अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

इलायती चिंच

इलायती चिंच

5 mins
1.2K


'ये लहानपणी आपण किती निरर्थक गोष्टी करायचो नं'

' हो न! आणि ते पण अगदी मन लावुन'


प्रवासात हा दोन मैत्रिणींचा संवाद कानावर पडला. तो संवाद येकुन माझ्या ही गालावर हसु उमटले.


लहानपण हे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय... लहानपणी त्याची जाणीव नसते हे आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतुन मिळवलेला आनंद आतापेक्षाही मोठेपणी लहानपणीच्या आठवणींना उजाळा देतांना जास्त होईल याचा.


लहानपणीच्या आठवणीत मी पण केंव्हा गुरफटुन गेली हे कळलेपण नाही...


टोल नाका आला तर तिथे प्लॅस्टीक पिशवीत इलायती चिंचा, काकडी, पोंगा पंडीत विकणारे मुले आली....

गाडीच्या काचांवर टक टक करून, घेता का म्हणुन विचारत होते...


काकडी, पोंगा पंडित तसे नेहमीच विकतांना दिसत होते... घ्यावसे वाटले तरी... नको, माहित नाही काकडी कुठल्या पाण्यावर वाढवलेली असेल, कधी पासुन साल काढुन विकायला आणली असेल, ताजी असेल कि नाही... हात साफ धुतले असेल कि नाही...

पोंगा पंडित कुठल्या तेलात तळले असेल. कसे बनवले असेल? असे उगाच प्रश्न, शंका घेतल्या जायच्या... थोडक्यात काय एखादी गोष्ट घ्यायची नसेल तर नाना शंका... व घ्यायची असेल तर पटकन घेऊन मोकळे व्हायच... काय ताजी आहे न काकडी... एकदम छान, पोंगा पंडित मस्त कुरकुरीत आहे...वैगरे वैगरे!


उन्हाळ्याच्या दिवसात खास उन्हाळी रानमेवा - करवंद, जांभळ विकायला असतात... 


इलायती चिंच बरेच दिवसांनी दिसली... एकावर एक वाटोळे घड प्लॉस्टीक पिशवीतुन छान दिसत होती... 


पहिल्यांदा इलायती चिंच हे नाव कानावर पडले तेंव्हा... १०-१२ वर्षाचे असेल... अशा नावाची चिंच तरी असते का? ह्यावरून खेळताना भांडण झालेले आठवत...चिंच म्हणजे आंबट गोड.. व त्याची झाडे आधी पाहिली होती... इलायती चिंच? ती कशी असते? हे एवढे मोठे झाड त्याचे आहे?... काही तरीच काय ... ह्याला तर काटे आहेत? ... शेजारच्या घरा जवळ हे मागच्या अंगणातल झाड होत.. झाडाचा बराचसा भाग त्यांच्या कौलारू घरावर पसरला होता... व काही वाळक्या चिंचा जमिनीवर पडल्या होत्या... मुल मुली त्या वाळक्या चिंचा उचलुन त्यातील बीया बाजुला करुन खात होते. मीपण खाऊन बघीतलं पण चव आवडली नाही, थुंं करून तोंडातुन बाहेर फेकल... 

बाकीचे खूप चविने खात होते. खाता खाता त्या चिंचाचे वर्ण न आधी कसे छान असते रंगवुन सांगत होते... त्यातल्या काळ्या बीया औषधी असतात, होमीयोपॅथीचे औषध तयार करण्यास वापरतात, आहे तश्या नाही त्या सोलाव्या लागतात, नख न लावता त्याचा पुर्ण रंग चॉकलेटी दिसायला पाहिजे. नख लागले की पांढरा आतला रंग दिसला की ती बी कामाची नसते... मार्च एप्रिल मध्ये या झाडाला चिंचा यायला लागतील. मी पहिल्यांदाच हे झाड पाहात असल्यामुळे, शेजारच्या मुली त्यांच्या जवळ असलेली माहिती सांगत होत्या... आणि हासत होत्या... इलायती चिंचेचे झाड माहित नाही म्हणुन. शेजारच्या मुली म्हणते आता त्यांना कारण अजुन त्या मैत्रिणी झाल्या नव्हत्या. आम्ही बाबांची बदली झाली म्हणुन कॉलनीत नवीन राह्यला आलो होतो.

कॉलनीत खूप वेगवेगळी झाडे होती हिरवीगार, बैठी कौलारू घरे नदी किनारी होती. शाळा अजुन सुरू व्हायची होती, तेंव्हा शेजारची मुल मुली खेळायला एकत्र जमायची...

शाळा सुरू झाल्यावर सोबत जाणे एकत्र खेळणे व्हायचे. बघता बघता वर्ष संपत मार्च महिना आला, परीक्षेची तयारी चालु असतांनाही एकत्र खेळणे असायचेच. 

इलायती चिंचेच्या झाडाला चिंचा येण्याला सुरवात झाली होती. 

थोड्या मोठ्या झाल्यावर त्यांच वार्यावर हालण्यार द्दृष्य मोहक असायचं... इंग्रजी पिस्ता रंग, त्यावर चढलेली गुलाबी लाली... 

तयार झालेल्या चिंचा असल्याकी त्यांच्या पोटातुन पांढरा आतला भाग वरच साल सोडून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिसायच्या. पुर्ण तयार असतील तर त्या पांढर्या भागातुन आतली काळी बी बाहेर पडतांना दिसायची... 


झाडावरच्या चिंचा तोडायला झोपडपट्टीतील मुल आकडी घेउन यायचे व चिंचा तोडून घेऊन जायचे.

आम्हा कॉलनीतल्या मुलांना तेंव्हा जाग यायची. झाड आपल आहे चिंचा पहिले आपणच तोडायच्या... मग कधी कश्या ह्याचे खलबत सुरू व्हायच... 

मग एखाद्या काकू हमखास ओरडायच्या आधी परीक्षा मग बाकी... 


झाल मग परीक्षा संपल्यावर चिंचा तोडू, तो पर्यंत येता जाता खाली पडलेल्याच उचलुन खायच्या असा ठराव पास व्हायचा.

जांभळाच झाड होत... त्याचीपण जांभळ खाली पडायची... तीपण आधी कोण उचलणार याच्यात चढाओढ... 

आंब्याच्या झाडाला आलेला मोहर, त्याला छोट्या छोट्या आलेल्या कैर्या पाहात आभ्यास केला... खरतर अभ्यास करतोय हे ही समजायचे नाही... आनंदात अभ्यास व्हायचा व परीक्षा पण हसत खेळत पार पडायची. 


मधुन मधुन इलायची चिंचा तोडायचा बेत आखला जायचा ... शाळे जवळपण एक आजी इलायती चिंचेचे छोटे छोटे वाटे घेऊन विकायला बसायच्या... कॉलनीतच झाड असल्यामुळे आम्ही ते विकत घ्यायचो नाही... 


आकडी तयार करण्यापासुन सुरवात, बांबु शोधण, त्याला तार बांधुन आकडा तयार करायचा, मग झाडाच्या फांदीत अडकवुन हालवायच... मग तयार झालेल्या चिंचा खाली पडायच्या... जमिनीवर पडू नये म्हणुन बरेच वेळा फ्रॉक ची झोळीकरून त्यात झेलायच्या... झेलता झेलता दमछाक व्हायची. पण गंमतपण यायची, झेलता झेलता चिंचा खाली पडायच्या. मग ती उचलण्याची धावपळ.


कधी कधी पडलेल्या फांदीवर पाय पडायचा व काटे पायात टोचायचे... न रडता काटा काढायचा, काटा काढतांना सगळे मदतीला यायचे. टणटणीचा पाला चुरगळुन काटा टोचलेल्या ठिकाणी लावायचा. पाला औषधी असतो अस कोणी सांगीतल हे आता नक्की सांगता येणार नाही. पण औषधी असत हे पक्क मनात बसलेल... जस गुडघा, हाताचा कोपराला खरचटल, रक्त निघत असेल तर हळद लावायची...घरी गेल की आई रागवणार हे माहित असल्यामुळे... सगळी गॅंग एकमेकांना साथ देत सांभाळुन घ्यायची. 


जमलेल्या चिंचाचा वाटा, कोणाला जास्त कोणाला कमी मिळाला, चिंचा तोडतांना कोणी अधिक खाल्लया ह्याच्या वरून वाद व्हायचे.

लुटुपुटीचे भांडण व्हायची...


चिंचाचा फक्त पांढरा भाग खायचा असतो त्यातली काळी बी काढुन. तुरट गोड चव असते, सुरवातीला आवडली नव्हती चव, सगळ्यांसोबत मज्जा घेत खातांना हळुहळु आवडायला लागली चव, काळ्या बीया चिंच खातांना बाजुला काढुन जमा करून ठेवायच्या. त्यासाठी रीकाम्या काड्यापेट्या जमवुन ठेवायच्या... त्या लपवुन ठेवायच्या.


जमवलेल्या बीया सोलण्याचा मोठा कार्यक्रम असायचा.. कधी दुपारी खूप उन असेल तर कोणाच्यातरी घरात, पायरीवर बसुन त्या सोलत बसायच्या गप्पा मारत... मग लक्षात यायच गप्पा मारत बीया सोलता येत नाही. 

कोण किती सोलत याची चढाओढ असायची...


बी छान सोलत असतांनाच कधी शेवटच्या क्षणी कोणी आवाज दिला, थोड लक्ष विचलीत झाल की पुर्ण साल निघुन यायच व आतील पांढरा भाग दिसायचा... बी बाद... परत नविन बी हातात घ्यायची व सोलत बसायच अगदी मन लावुन... असा छान मन लावुन कधी अभ्यास केल्याच आठवत नाही, पण हे काम अगदी मना पासुन करत बसायचो शांतपणे... 

रात्री एकटे बसुन चिकाटीने एक दोन बीया पुर्ण सोललेल्या काड्या पेटीत ठेवलेल्या. 

पण कधी समोरच राहणार्या होमियोपॅथी डॉक्टरांकडे नेऊन देता नाही आल्या.

खरच ह्या सोललेल्या बीया औषधी असतात का? हा प्रश्न विचारला नाही कधी डॉक्टरांना... 

उत्तर हो असेल कि नाही माहित नाही... पण अगदी मन लावुन, शांतचित्ताने केलेले काम वर वर निरर्थक वाटल तरी खूप आनंद देऊन जायच!!!


आता पण तो काळ आठवला तरी तेवढाच आनंद, शांतमन असेलेल जाणवत!!!


Rate this content
Log in