हतबल पृथ्वी
हतबल पृथ्वी


पृथ्वी ही सजीवांची माता आहे. ती सजीवांना प्रेमाने संभाळते. त्यांना खाऊ - पिऊ घालते. माणसाची प्रगती व्हावी म्हणून मानवाने केलेले अत्याचार ती निमूटपणे सहन करते. मानवाने पृथ्वीला गृहीत धरून अनेक अशक्य कामे साध्य केली. आता पृथ्वीची सहनशक्ती संपली की काय अशी शक्यता निर्माण झाली कारण ठरला तो 2020 मध्ये आलेला कोरोना आजार. कोरोना संकट विश्व्व्यापी आहे. कोणी माणूस यातून सुटेल अशी आशा नाही. पृथ्वीदेखील या संकटाला हतबल झाली असून मास्क घालून शांत बसली आहे.