येत राहिल्या.. पण आज पहिला वाढदिवस मात्र घरातल्या घरात असला तरी जोरात होता.. आजी आता इथेच राहणार म्हणून निकीताला खूपच टेन्शन आले होते... वाढदिवस छान झाला, दोघी जावा मधले नाते बघून आजी खूप खुश झाल्या...


परत रोजच रुटीन सुरू झाले, आजीने नम्रताला सांगितलं बऱ्याच दिवसात माहेरी गेली नाहीस, आता मुलांना सुट्ट्या आहेत, तुमचे तें ऑनलाईन का काय ते पण बंद आहे, या जाऊन... वातावरण तस बरं आहे, तोपर्यंत जाऊन ये..


वहिनींचा चेहरा खुलून आला, तसे निकिताच्या पण मनात आले, खरंच वहिनी किती दिवस माहेरी गेल्या नव्हत्या म्हणून गप्प असायच्या का? किती तरी विचार निकिताच्या मनात येत होते...


नम्रता माहेरी गेली, निकिता थोडीशी आजींना घाबरून वागत होती... आजी पण मोठ्या हुशार होत्या, त्यांनी मुद्दामच नम्रताला माहेरी पाठवले, निकिताला हसत म्हणाल्या माहेर जवळ असल्याचा हा फायदा आहे नम्रताला आणि तोटा पण.. कि सारख राहायला मिळत नाही.. बर असुदे ती आली की तू पण जाऊन ये हो आईकडे, जरा आईच्या हातचं खाल्ल ना की सासरी येऊन सर्व करायची हिम्मत येते, माहेर म्हणजे टॉनिक असते बघ...


आजी निकिताचे अगदी बारकाईने निरीक्षण करत होत्या, अनुभवाचे बोल सांगत होत्या... हळू हळू निकिताच्या मनात असलेली भीती कमी झाली, तसेही निखिलने तिला सांगितलं होते की आजी एकदम कूल आहे, पण अनुभव येई पर्यंत जरा घाबरून होती.. शेवटी पहिला अनुभव वाईट आल्यामुळे दुसऱ्या वेळेस घरात वावरताना तिला भीती वाटत होती... दुसरे लग्न दोघांचेही त्यामुळे दोघे पण कटू अनुभवामधून गेले होते, एकमेकांना सावरून संसार करत होते, आता नील चा जन्म झाल्या पासून आई बाबा म्हणून नव्याने एकमेकांना उमजत होते..


घरात सुद्धा सर्व काही चांगलेच होते, सर्व एकमेकांचे मन जपत होते, दोघांच्या पूर्वायुष्याबाबत काहीही आठवणी काढायच्या नाहीत असे सर्वानी ठरवले होते, त्यामुळे काही प्रश्न नव्हता..


आजींच्या तोंडात नम्रता नाव एवढे बसले होते की सारखा जप... पण निकिताला त्याचा अजिबात राग आला नाही, उलट ती शांतपणे ऐकत होती... आजीला तिचे कौतुक वाटले कारण या आधीची निखिलची बायको म्हणजे बाई.. नुसती चिडायची, नम्रता लाडकी मी नाही, नुसती भांडण...


आजींच्या डोळ्यात कटू आठवणींने पाणी आले, निकिताने अचूक हेरले, आजी, काय झाले? सांगा बरं...


आजी सर्व सांगू लागली, अगं नम्रता म्हणजे माझ्या बहिणीची नात, लहान असल्यापासून मला आमच्या नितीन साठी मनात भरली होती, नावा सारखीच नम्र, शांत.. शेवटी माझी नात सून करून आणली मी तिला, तिला बाप नाही, लहान असतानाच गेला.. पण पोर गुणी, कष्ट करून शिकली, तिला ना बहीण ना भाऊ.. निखिलला भाऊ मानले तिने लग्न झाल्यावर, आणि येणारी जाऊ बहीण मानेन अशी म्हणायची, हि तुझी सासू तिला तिच्या भावाची मुलगी आणायची होती सून म्हणून पण नितीनला पण नम्रता आवडली, त्यामुळे तिचे काही चालले नाही तूझा सासरा आणि माझ्या पुढे...


मनातून तिने नम्रताला कधी आपले मानलेच नाही बघ... आणि मग् तुझ्या नवऱ्याच लग्न करून ती बाई आली.. मला नाव सुद्धा घ्यायचं नाही बघ तीचं... नम्रता खूप खुश होती, बहिणीचे नाते करिन मी.. खूप हौशीने लग्न केले, तुझ्या या सासूने जरा जास्तच कौतुक केले या बईचे... दागिने पण जरा जास्तच केले, साड्या पण जरा जास्तच महाग घेतल्या... तूझा नवरा पटकन बोलून गेला तिला वहिनीला आजीने पसंद केले ना म्हणून आई आता तूला पसंद करून तुझे कौतुक करते, तिच्या मनात पाप.. तिने याचा खूप फायदा घेतला..


तुझ्या सासू समोर एक वागायची, ती नसताना वेगळे वागायची, हिची दोन मुले पसारा करायची, सासू समोर दिखावा करून आवरायची, नमु बिचारी साधी, वहिनी वहिनी करून तिला पण गुंडाळून ठेवले... तिच्या कडून गोड बोलुन मुलांना भरवायला घ्यायची, फिरायला न्यायची... आता काकू एवढ प्रेमाने करते म्हटल्यावर नम्रता पण नाही म्हणायची नाही, आपल्याला नाही मिळाले काका- काकू चे प्रेम आपल्या मुलांना भेटत आहे ना... असा विचार ती करायची.. तिच्या चुका सांभाळून घ्यायची.. आणि नम्रता नसताना ही सासूचे कान भरायची.. पण मी नेमकी तेव्हा वसंताकडे होते ना... नाहीतर बरोबर सरळ केली असती तिला...


सगळे टोकाला गेल्यावर ह्या अनंताने मला बोलावले, आल्यावर बघते तर काय हा तमाशा... त्या बईच्या मनाविरूद्ध लग्न झाले होते त्यामुळे ती निखिल सोबत खूप भांडण करायची, तिला घटस्फोट हवा होता.. पण तुझी हि सासू तिलाच गोंजारत होती लग्न टीकाव म्हणून...


मी आल्यावर नम्रताने सर्व सांगितले, नम्रता विरूद्ध सासूचे कान भरून तिला वेगळ करायला बघत होती.. पण तें होणाऱ नाही समजले आणि सर्वांशी भांडण करायला लागली, बारीक बारीक गोष्टींचा तांडावा करायला लागली... ह्या सगळ्यात निखिल पेक्षा भरडली गेली ती माझी नम्रता... तीच्या आणि निखिल बद्दल सगळी कडे काही ना काही घाणेरडे उठवले तीने... स्वतःच्या चारीत्र्यावरचा संशय ती नाही सहन करू शकली, मुद्दामून मुलांना आमच्या सोबत पाठवते, मुले नक्की कोणाची? असे खूप विचीत्र बोलुन दागिने घेऊन गेली...



तेव्हा तुझ्या सासूचे डोळे उघडले, माझ्या पोरीला ह्या धक्क्यातून सावरायला वर्ष गेले.. माझ्याशी बोलली ना, आजी एवढ तोंड पोळलय की आता ताक काय पाणी सुद्धा पिताना फुंकर मारून प्यायला पाहिजे..



आजी रडायला लागल्या, जाउदे नको त्या आठवणी, पण आता तसे काही उरले नाही.. अनिताला म्हणजेच तुझ्या सासूला तिची चूक समजली.. आता तुम्ही दोघी या घराचा आधार व्हा... नम्रताच्या मनाची जखम भरली की, आपोआप नीट होईल सर्व, तुझ्याशी हे बोलता यावं म्हणून तिला पाठवले, तूला काहीच माहिती नाही असे दाखव.. काही गोष्टींसाठी काळ हेच औषध असते... आपण घाई करायची नसते.. नम्रता कर्तव्याला कधीच चूकणार नाही पोरी... फक्त मनमोकळ व्हायला थोडा वेळ दे.


नम्रता आली, निकिता काही दाखवत नव्हती.... आजी मात्र खुश होत्या.. दोन्ही नातसून अगदी छान सांभाळून घेत होत्या सर्व... नम्रता आजारी झाली, निकिताने लहान बहिणी प्रमाणे तिची काळजी घेतली, मुले घर सर्व छान सांभाळून घेतले.. हळू हळू दोघींचे नाते खुलत होते, नम्रताला सुद्धा निकिता किती चांगली आहे हे माहित होते पण जुना अनुभव आठवला की ती मागे यायची...


निकिताचा वाढदिवस आला, नम्रताने सर्व तयारी केली, तिला सरप्राईज दिले, निकिताला खूप आनंद झाला.. गडबडीत गिफ्ट घ्यायला मात्र विसरून गेली.... सर्वानी एकत्र येऊन छान सेलेब्रेट केले... गिफ्ट राहिले बघ असं उदास होऊन नम्रता म्हणाली.. तेव्हा निकिता म्हणाली, आपण दोघी बहिणी म्हणून राहू, हेच गिफ्ट द्या मला, आज पासून मी तुम्हाला ताई म्हणेन आणि तुम्ही मला जाऊ बाई नाही म्हणायचे, निकिता म्हणून हाक मारायची हेच गिफ्ट द्या मला... नम्रताने कबुल केले...


आपल्याला अशा सूना मिळाल्या म्हणून सासू-सासरे खुश होते... आजींनी दोघींवरून हात ओवाळून बोटे मोडली अन् म्हणाल्या अशाच राहा आयुष्यभर.. कोणी किती प्रयत्न केले तरी एकमेकांना विश्वासात घेऊन काम करा म्हणजे हे घर नेहमीच एकसंध राहीलं.. भांडलात तरी बहिणी म्हणून भांडा... जावा जावा म्हणून कधीच कोणता कावा करू नका... गोडी- गुलाबीने संसार करा...


दोन्ही जोडप्यांनी मोठ्यांचे आशिर्वाद घेतले...

कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून..

अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


Rate this content
Log in