kanchan chabukswar

Others

4.0  

kanchan chabukswar

Others

जादूची खुर्ची

जादूची खुर्ची

9 mins
238


रवीना अतिशय रागांमध्ये कॉलेजमध्ये आली, तिच्या चेहरा वरून घरात नक्कीच काहीतरी बिनसले असेल असे निशूला वाटली वाटले. दुपारचा लंच ब्रेक मध्ये देखील रवीना काहीच जेवली नाही, तिचं कशातच लक्ष नव्हतं. निशू, लता, रोजी, सगळ्यांनी तिची समजूत काढायचा प्रयत्न केला, बऱ्याच वेळानंतर रवीना नी खरं कारण सांगितलं. कॉलेजच्या ट्रीप साठी तिच्या आईने नेहमीप्रमाणेच तिचा प्रस्ताव धुडकावून लावला होता, मुला-मुलींच्या ट्रीप मध्ये रवीना जाणार नव्हती.


   शैलेश बराच वेळ प्रयत्न करत होता पण त्याला डिसेक्शन जमत नव्हतं, वेडावाकडा कट, त्याच्यामुळे त्याचं पहिलं स्पॅसीमन खराब झालेलं होतं, नंतर त्यांनी स्पेसमन वरती ब्लेड चे फटकारे मारून त्याचा चिखल करून टाकला होता. काहीतरी बिघडलं होतं खरं. काल वनस्पतिशास्त्राच्या प्रोफेसरने दुर्मिळ वनस्पती गोळा करण्यासाठी सिमला आणि कुलु मनाली ची ट्रिप ची घोषणा केली होती. रंगीबेरंगी फुलपाखरू दिवसाचे समस्त विद्यार्थी अतिशय स्वप्नाळू डोळ्यांनी घरी गेले, कुलु मनालीचा थंडावा, बरोबर अतिशय प्रिय असलेले मित्र-मैत्रिणींचे कळप, काय काय धमाल करायची याची सगळ्यांनी जंत्री केली होती. बहुतेकांच्या घरून होकार येणारच होता, ज्यांचे पैशाचे प्रश्न होते त्यांच्या मित्रांनी ठरवले होते ते काहीही करून सगळ्यांनी जायचे. अर्थात दिलेली रक्कम त्यांचे मित्र नोट्स च्या रूपाने किंवा परीक्षे मधल्या मदतीने व्यवस्थित रित्या परत वळवून घेणार होते.


     उषा बराच वेळ लेडीज रूमच्या बाथरूम मध्ये बसली होती, जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिच्या नाकाचा शेंडा लालबुंद झाला होता. ट्रीप च्या माध्यमाने विराज बरोबर असलेली तिची रिलेशनशिप ती पक्की करणार होती, मग रडायचं काय कारण होतं? ट्रीपला जाणार या कंपनीमध्ये सगळेच काही अभ्यासू मुलं नव्हते आणि याची प्रोफेसर यांना देखील कल्पना होती पण प्रोजेक्टच्या दृष्टिकोनातून ट्रीप नेणे भाग होते. कॉलेजच्या मागच्या बाजूला दूर टेकडीवर ती एक जादूचे घर होतं, बरेच जण समस्यानिवारण करण्यासाठी तिथे जात, आल्यानंतर मात्र कोणीच काही बोलत नसे. तसा दंडकच जादूच्या घराचा होता.


रवीनाने आपल्या आईची खूप मनधरणी केली, रवीनाचे बाबा तिला ठाऊकच नव्हते, त्यामुळे आईच तिचे आई-बाबा होती. पण रवीना पण हट्टाला पेटली होती, शेवटी रवीना शैलेश आणि उषा कॉलेज संपल्यावर ती जादूच्या घराकडे रवाना झाले. घरात शिरल्यावर ती त्यांना मज्जाच वाटली, जादू सारखे तिथे काहीच नव्हतं, घराचं दार एका मध्यमवयीन महिलेने उघडलं, मस्तपैकी कॉटनची साडी, मॅचिंग ब्लाऊज, व्यवस्थित कट केलेले रुपेरी काळे केस, चेहऱ्यावरती तेज, मोठे कुंकू, आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ. ती बाईच काही जादूगार वाटतच नव्हती.


    "एकेकट्याने या" मंद हसत त्या बाईने त्यांना सांगितले.

"तुझा, तू पहिले जा," असं करत शेवटी दोन्ही मुलींनी शैलेशला आत ढकलले.


आपल्या खोलीमध्ये मागच्या भिंतीवरती शांत मंदस्मित असलेली कृष्णाची भलीमोठी फोटोफ्रेम होती, त्याच्या खालीच निर्मले ची खुर्ची होती. समोर स्वच्छ काच असलेला टेबल आणि टेबल याच्यापुढे मांडलेल्या चार सुबक आकाराच्या खुर्च्या.

"हा बोल! काय म्हणायचं आहे?" निर्मला म्हणाले


"काही नाही नेहमीचंच, बाबा कधीच कुठल्या कॉलेजच्या एक्टिविटी मध्ये भाग घेऊ देत नाहीत, फक्त अभ्यास कर म्हणतात, फक्त पहिल्या वर्षी ट्रीप ला जाऊ दिले, त्याच्यानंतर मात्र अजिबातच नाही. माझी फार कुचंबणा होते. मित्रांमध्ये सगळे जण मला चिडवतात. चिकट मारवाडी म्हणतात. बाबांनी काही म्हटले तर आई पण त्यांनाच होकार देते." शैलेश वैतागून म्हणत होता.


"बरं इतर मुलांसारखे नाही, मी अभ्यासही मी व्यवस्थित करतो, माझी ग्रेड्स खूप चांगले आहेत, माझी पण बरीच स्वप्न आहेत, चांगला अभ्यास करून मी पण माझं भविष्य व्यवस्थित आखणार आहे हे बाबांना पण माहित आहे मग ते असे खवचटपणा का करतात?" शैलेश भडाभडा बोलत होता.


"काय करता तुझे बाबा?" निर्मला


"पोलीस इन्स्पेक्टर आहेत, त्यामुळे घरात कमीच असतात."


"ठीक आहे अजून दोन दिवसांनी ये, येताना तुझ्या बाबांच्या नेहमी वापरातली एखादी वस्तू घेऊन ये, वस्तू जुनी पाहिजे, आणि त्यांच्या नेहमीच्या वापरातली पाहिजे." निर्मला म्हणाली.


आता पाळी रवीना ची होती.

निर्मल च्या लक्षात आलं की सगळ्या तरुण वर्गाची समस्या एकच आहे. जनरेशन गॅप.

रवीना ला पण आईची एखादी वस्तू आणायला सांगण्यात आले.

उषा जास्त शहाणी होती ती काहीच बोलली नाही ती म्हणाली" मी नंतर येईन."

निघताना शैलेशने सहजच उशाला विचारले," तुला पण तर प्रॉब्लेम होता ना गं! आपण तिघे बरोबर चालू होतो, मग तू का नाही बोललीस तिच्याबरोबर?" शैलेश नेहमीप्रमाणे रागातच होता.


उषा म्हणाली," आधी तुमच्या दोघांचा अनुभव होऊ दे, मग मी ठरवीन आणि त्यातून बघूया माझ्या आई-बाबांनी काही वेगळा विचार केला तर, की नाही?"


दोन दिवसानंतर शैलेश आपल्या वडिलांची जुनी हॅट घेऊन निर्मल यांच्या बंगल्याबाहेर उभा राहिला.


शैलेश वेळेवर आल्यामुळे निर्मला त्याची वाटच बघत होती. आज शैलेश एकटाच आला होता. निर्मलेची एक विचित्र अट असायची, तिच्याकडे येताना कोणाला काही सांगायचे नाही नाहीतर तिच्या जादू चा असर होत नाही. खरं म्हणजे शैलेशला मनातून भीती वाटत होती, संमोहित करून त्याचे काही बरेवाईट तर होणार नाही? किंवा त्याच्याबरोबर कुठला खेळ तर खेळला जाणार नाही? बऱ्याच कथा वाचल्या होत्या, मुलांना त्यातून तरुण मुलांना बेशुद्ध पाडून त्यांचे अवयव काढून घेण्यात येतात, किंवा अजून काही. काहीजण तर तरुण मुलांना औषध पाजून, इंजेक्शन देऊन त्यांच्याकडून काही कामं पण करून घेत असत. काम झाल्यावर ती त्यांना कुठल्यातरी दुसऱ्या गावाला नेऊन सोडण्यात येत असे. शैलेश मनातून घाबरलेला होता, तरीपण निर्मला त्यातली वाटत नव्हती, एक तर निर्मला सुस्थितीत असलेली मध्यमवयीन स्त्री वाटत होती, आणि तिच्या बंगल्याचे ख्याती पुष्कळ पसरली होती.


    शैलेशनंतर अर्ध्या तासाने रवीना निर्मलाच्या बंगल्याजवळ पोहोचली.तिच्या पण मनामध्ये शैलेश च्या पेक्षाही विचित्र धाकधूक चालली होती, तरीपण शैलेश आधी बंगल्यात गेलेला बघितला आणि तिला थोडा धीर आला. शैलेशनंतर अर्ध्या तासाने रवीना निर्मलाच्या बंगल्याजवळ पोहोचली. रवीनाच्या घरामध्ये विशेष काही सापडलं नाही पण तिच्या आईच्या लग्नाच्या वेळच्या चपला तिला सापडल्या होत्या त्या ती घेऊन आली होती. निर्मल तिच्या घरातली विधि पण विचित्र होता, तिन्ही वेगवेगळ्या खोलीमध्ये दोघांना बसवले, आधी शैलेशला बोलवले, तिच्या ऑफिसच्या खुर्ची च्या बाजूला खिडकीजवळ पडद्या पाशी एक सुरेख आरामशीर असे आराम खुर्ची ठेवलेली होती, मखमली निराळ्या रंगाचे आवरण असलेली खुर्ची अतिशय आरामदायी असेल असे वाटत होते, तसेच पुढे पाय ठेवण्यासाठी मऊ नरम असे आसन ठेवलेले होते.


शैलेशला त्याच्यावरती बसवण्यात आले, त्याच्या वडिलांची हॅट त्यांनी आपल्या डोक्यावर ठेवली, वरून एक हेडफोन त्याच्या कानापाशी लावला, हेडफोन मधून मंजूळ असे बासरीचे स्वर ऐकू यायला लागले, शैलेश आपोआपच डोळे बंद करून बसला. बऱ्याच वेळ बासरीचे गोड आवाजातले सूर त्याच्या कानामध्ये रुंजी घालायला लागले, अचानक एक कर्कश्य ब्रेक लागला, बरीच मोठी गर्दी, जमाव कुठल्यातरी लोकांचा मोर्चा, बेभान झालेले लोक, पोलिसांवरही दगडफेक करणारे, पोलिसांची कुमक कमी पडत असलेली, अचानक सणसणत समोरून एक दगड येतो, आणि डाव्या डोळ्याच्या वरती लागतो. त्याला बाजूला करण्यात येते. हॉस्पिटल मध्ये फक्त ड्रेसिंग करून परत ड्युटीवरती तो हजर होतो.


     त्याच्यानंतर अचानक पाऊस पडायला लागतो, कुठलीतरी बिल्डिंग कोसळलेली असते, लोक ओरडत असतात, कुठून कुठून लहान मुलांचा स्त्रियांचा करून आक्रोश ऐकू येत असतो, पाऊस पाणी चिखल, वरून केव्हाही कोसळणारे दगड मातीचे ढीग, पायात गम बूट पण नसताना त्या चित्रांमध्ये काम करणारा पोलीस त्याला दिसायला लागतात. घाईघाईने अँब्युलन्स मधे चढवण्यात येणारे जखमी, अनाथ झालेली मुलं, डोळ्यासमोर यायला लागतात. नंतर अचानक एक विचित्र प्रकार दिसतो कुठलेतरी मंत्र्याची बहुतेक गाडी येणार असते, गाडी मधला मंत्री नामचीन गुंड म्हणून प्रसिद्ध असतो, तीन वर्षांमागे तर त्याला पोलिस ठाण्यात आणून चांगलंच ठोक दिलेला असतो, आता त्याच मंत्र्याला सॅल्यूट करण्याची पाळी आलेली असते.


  वेळोवेळी राजकीय लोकांकडून, किंवा नामचीन गुंडांकडून, किंवा श्रीमंत व्यापार्‍यांकडून झालेला अपमान, भरीस भर म्हणजे वरिष्ठांकडून झालेली नियमांची पायमल्ली, सचोटीने राहण्यासाठी केलेल्या जीवापाड प्रयत्न सगळं सगळं शैलेश च दृष्टी समोर यायला लागलं. त्याच्या डोळ्यातून धारा लागल्या, त्याचे बाबा काय म्हणत, आपल्याला जर आपली परिस्थिती बदलायची असेल तर उत्तम शिक्षण घेऊन या सगळ्या दुनियाच्या छाताडावर पाय ठेवून उभे राहता येते.


अचानक बाबा डोळ्यासमोर आले," शैलेश तू फक्त अभ्यास कर तुझी फी तुझं बाकीचं सगळं हे मी बघून घेईन बाकीच्यांची काळजी करू नकोस आणि सचोटीचा रस्ता सोडू नको." खाडकन शैलेश ने डोळे उघडले.

 

वडिलांच्या हॅटला सलाम करत डोळ्यातले अश्रू आवरत तो निर्मले च्या घराबाहेर पडला. या हॅटने वडिलांच्या मनातले काय काय विचार सांभाळून ठेवले असतील? शैलेश च्या मनात प्रश्न पडले. आपल्या बाबांचं एवढं धोकादायक परिस्थिती मधलं काम, याची आपल्याला जाणीव होऊ नये? याची लाज शैलेशला वाटली.


रवीनाने काल रात्री आईच्या लग्नातल्या चपला आपल्या कॉलेजच्या बॅगेत घालून ठेवले होते, पण सकाळी कॉलेजला निघताना तिच्या लक्षात आलं की तिचे नेहमीचे सॅंडल तुटलेले आहेत. आज आईला सुट्टी होती, त्याच्यामुळे तिने आईचेच वापरातले सॅंडल आपल्या पायात अडकवले आणि ती कॉलेजचा दिशेने घाईघाईने निघाली होती.


   निर्मलाच्या घरामध्ये शिरलेला शैलेश तिने बघितला आणि मग धीर एकवटून तिने पण निर्मले च्या बंगल्या ची घंटी वाजवली. थोडावेळ घाम पुसत बसत, ती शांत झाली. अर्धा-पाऊण तास झाल्यावरती दुसऱ्या बाजूच्या दरवाजा चा आवाज आला आणि निर्मलाने तिला आत मध्ये बोलावले.


तिने आणलेल्या चपला बघून निर्मली चेहऱ्यावरती एक वेगळेच हास्य उमटले. मग आराम खुर्ची तिला बसवून निर्मला म्हणाली," डाव्या पायात लग्नाची चप्पल आणि उजव्या पायात आताच सांडेल घाल."

तिच्या डोक्यावर ती हेडफोन लावून निर्मलाने पडदा सारला. बासरीचे मंजूळ सूर ऐकत रविना चे डोळे आपोआपच मिटले. फुलपंखी दुनिया, चर्चमधले ऑर्गनचे सूर, उंच टिपेच्या आवाजात कोणीतरी गात होतं, अचानक बागे मधली दृश्य दिसायला लागले बहुतेक युवक पंजाबी असावा, झाडाआड चाललेले प्रेम युगुलाचे प्रेम प्रकरण, बागेमध्ये, समुद्रकिनारी अगदी भरात आलेले.

पाठमोरी मुलगी, उंचच कमरेपर्यंत रेशमी केस, फॅशनेबल, नेहमी युरोपियन स्टाईल वेस्टर्न कपडे घालणारी, तर तो तरुण युवक महागडे उंची ब्रँडेड कपडे वापरणारा. त्याच्या हातातलं किमती रिस्ट वॉच, त्याची महागडी मोटर बाईक, सगळं तारुण्याच्या बेफामी मध्ये चाललेलं.


अचानक खूप भांडणाचे स्वर कानावर की यायला लागतात, दोन मध्यमवयीन जोडपी एकमेकांना दुषणे देत शिव्या घालताना दिसतात. " नॉट पॉसिबल, ये रिश्ता हो नही सकता." असे जोरजोरात म्हणताना ऐकू यायला लागलं." लडकी ने हमारे मुंडे को फसाया है"

" युवर लाड चीटेड अवर डॉटर" जोरजोरात भांडण याचे आवाज.


अचानक चर्चमधले दृश्य दिसते, चर्चमध्ये फक्त फादर आणि दोन साक्षीदार वधूच्या वेश्या मधली एक तरुण मुलगी आणि पंजाबी वेश्या मधला मुलगा, फटाफट लग्न, लग्नाची अंगठी घालून दोघं रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन जोडपं म्हणून सह्या करून टाकतात. पालटलेले परिस्थिती, लहानसं घर, पैशाची चणचण, त्यातून मुलीला बाळाची चाहूल लागलेली. आणि अचानक एक दिवशी, कर्कश्य आवाज करत सायरनचा भोंगा वाजवत एक ऍम्ब्युलन्स कुठेतरी निघाली आहे, आत मध्ये ती मुलगी रक्तबंबाळ झालेल्या तरुण मुलाचा हात पकडून बसली आहे, हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तो तरुण मुलगा आपल्या नववधूला सोडून देवाघरी निघून गेलेला आहे. हॉस्पिटलमध्ये मध्यमवयीन जोडपे एकमेकांशी जोरात भांडत आहेत. काळ्यापायाची, दुष्ट, चेटकीण. दोन्हीही घरांमधून त्या तरुण मुलीला हाकलून देण्यात येतं. आता सध्याच्या सॅंडल मधून रवीना च्या पायाला दगड टोचू लागले, कधी कधी काटे पण पोहोचू लागले, डोक्याला झटके बसू लागले, उन्हातले तळपत तळपत पाय घासत नोकरीसाठी केलेली पायपीट. नवऱ्याचे लाइफ इन्शुरन्स काढून घेतलेले पैसे, तिला गरज असूनही सासू-सासर्‍यांनी लुबाडलेले सगळे पैसे.


कॉलेजमधलं पार्टटाईम शिक्षण, पार्ट टाईम नोकरी, वाढत चाललेले पोट, लोकांच्या घाणेरड्या नजरा, राहणार डोक्यावरचे कर्ज, शेवटी घेतलेला निर्णय, सोडलेल्या शहर, नर्स म्हणून एका प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये घेतलेली नोकरी, तिथेच झालेले बाळंतपण, तो पर्यंत बाळाची आणि आईची झालेली वणवण. पैशाची चणचण, आणि बऱ्याच अडचणी. पण बाळाला मात्र कायम छातीशी धरलेलं, बाळासाठी वाघीण होणारी आई, तिचे सगळे लाड पुरवणारी. तिला जपणारी, तिच्या वडिलांबद्दल तिला चांगल्या गोष्टी सांगणारी.


लग्नासाठी येणारे प्रस्ताव हसत हसत नाकारणारी. कारण तिचं बाळ हे तिने प्रेम केलेल्या तरुणाचं जिवंत स्वरूप होतं. आपल्या बाळाच्या भविष्यासाठी कवडी कवडी एकत्र करणारी स्वतः मर मर मरून, राबराब राबून दिवस-रात्र नर्स चे काम. कधी कधी येणार या घाणेरड्या पेशंटला यशस्वीरीत्या तोंड देणारी, लोकांच्या विचित्र नजरेपासून आपल्या मुलीला कायम वाचवणारी, आणि आता या मध्यम वयामध्ये स्वतःबद्दल एक आदर निर्माण केलेली अशी आई रविना ला आता दिसू लागली.


रविनाचा देखील डोळे भरून आले, आणि अचानक तिला स्वप्न अवस्थेतून जाग आली. डोक्यावरचा हेडफोन तिने बाजूला काढून ठेवला, आपल्या पायातल्या दोन्ही चपला काढून, त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवला, आतापर्यंत तिच्या आईने तिला होणारे कष्टाची कधी जाणीव देखील होऊ दिली नव्हती, दोन्हीकडच्या आजी-आजोबांची ,आपल्या वडिलांची फक्त चांगली आठवण तिने आपल्या मुलीच्या हृदयामध्ये कोरली होती.


    रवीनाच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव निर्मला बघत होती. रवीना जागी झाल्यावर ती निर्मला म्हणाली,"तुझी आई माझी लहानपणीची मैत्रीण, सांग तिला मी आठवण केली म्हणून." नंतरच्या आठवड्यामध्ये त्या तिन्ही मुलांना निर्मलाने आपल्याकडे बोलवलं होतं. शैलेश आणि रवीनाच्या वागण्यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक झालेला होता, तर उषा न बोलता सगळं समजून चुकली होती.


"आई-वडिलांनी केलेल्या चुका, भोगलेले प्रायश्चित्त किंवा त्यांची होणारी तारांबळ याचा आपल्या आयुष्यावर ती परिणाम होतच असतो. त्यांची विचार करण्याची दृष्टी त्यांच्या अनुभवावरून सिद्ध झालेली असते त्यामुळे आई वडील नेहमी मुलांची काळजी करतात. पण त्यांच्यासारखाच आयुष्य आपल्याला मिळेलच असं नाही, म्हणून तरुणाईने बेफिकीर पण होऊ नये आणि कसले आहारी पण जाऊ नये. तरुणाईने नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे चांगलं संयुक्त आणि सुसंस्कार देणारे काही असेल ते जरूर तुम्ही घ्या.


    काही वेळेला प्रापंचिक अडचणींचा पाढा आई-वडील तुमच्या समोर वाचणार नाहीत कारण त्याच्यामध्ये त्यांचा अभिमान दुखावलI जाईल, मोठं झाल्यावर म्हणतात ना मुलाच्या पायामध्ये जेव्हा वडिलांची चप्पल येते तेव्हा त्याला मित्रासारखा वागवा ,बघI. जर तुम्ही तुमच्या वडिलांचे मित्र झालात तर तुम्हाला त्यांच्या अडचणींची कल्पना यायलाच पाहिजे, नाहीतर मित्र झाला म्हणून सगळे फायदे तुम्ही उपटणार आणि देणार काहीच नाही असं होऊन कसं चालेल? मुलाने जसा बापाचा मित्र बनायला पाहिजे तसेच मुलीने देखील आईची मैत्रीण व्हायला पाहिजे आणि मैत्रिणींमध्ये सुखदुःख वाटून घेण्याची क्षमता असली पाहिजे. आपल्या आईवडिलांच्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार नाहीतच मुळी, ते आयुष्य त्यांचं होतं आणि त्यांनी काही तुमच्यावरती त्यांचे आयुष्य थोपलेलं नाहीये. "


निर्मला बोलत राहिली. तिचं सगळं बोलणं पटण्यासारखं होतं.

"आणि हो माझ्याकडे काही जादू बिदू नाही बरं तुम्हीच काय बघायचं ते बघितलं आणि तुम्ही काय बघितलं हे मला अजिबात माहीत नाही."निर्मलच्या या वाक्यावर तिघांच्याही चेहऱ्यावर खुदकन हसू पसरले, घराकडे जाताना तिघांच्याही चेहर्‍यावरचा डोक्यावरचा ताण नाहीसा झालेला होता.


Rate this content
Log in